Join us  

सोनम कपूरने बाळंतपणानंतर घटवलं तब्बल २० किलो वजन, बघा वेटलॉससाठी तिने नेमकं काय केलं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2024 9:09 AM

Postpartum Weight Loss Journey of Sonam Kapoor: अभिनेत्री सोनम कपूरने बाळंतपणानंतर तब्बल २० किलो वजन कमी केलं असून अजून ६ किलो वजन तिला कमी करायचं आहे. बघा नेमका काय आहे तिचा वेटलॉस मंत्र....(Sonam Kapoor revealed her weight loss and diet tips)

ठळक मुद्देकोमट पाणी, लिंबू आणि मध पिऊन सोनमचा दिवस सुरू होतो. हंगामी फळं खाण्यावर आणि नाश्त्यासाठी कोमट पाणी पिण्यावर तिचा भर असतो.

बॉलीवूडची फॅशनिस्टा सोनम कपूर आणि तिची स्टाईल या नेहमीच चर्चेच्या विषयांमध्ये असतात. आपल्याला माहितीच आहे की दिड वर्षांपुर्वी सोनमने मुलाला जन्म दिला आणि तेव्हापासून ती चित्रपट सृष्टीपासून थोडी दूर झाली. कारण सध्या ती तिचा संपूर्ण फोकस मुलाच्या संगोपनाकडे आणि स्वत:च्या फिटनेसवर देत आहे. सोनमने नुकतीच एक पोस्ट सोशल मिडियावर शेअर केली असून यात तिने बाळंतपणानंतर १६ महिन्यात तब्बल २० किलो वजन कमी केले आहे (Sonam Kapoor looses 20 kg weight after delivery). शिवाय अजून ६ किलो वजन तिला येत्या काही दिवसांत कमी करायचे आहे.(Sonam Kapoor revealed her weight loss and diet tips)

 

वजन कमी करण्यासाठी सोनम कोणता व्यायाम करते?

आपल्यापैकी बरेच जण असे आहेत की काहीही केले तरी त्यांचा वजनाचा काटा काही खाली उतरत नाही. अशावेळी सोनमला थेट २० किलो वजन कमी करणं कसं शक्य झालं असावं, हा प्रश्न पडणं अगदी साहजिक आहे.

फक्त ५ मिनिटांत न घासता फ्रिज होईल नव्यासारखं चकाचक, ४ पदार्थांची भन्नाट जादू- बघा सोपा उपाय

म्हणूनच आता सोनमचा फिटनेस मंत्र नेमका काय आहे, ते पाहूया.. अगदी टीनएजपासून साेनमला टाईप १ प्रकारातला डायबेटिज आहे. तेव्हापासून ते आतापर्यंत ती तिच्या आहाराबाबत, तब्येतीबाबत अतिशय जागरुक असते. ती नेहमीच पॉवर योगा, वेटलिफ्टिंग, पिलेट्स, कार्डियो, स्विमिंग, स्क्वॅश या प्रकारचा भरपूर व्यायाम करते. जवळपास २ ते ३ तास तिचं रेग्युलर वर्कआऊट असतं. 

 

सोनमचं वेटलॉस डाएट कसं आहे?

कोमट पाणी, लिंबू आणि मध पिऊन सोनमचा दिवस सुरू होतो. हंगामी फळं खाण्यावर आणि नाश्त्यासाठी कोमट पाणी पिण्यावर तिचा भर असतो. उपमा, इडली, पोहे आणि प्रोटीन शेक अशा पद्धतीचा तिचा नाश्ता असतो.

जाड दिसता म्हणून साडी नेसणंच टाळता? साडी निवडताना ६ गोष्टी लक्षात ठेवा, दिसाल स्लिम- उंच

दुपारचं जेवण हेवी झाल्यानंतर रात्री ती फक्त भाज्या, सॅण्डविच खाते. डायबिटिज असल्याने ती साखर खूप कमी प्रमाणात खाते. भूक लागलीच तर सोया मिल्क किंवा प्रोटीन शेक पिण्यावर तिचा भर असतो. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्ससोनम कपूरवेट लॉस टिप्सव्यायामयोगासने प्रकार व फायदे