Lokmat Sakhi >Fitness > पोट सुटलं पण व्यायामाला वेळच नाही? उभ्या उभ्या फक्त २ मिनिटं रोज हा व्यायाम करा, पोट होईल कमी

पोट सुटलं पण व्यायामाला वेळच नाही? उभ्या उभ्या फक्त २ मिनिटं रोज हा व्यायाम करा, पोट होईल कमी

Weight Loss Tips : घरच्याघरी उभ्या उभ्या तुम्ही साधा-सोपा व्यायाम केला तर बेली फॅट अगदी सहज कमी होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 09:08 AM2023-08-24T09:08:00+5:302023-08-26T11:04:55+5:30

Weight Loss Tips : घरच्याघरी उभ्या उभ्या तुम्ही साधा-सोपा व्यायाम केला तर बेली फॅट अगदी सहज कमी होईल

Weight Loss Tips : Belly fat loss exercise at home Best belly fat loss exercises | पोट सुटलं पण व्यायामाला वेळच नाही? उभ्या उभ्या फक्त २ मिनिटं रोज हा व्यायाम करा, पोट होईल कमी

पोट सुटलं पण व्यायामाला वेळच नाही? उभ्या उभ्या फक्त २ मिनिटं रोज हा व्यायाम करा, पोट होईल कमी

एकदा पोट सुटलं की कमी करणं खूपच कठीण होतं पोट कमी करण्यासाठी अनेक व्यायाम आहेत (Belly Fat Loss Exercise) पण रोजच्या बिझी लाईफस्टाईलमध्ये व्यायामासाठी जीमला किंवा योगा क्लासेसला जायला अजिबात वेळ मिळत नाही. अशावेळी  घरच्याघरी उभ्या उभ्या तुम्ही साधा-सोपा व्यायाम केला तर बेली फॅट अगदी सहज कमी होईल. (Top Exercises for Belly Fat) योगा एक्सपर्ट हीरा लाल यांनी आपल्या इंस्टाग्राम पोस्टवरून याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Weight Loss Tips)

वजन कमी करण्यासाठी सोपा व्यायाम (Belly fat loss exercise at home)

पोटाची चरबी कमी करण्यासाठी सगळ्यात आधी भिंतीकडे तोंड करून उभं राहा. त्यानंतर एक हाताचं अंतर  ठेवून भिंतीपासून लांब या आणि आपले दोन्ही हात भिंतीवर ठेवा.  (Health Tips) त्यानंतर उजवा पाय गुडघ्यातून वर आणा परत खाली आणा नंतर डावा पायही गुडघ्यापासून वर आणा आणि पुन्हा पूर्व स्थितीत या. १ ते दीड मिनिटं हा व्यायाम कंटिन्यू करा. तुम्हाला व्यायामाची सवय झाल्यानंतर हळू हळू व्यायामाचा वेळ वाढवत जा. या व्यायामुळे तुमचा पेल्विक पार्ट एक्टिव्ह राहील. म्हणजेच ओटी पोटाचा वाढलेला घेर कमी होण्यासही मदत होईल. (How to loss belly fat)

आलं

पोटाची चरबी कमी करण्यासाठी आलं फायदेशीर ठरतं. यात असंख्य औषधीय गुणधर्म आहेत.  पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही आल्याचा वापर करू शकता. यामुळे मेटाबॉलिझ्म व्यवस्थित राहते. ज्यामुळे पोटाची चरबी कमी करण्यास मदत होते. आल्याचे सेवन केल्यानं शरीरातील अतिरिक्त फॅट्स कमी होतात. बेली फॅट कमी करण्यासाठी आल्याचे वेगवेगळ्या प्रकारे सेवन करू शकता जसं की आल्याचा चहा. पण या आल्याच्या चहात साखर न घालता गुळ घाला. 

जीऱ्याचं पाणी

जिऱ्याचं पाणी तब्येतीसाठी फायदेशीर ठरते. यासाठी जीऱ्याचे तब्येतीच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत. जीऱ्याचं पाणी प्यायल्यानं डायरिया आणि पोटासंबंधी समस्या कमी होतात. याशिवाय बेली फॅट कमी करण्यासाठी तुम्ही जिरं वापरू शकता. रोज जीऱ्याचं पाणी प्यायल्यानं पोटावर चरबी जमा होत नाही भूक नियंत्रणात राहते.

काळी मिरी

काळ्या मिरीच्या सेवनानं पोटाची चरबी नियंत्रणात राहते. काळ्या मिरीची पावडर तुम्ही सॅलेडबरोबरही खाऊ शकता.  यामुळे मेटाबॉलिझ्म  चांगले राहते. ४ ते ५ टक्के मेटाबॉलिझ्म वाढतो. पोटावर जमा झालेली चरबी घटते आणि शरीर एक्टिव्ह राहते. 

हळद

आयुर्वेदानुसार हळदीत अनेक औषधी गुणधर्म असतात. यातील इंफ्लामेटरी प्रॉपर्टीज अनेक आजारांपासून  वाचवण्याचे काम करतात. याव्यतिरिक्त हळदीच्या सेवनानं बेली फॅट म्हणजेच पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही १ ग्लास गरम पाण्यात थोडी हळद मिसळून रोज सकाळी प्या.

Web Title: Weight Loss Tips : Belly fat loss exercise at home Best belly fat loss exercises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.