Lokmat Sakhi >Fitness > पोट फारच सुटलंय? दुपारच्या जेवणात ३ पदार्थ खा; पोटही सुटणार नाही-वजनही नियंत्रणात

पोट फारच सुटलंय? दुपारच्या जेवणात ३ पदार्थ खा; पोटही सुटणार नाही-वजनही नियंत्रणात

Weight Loss lunch : आपल्या आरोग्यासाठी भाज्या किती फायदेशीर आहेत हे सर्वांनाच माहीत आहे, त्यात असे अनेक पोषक घटक आढळतात, जे शरीराला संपूर्ण पोषण देतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 01:24 PM2022-11-29T13:24:13+5:302022-11-29T14:27:22+5:30

Weight Loss lunch : आपल्या आरोग्यासाठी भाज्या किती फायदेशीर आहेत हे सर्वांनाच माहीत आहे, त्यात असे अनेक पोषक घटक आढळतात, जे शरीराला संपूर्ण पोषण देतात.

Weight loss lunch curd green leafy vegetables pulse legumes lentils belly fat obesity flat tummy | पोट फारच सुटलंय? दुपारच्या जेवणात ३ पदार्थ खा; पोटही सुटणार नाही-वजनही नियंत्रणात

पोट फारच सुटलंय? दुपारच्या जेवणात ३ पदार्थ खा; पोटही सुटणार नाही-वजनही नियंत्रणात

एकदा वजन वाढलं की कमी होता होत नाही.   कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम करणाऱ्या अनेकांचं वजन वाढलं.  अशात फिजिकल एक्टिव्हीटीज कमी झाल्यानं पोट, कमरेवरची चरबी वाढत जाते.  पुन्हा शरीराला टोन  करणं खूप कठीण होतं.  (How to lose weight faster) शरीरावरची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी योगा, जीम अशा एक्टिव्हीज केल्या जाातात पण हवातसा बदल शरीरात दिसत नाही. 

रोजच्या जेवणात काही पदार्थांमध्ये बदल केल्यास  वजन कमी  होण्यास मदत होईल.  वजन कमी करण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे, कारण त्याद्वारे चरबी जाळली जाऊ शकते, परंतु त्याच वेळी आपल्याला निरोगी आहार देखील घेणे आवश्यक आहे. (Weight loss lunch curd green leafy vegetables pulse legumes lentils belly fat obesity flat tummy)

भाज्या

आपल्या आरोग्यासाठी भाज्या किती फायदेशीर आहेत हे सर्वांनाच माहीत आहे, त्यात असे अनेक पोषक घटक आढळतात, जे शरीराला संपूर्ण पोषण देतात, तसेच शरीराचे कार्य योग्यरित्या कार्य करण्यास मदत करतात. विशेषत: हिरव्या पालेभाज्या खाल्ल्यास शरीराला जीवनसत्त्वे, कॅल्शियम आणि लोहासारखे पोषक घटक मिळतात. भाज्या कमीतकमी तेलात करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.

डाळ

आपल्यापैकी बहुतेकांचे जेवण डाळीशिवाय पूर्ण होत नाही.  डाळी चवदार तर असतातच पण वजन कमी करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात. सामान्यत: प्रथिनांची गरज डाळीनं भागवली जाते, पण त्यासोबतच शरीराला लोह आणि जस्तही मिळते. वजन वाढण्यासोबतच इतरही अनेक समस्या दूर होतात.

दही

दुपारी जेवल्यावर दही खावे. दुपारच्या  जेवणात दही खाल्ल्यानं पचनक्रिया व्यवस्थित राहते आणि अन्न चांगल्या पद्धतीनं पचण्यास मदत होते. 

Web Title: Weight loss lunch curd green leafy vegetables pulse legumes lentils belly fat obesity flat tummy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.