Join us  

शरीर एकदम सुकडं, फक्त पोट खूप सुटलंय? १ घरगुती ड्रिंक, झरझर घटेल होईल पोटावरची चरबी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 1:38 PM

Weight loss recipe How to remove belly fat quickly : ही रेसेपी पोटावरची चरबी वेगानं कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

वजन कमी करण्यासाठी डाएट, व्यायाम असे वेगवेगळे उपाय करूनही अनेकांना फायदा जाणवत नाही.  काहीजण पोट कमी करण्यासाठी रोज चालायला जातात पण दिवसभरात खाण्यापिण्यात अनेक असे पदार्थ येतात ज्यामुळे अतिरिक्त चरबी वाढते.( know how to make weight loss drink) वजन कमी करण्यासाठी अनेक उत्पादनं बाजारात उपलब्ध आहेत पण त्याचा योग्य वापर केला नाही तर साईड इफेक्ट्सही उद्भवतात. त्यापेक्षा घरगुती उपाय कधीही उत्तम ठरतात.

यामुळे थोडा उशिरा फरक जाणवतो पण तब्येतीला बाधा पोहोचत नाही. वजन वेगानं कमी करण्याासाठी डायटिशियन मनप्रित यांनी वेट लॉस ड्रिंक बनवण्याची योग्य पद्धत सांगितली आहे. ही रेसेपी पोटावरची चरबी वेगानं कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. (Weight loss recipe to remove belly fat quickly)

वेट लॉस ड्रिंक बनवण्याचं साहित्य

कच्चा पांढरा पेठा - 1 वाटी

भाजलेले जिरे पावडर - 1/4 टीस्पून

रॉक मीठ - 1/4 टीस्पून

काळी मिरी - 1/4 टीस्पून

पाणी - 200 मि.ली

कृती

सर्व साहित्य ब्लेंडरमध्ये घाला.  द्रावण तयार करण्यासाठी हे मिश्रण मिसळून नंतर गाळून घ्या.  बेली फॅट कमी करणारे पेय तयार आहे, तुम्ही ते कधीही पिऊ शकता पण रिकाम्या पोटी प्यायल्यास अधिक चांगला परिणाम दिसेल.

काळी मिरी- त्यात पायपरिन असते, जे चयापचय वाढवण्याबरोबरच चरबी पुन्हा जमा होण्यापासून प्रतिबंधित करते.

कोहोळा- यात फायबर असते, जे भूक नियंत्रित करते. यामुळे रक्तातील साखरही नियंत्रित राहते.

भाजलेले जिरे पावडर- स्वादुपिंडातून इन्सुलिनचा स्राव वाढवते. त्यामुळे ग्लुकोजचे पचनही सोपे होते.

रॉक मीठ- हायड्रोक्लोरिक ऍसिडचे उत्पादन आणि आतड्यांतील जीवाणूंची वाढ रोखते.

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य