Join us  

साईड फॅट म्हणजेच कंबरेवरची चरबी कमी करण्यासाठी ३ व्यायाम, आठवड्यातून फक्त ३ वेळा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2022 8:10 AM

How To Reduce Side Fat: कंबरेवरची चरबी कशी कमी करावी, त्यासाठी व्यायाम कोणता करायचा या विचारात असाल तर त्यासाठी हे काही व्यायाम एकदा बघून घ्या..

ठळक मुद्देकंबरेवरची चरबी कमी करण्यासाठी नेमके कोणते व्यायाम उपयुक्त ठरतात, ते पाहूया.

पोटावर, कंबरेवर जमा झालेली चरबी कमी कशी करायची, ही अनेकांपुढची समस्या असते. त्यासाठी अनेक जण वेगवेगळे व्यायाम (exercise) करून बघतात. बऱ्याचदा कोणाचाही सल्ला न घेता साईड बेंड करण्याचे म्हणजेच दोन्ही बाजूंनी खाली वाकण्याचे व्यायाम आपण करतो. पण त्याचा म्हणावा तसा फायदा होत नाही. कारण मुळात हे व्यायाम कंबरेवरची चरबी किंवा साईड फॅट कमी करण्यासाठी नसतात (weight loss tips). तर ज्यांची फिगर मुळातच शेपमध्ये आहे, अशा लोकांना तसेच स्लिमट्रीम राहण्यासाठी हे व्यायाम उपयोगी ठरणारे असतात. त्यामुळे कंबरेवरची चरबी कमी करण्यासाठी (How To Reduce Side Fat) नेमके कोणते व्यायाम उपयुक्त ठरतात, ते पाहूया.

कंबरेवरची चरबी किंवा साईड फॅट कमी करण्यासाठी व्यायाम..यासाठी नेमके कोणते व्यायाम करायचे, याविषयीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या tarun_kapoor_fitness या पेजवर शेअर करण्यात आला आहे. यात जवळपास ३ प्रकारचे व्यायाम सांगण्यात आले असून हे व्यायाम आठवड्यातून ३ वेळा करावेत, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

 

१. प्लँक ट्विस्टहा व्यायाम करताना आपण प्लॅंक करतो तशी पोझिशन घ्यावी. त्यानंतर दोन्ही पायांचे तळवे सोबतच एकदा उजवीकडे तर नंतर डावीकडे वळवावे.

भेगाळलेल्या टाचांसाठी खास होममेड क्रिम.. फक्त ४ गोष्टी वापरा, टाचा होतील मऊ- मुलायम

असे करताना कंबरेतून पुर्ण शरीर ट्विस्ट होईल याची काळजी घ्यावी. पण हात मात्र एका जागेवरच स्टेबल असावेत. 

 

२. साईड एक्सरसाईजहा व्यायाम करण्यासाठी दोन्ही तळहात आणि तळपाय जमिनीवर टेकलेले असावेत.

मुलं सारखं उलटून बोलतात, कसं समजवावं कळेना? ५ टिप्स.. मुलं होतील शहाणी- समजूतदार

संपूर्ण शरीर वर उचललेले असावे. यानंतर एकदा डावा पाय डाव्या बाजूला तर दुसऱ्यांदा उजवा पाय उजव्या बाजूला काढावा. अशा पद्धतीने एकानंतर एक दोन्ही पाय हलवावे. 

 

३. तिसरा व्यायामहा व्यायाम करताना एका हाताचा कोपऱ्यापासून ते तळहातापर्यंतचा भाग जमिनीला टेकलेला असावा.

फिक्या रंगाचे कपडे धुतल्यानंतर आणखीनच डल होतात? २ सोपे उपाय, कपडे होतील चमकदार- नव्यासारखे

त्या हाताच्या बाजूलाच सर्व शरीर वळालेले असावे. वरच्या बाजूला असेल तो हात आणि पाय वर- खाली करून व्यायाम करावा. असेच दुसऱ्या बाजुनेही करावे. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामवेट लॉस टिप्स