Join us  

Weight loss Tips : पाठीवर प्रचंड फॅट्स, चरबीने शरीर बेढब झालंय? रोज 5 मिनिटं हा व्यायाम, मिळवा परफेक्ट फिगर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 10:14 AM

Weight loss Tips :पाठीची चरबी  कमी करण्यासाठी जास्तवेळ लागू शकतो. पाठीच्या चरबीसाठी काही योगासन केल्याने, आपण सहजपणे शरीरावरचं अतिरिक्त फॅट्स कमी करू शकता.

पोटावर, पाठीवर जमा झालेली चरबी काहीही केल्या कमी होत नाही. आपल्या रोजच्या खाण्यात वेगवेगळे चरबीयुक्त, गोड पदार्थ येत असतात. त्यामुळे शरीरावरील चरबी वाढून हळूहळू आकार बेढब होत जातो आणि कपडे घट्ट व्हायला लागता, ब्लाऊज किंवा डिप नेक ड्रेस घाल्यानंतर हे लटकलेलं फॅट लगेचच (Back fat) दिसून येतं. पोटाच्या चरबीपेक्षा पाठीच्या चरबीपासून मुक्त होणे अधिक कठीण आहे. काही योगाप्रकारांनी आपण आपले हात आणि पाय पटकन आणि सहज टोन करू शकता,

परंतु पाठीची चरबी  कमी करण्यासाठी जास्तवेळ लागू शकतो. पाठीच्या चरबीसाठी काही योगासन केल्याने, आपण सहजपणे शरीरावरचं अतिरिक्त फॅट्स कमी करू शकता. आपले मुख्य स्नायू बळकट करू शकता. ही चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला फक्त रोज 5 मिनिटे योगा (Yogasana) करावा लागेल.  योगगुरू नेहा महिला आरोग्य संशोधन फाउंडेशन (ट्रस्ट) च्या संस्थापक आहेत. यांनी हर जिंदगीशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे.

१) धनुरासन

हे करण्यासाठी, एखाद्याला दोन्ही हातांनी पाय धरावे लागतात, ज्यामुळे पाठीचा भाग पूर्णपणे संकुचित होतो. यामुळे अतिरिक्त चरबी जळते. या व्यतिरिक्त, हा योग पोटाची चरबी कमी करण्यासाठी, पोटाच्या समस्या आणि रक्त परिसंचरण गतिमान करण्यासाठी चांगला आहे.

२) राजकपोतासन

असे केल्याने, कंबरेच्या बाजूने मांडीच्या खालच्या भागापर्यंत अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. तसेच कंबर लवचिक आणि मजबूत बनते. हे आसन नियमितपणे केल्याने नितंब लवचिक होतात.

३) पादहस्तासन

पादहस्तासन करताना, श्वास सोडताना पुढे वाकणे आवश्यक आहे. हे करत असताना पाठीवर बराच ताण पुढे येतो. यामुळे पाठीवरील चरबी कमी होते. पादहस्तासन हे तीन शब्दांनी बनलेले आहे. पहिला शब्द 'पाद' म्हणजे 'पाय', दुसरा शब्द 'हस्ता' म्हणजे 'हात' आणि तिसरा शब्द 'आसन' म्हणजे 'मुद्रा'. या योगासनात उभे असताना समोर वाकलेला असतो आणि दोन्ही हातांनी पायाला स्पर्श करावा लागतो.

४) मर्कट आसन

हे करत असताना, दोन्ही पाय पाठीवर झोपून झिगझॅग करावे लागतात, म्हणजे आधी पाय उजव्या बाजूला आणि नंतर डाव्या बाजूला जावे. यामध्ये आपण कापड पिळून काढल्याप्रमाणे मागचा भाग पिळतो. यामुळे या भागात जमा झालेली चरबी कमी होते.

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सशिल्पा शेट्टी