Lokmat Sakhi >Fitness > Weight loss tips : व्यायाम अन् डाएटचा कंटाळा येतो?; मग चिंता सोडा फक्त या ५ उपायांनी स्वतःला नेहमी ठेवा स्लिम

Weight loss tips : व्यायाम अन् डाएटचा कंटाळा येतो?; मग चिंता सोडा फक्त या ५ उपायांनी स्वतःला नेहमी ठेवा स्लिम

Weight loss tips : वजन कमी करणे खरोखरच सोपं नसतं. येथे आम्ही वर्कआउट्स व्यतिरिक्त वजन कमी करण्याचे काही  सोपे मार्ग सांगत आहोत, ज्याद्वारे आपण तंदुरुस्त होऊ शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 11:47 AM2021-07-13T11:47:21+5:302021-07-13T12:10:11+5:30

Weight loss tips : वजन कमी करणे खरोखरच सोपं नसतं. येथे आम्ही वर्कआउट्स व्यतिरिक्त वजन कमी करण्याचे काही  सोपे मार्ग सांगत आहोत, ज्याद्वारे आपण तंदुरुस्त होऊ शकता.

Weight loss tips : 5 easy ways to lose weight without exercise at home | Weight loss tips : व्यायाम अन् डाएटचा कंटाळा येतो?; मग चिंता सोडा फक्त या ५ उपायांनी स्वतःला नेहमी ठेवा स्लिम

Weight loss tips : व्यायाम अन् डाएटचा कंटाळा येतो?; मग चिंता सोडा फक्त या ५ उपायांनी स्वतःला नेहमी ठेवा स्लिम

शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या वजन कमी करणे हे एक मोठे आव्हान असू शकते. कारण या रूटीनमध्ये वजन कमी करणार्‍या व्यक्तीला केवळ हार्डकोर वर्कआउट्सच करावे लागत नाहीत तर त्यास आपला आहारही नियंत्रित करावा लागतो. प्रत्येकजण अशा कठोर नियमाचे पालन करण्यास तयार असतोच असं नाही. तथापि, हे देखील पूर्णपणे खरे नाही की वर्कआउट केल्याशिवाय वजन कमी होऊ शकत नाही. मोठ्या प्रमाणावर, वजन कमी करणे खरोखरच सोपं नसतं. येथे आम्ही वर्कआउट्स व्यतिरिक्त वजन कमी करण्याचे काही  सोपे मार्ग सांगत आहोत, ज्याद्वारे आपण तंदुरुस्त होऊ शकता.

स्वतःहून आपलं जेवण तयार करा

बाहेर किंवा इतरांनी शिजवलेलं अन्न खाण्यापेक्षा तुम्ही स्वतः आपल्याला हवं ते बनवलं तर सोपं होईल. कारण जेव्हा तुम्ही स्वतः जेवण बनवता तेव्हा त्यात मसाले, तेल यांचे प्रमाण नियंत्रणात असते. याशिवाय घरच्याघरी तयार केलेलं जेवण कमी कॅलरीजयुक्त असल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. 

घाईघाईत जेवणं टाळा

वेगाने खाल्ल्याने, जंक फूड खाल्ल्याने शरीरात फॅट्स वाढतात. म्हणून घाईघाईत खाऊ नका आणि प्रत्येक पदार्थाचे हळू हळू चर्वण करा. आपला आहार सश्याच्या शर्यतीप्रमाणे खाऊ नका, कारण ही शर्यत नाही. हळू हळू खाणे आपल्याला कमी अन्न खाण्यास मदत करते आणि त्यामुळे आपले वजन कमी करण्यास मदत होते.

वैज्ञानिकदृष्या तुम्ही तेच खाता जे तुम्ही आजूबाजूला पाहत असता. पण जेव्हा तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असता तेव्हा काहीही खाऊन चालत नाही. ठराविकवेळी पोटाला ज्या अन्नाची आवश्यकता असते असं हेल्दी जेवण खायला हवं. त्यासाठी आपल्या आहारात हेल्दी पदार्थांचा समावेश करा. 

शरीरात पाणी आणि व्हिटामीन डी ची कमतरता भासू देऊ नका

झोपेची कमतरता भासल्यास ताण जास्त येतो त्यामुळे हार्मोनल इंम्बॅलेंस होण्याची शक्यता असते.  ज्यामुळे तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत अडचड येऊ शकते. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर  झोप चांगली आणि पूर्ण घेण्याचा प्रयत्न करा. पाणी, झोप आणि व्हिटामीन डी वजन कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावतात. म्हणून शरीरात कधीच पाण्याची आणि व्हिटामीन डी ची कमतरता भासू देऊ नका. 

अशी घ्या काळजी

प्रोसेस्ड फूडपासून लांब राहा

डाएट  एक्सपर्ट्स रंजना सिंह त्यांनी सांगितले की तुम्ही नाष्त्याला तळलेले पदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा. कारण तळलेल्या पदार्थांच्या अतिसेवनामुळे वजन वेगानं वाढू शकतं. असे पदार्थ तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तेल, मसाल्यांचा वापर केला जातो.  चिप्स, पॉपकॉर्न, ड्राई फ्रूट्स, स्नॅक्स, फ्रोजेन फूड्स प्रोसेस फूड या प्रकारात येतात. 

मैदायुक्त पदार्थांचे सेवन

सकाळी उठल्यानंतर नाष्ता करताना पौष्टीक आहार घ्या. कारण रात्रभर आपण काहीही खाल्लेलं नसतं त्यामुळे चांगल्या झोपेची गरज असते. अशावेळी मैदायुक्त पदार्थ टाळा. अशा पदार्थांच सेवन केल्यास तुमचे पोट भरेल पण जास्त वेळ उर्जा राहणार नाही. आणि  काही वेळानंतर झोप यायला सुरूवात होईल. म्हणून शरीरासाठी पोषक आहार घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सकाळी सकाळी गरजेपेक्षा जास्त व्यायाम केल्यास महागात पडू शकतं. आणि  शरीराचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे योग्य आहार घ्या. आणि शरीर उत्साही ठेवा.

पॅक्ड फळांचा रस

फ्रुट ज्यूसमध्ये आर्टिफिशियल फ्लेवर्स असल्यामुळे सोडा आणि साखरेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.  त्यामुळे कॅलरीज वाढतात. तसंच पचनक्रिया व्यवस्थित राहत नाही. त्यापेक्षा तुम्ही सकाळच्या नाष्त्यासाठी ताजी फळं खाण्याचा प्रयत्न करा. 

पॅन केक

अनेकांना सकाळी ऑफिसला गेल्यानंतर  पॅनकेक्स, कुकिज, बिस्किट्स खाण्याची सवय असते. यामध्ये रिफाईंड कार्बोहायड्रेट्स असतात. त्यामुळे भूक वाढते. तसंच यात ट्रांस फॅट्स असतात. जे आरोग्यासाठी हानीकारक असतात.

Web Title: Weight loss tips : 5 easy ways to lose weight without exercise at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.