Join us  

पोट, कंबरेचा घेर कमीच होत नाही? 30-30-30 नवीन फॉर्म्यूला वापरा, महिन्याभरातच व्हाल स्लिम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 11:49 AM

Weight Loss Tips 30-30-30 Formula : वॉकींग, जॉगिंग, सायकलिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग या व्यायाम प्रकारांचा तुम्ही समावेश करू शकता. 

अनहेल्दी लाईफस्टाईलमुळे आज जगभरातील  लोक लठ्ठपणाचा सामना करत आहेत.   वेट लॉसच्या प्रयत्नात असलेल्या प्रत्येकालचा डाएट-जीम करणं जमतंच असं नाही.  (Easy Weight Loss Tips) ३०-३०-३० नियम  वजन कमी करण्याचा एक उत्तम उपाय आहे.  लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्यास तुम्हाला फरक जाणवेल. यात तुम्हाला कोणताही स्ट्रिक्ट डाएट प्लॅन फॉलो करावा लागत नाही.   वजन कमी  करण्याचा साधा सोपा उपाय पाहूया. (What is Weight Loss 30-30-30 Formula)

कॅलरीज ३० टक्के कमी करा

वजन कमी करण्यासाठी कॅलरीजवर कंट्रोल असणं फार महत्वाचं असते. ३०-३०-३० नियमानुसार  रोजचा कॅलरी इंटेक ३० टक्के कमी करू इच्छित असाल तर यामुळे फायदा मिळू शकतो. वजन पटकन कमी  न करता नेहमी हळूहळू वजन कमी करण्याकडे लक्ष द्यावे. पोषक तत्व आणि पाण्याचे सेवन भरपूर प्रमाणात करावे.(30-30-30 Formula it will help you to loss  belly fat)

घाईघाईत न जेवता एक एक घास व्यवस्थित चावून खा

जेवण तुमच्यासाठी जितकं गरजेचं असतं. तितकंच जेवण चावून खाणंही गरजेचं असतं.  नियमित जेवणाचा आनंद घेण्यासाठी ३० मिनिटांचा वेळ काढावा आणि एक-एक घासाचा पुरेपूर आनंद घेऊन खावे. याला माईंडफूल इटिंग म्हणतात. यामुळे यामुळे पचनक्रिया चांगली राहते. यासाठी जेवताना फोन स्क्रोल करणं आणि टिव्ही पाहणं सोडून द्यायला हवं.या सवयींमुळे तब्येतीवर चुकीचा परिणाम होतो. 

पोटभर भात खा-कणभरही वजन वाढणार नाही; तांदूळ 'या' ३ पद्धतीने शिजवा, पोट राहील स्लिम

३० मिनिटं रोज व्यायाम करा

व्यायाम हा हेल्थ आणि फिटनेसचा महत्वाचा भाग आहे. वजन कमी करण्यात यात महत्वाची भूमिका असते. यासाठी रोज  ३० मिनिटांच्या व्यायामाचा रुटीनमध्ये समावेश करा. असं केल्याने कॅलरीज बर्न होण्यास मदत होते.

वॉकींग, जॉगिंग, सायकलिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग या व्यायाम प्रकारांचा तुम्ही समावेश करू शकता. वजन कमी करण्यासाठी या नियमांचे पालन करणं खूपच सोपं आहे. यामुळे लाईफस्टाईलमध्ये बदल होतात. यासाठी तुम्हाला आवडीचे जेवण सोडण्याची काहीही गरज नाही. रोजच्या लाईफस्टाईलमध्ये छोटे छोटे बदल करून तुम्ही वजन कमी करू शकता. 

ओटी पोट-मांड्यांचा घेर वाढला? झोपण्याच्या ५ मिनिटं आधी १ काम करा; झरझर कमी होईल चरबी

वजन कमी करण्याची प्रक्रिया खूपच संथ असते.  प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक क्षमतेनुसार याचा परिणाम दिसून येतो. वजन कमी करण्यासाठी तुम्ही काय खाता, किती खाता याची नोंद ठेवा. साखर आणि प्रोसेस्ड फूडपासून लांब राहा, खाद्यपदार्थ, फळं, भाज्या आणि लिन प्रोटीनचा आहारात  समावेश करा. शरीर हायड्रेट ठेवा.

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स