बिघडलेल्या जीवनशैलीमुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसून येत आहे. ज्यामुळे लोकांच्या रोगप्रतिकारशक्तीवर थेट परिणाम होत आहे. सकाळचा नाश्ता असो किंवा रात्रीचं जेवण. जेवणाची वेळ ही निश्चित नसल्यामुळे आरोग्याच्या निगडीत समस्या वाढतात. काही लोकांकडे वेळ नसल्यामुळे ते जेवण स्किप करतात. ज्यामुळे शरीरातील उर्जा कमी होते. मुख्य म्हणजे लठ्ठपणाची समस्या वाढते. शरीरात अतिरिक्त चरबी वाढण्यामागे मुख्य कारण वेळेवर जेवण न करणे हे आहे. ही समस्या सोडवण्यासाठी जेवणाची वेळ निश्चित करणं गरजेचं आहे.
यासंदर्भात, न्यूट्रिशनिस्ट सिमरन वोहरा सांगतात, ''बिघडलेल्या जीवनशैलीमुळे लोकांना वेळेवर जेवायला जमत नाही. ज्यामुळे गॅस, अपचन, निद्रानाश यांसारख्या आरोग्याच्या संबंधित समस्या वाढतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी हा डाएट प्लॅन फॉलो करा. ज्यामुळे शरीर मेन्टेन व आरोग्य सुदृढ राहील''(Weight Loss: The best timings for your meals to lose weight effectively).
शरीर मेन्टेन ठेवण्यासाठी फॉलो करा हा डाएट प्लॅन
१- सकाळी उठल्यानंतर ७ ते ८ वाजेच्या दरम्यान, नाश्ता करा. १० वाजल्यानंतर नाश्ता करू नका.
२ - दुपारचे जेवण आणि नाश्ता यामध्ये ४ तासांचे अंतर ठेवा. अशावेळी दुपारी १२ ते २ या वेळेत जेवण करा. दुपारी ४ नंतर कधीही दुपारचे जेवण करू नका.
जिमला जायला वेळ नाही, डाएटचे तीन तेरा? फक्त २० मिनिटं ४ गोष्टी करा, सुटलेलं शरीर होईल सुडौल
३- ६ ते ९ वाजेच्या दरम्यान रात्रीचे जेवण करा. रात्री १० नंतर डिनर करणे टाळा. एक गोष्ट लक्षात ठेवा की, रात्रीचे जेवण झोपण्याच्या ३ तास आधी करावे. याने तुमचे अन्न चांगले पचते व अॅसिडिटीचा त्रासही होत नाही.
चाळीशीनंतर महिलांचं वजन का वाढतं? वय वाढलं की वजन वाढतंच का? तज्ज्ञ सांगतात, एक उपाय
४ - हा डाएट प्लॅन फॉलो केल्यास आरोग्य व शरीरात अनेक बदल दिसून येतील, व आहाराचे सेवन करताना पौष्टीक पदार्थांचे सेवन करा. यासह नियमित व्यायाम करत राहा. ज्यामुळे आपली फिगर मेन्टेन राहील.