Join us  

वजन कमीच होत नाही? पाळी येऊन गेल्यानंतर १० दिवस हे पदार्थ खा; कमी होईल वजन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2024 3:16 PM

Weight Loss Tips : वाढलेल्या वजनाला  त्रासलेल्या महिलांनी लो कॅलरी डाएट घ्यायला हवं.

आजकाल वाढतं वजन अनेकांसाठी डोकेदुखी ठरतंय. खासकरून महिलांनासाठी एक्सपर्ट्सच्यामते पुरूषांच्या तुनलेत महिलांचे वजन वेगानं वाढतं. पण वजन कमी व्हायला वेळ लागतो. पुरूष मेहनत करून वजन कमी वेळात कमी करून घेतात या पद्धतीनं अंतर शारीरिक, हॉर्मोनल कारणांमुळे होते. अशा स्थितीत महिलांनी वजन कमी करण्यासाठी योग्य वर्कआऊट आणि डायटिंग करायला हवी. (Weight Loss Tips 10 Foods Include In Diet For Faster Weight Loss Then Men Says Dietician)

योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास  वजन कमी करण्यास वेळ लागतो. डॉक्टरांचा सल्ला न घेता  स्वत: उपाय केल्यास याचे साईड इफेक्ट्स होऊ शकतात. एक्सपर्ट्स महिलांना लवकर  वजन कमी करण्यासाठी सोपं डाएट करण्याचा सल्ला देतात. वजन कमी करण्यासाठी काय करावं याबाबत आहारतज्ज्ञ खुशबू शर्मा यांनी एका हिंदी वेबपोर्टलशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. (Health Tips)

महिलांमध्ये वेगानं लठ्ठपणा का वाढतो?

क्लिनिकल डायटिशयन खुशबू शर्मा सांगतात की महिलांमध्ये फॅट्सचे प्रमाण जास्त असते. याचं कारण हॉर्मोन्स असू शकतं. हार्मोन्समुळे शरीर बदलते आणि गर्भधारणा होण्यासाठी शरीरात चरबी वाढते. म्हणून महिलांमध्ये लठ्ठपणा लवकर येतो. आहारतज्ज्ञ सांगतात की महिलांच्या तुलनेत पुरूष लवकर वजन कमी करू शकतात.

Navratri Special : नवरात्रीत 5 मिनिटांत काढून होतील पट्टीच्या रांगोळी डिजाईन्स; लक्ष्मीच्या पाऊलांनी सजवा दार

 महिलांनी महिन्याचे ९ दिवस स्ट्रिक्ट डाएट केल्यास वजन कमी होण्यास मदत होईल. पिरिएड्स संपल्यानंतर १० दिवस लो कॅलरी डाएट घ्या. याशिवाय डाएट, वर्कआऊट करून तुम्ही संपूर्ण महिन्यात नॉर्मल डाएट आणि वर्कआऊट करू शकता. ज्यामुळे वजन वेगानं कमी होण्यास मदत होईल.

१ महिना रात्रीचं जेवण सोडल्यानं खरंच वजन कमी होतं? पोषणतज्ज्ञ सांगतात रात्री न जेवल्याचे परिणाम

वाढलेल्या वजनाला  त्रासलेल्या महिलांनी लो कॅलरी डाएट घ्यायला हवं. या फूड्समध्ये कॅलरीज, फॅट्स कमी असते आणि भरपूर पोषण मिळते.  फळं, मासे, ड्राय फ्रुट्स, राजमा, छोले, चिया सिड्स, योगर्ट किंवा ब्रोकोलीचे सेवन करा. हे पदार्थ खाण्याआधी एक्सपर्ट्सचा सल्ला घ्या.  

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सहेल्थ टिप्स