सध्या बैठ्या कामाचं प्रमाण खूप वाढलं आहे. वर्किंग वुमन असेल तर तिला ८ ते ९ तास सलग एकाजागी बसावंच लागतं. त्यामुळे मग व्हायचा तोच परिणाम होतो आणि पोटावरची, हिप्सवरची चरबी वाढत जाते. बाकी शरीर योग्य प्रमाणात असलं तरी मग सुटलेलं पोट आणि मागचा भाग मात्र बेढब दिसू लागतो. शरीराचा सगळा आकारच बदलतो. म्हणूनच पोटावरची आणि हिप्सवरची चरबी कशी कमी करायची (3 exercises to reduce belly fat and fat on the hips), यासाठी शिल्पा शेट्टीने (weight loss Tips by Shilpa Shetty) नुकताच एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
पोटावरची, हिप्सवरची चरबी कमी करण्यासाठी व्यायाम..
१. पहिल्या प्रकारचा व्यायाम करण्यासाठी जमिनीवर पाय सरळ करून बसा. त्यानंतर दोन्ही तळहात मागच्या बाजूने जमिनीवर टेकवा.
सध्याचा जबरदस्त ब्यूटी ट्रेण्ड 'स्किन सायकलिंग' माहितीये? बघा कसं करायचं आणि काय त्याचे फायदे
त्यानंतर दोन्ही पाय सोबतच उचला. गुडघ्यातून वाकवा. दोन्ही तळपाय सोबतच जमिनीवर न टेकवता एकदा डावीकडे तर एकदा उजवीकडे वळवा. हा व्यायाम १२ ते १८ वेळा ३ सेटमध्ये करावा.
२. दुसऱ्या व्यायामात जमिनीवर बसावे. दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून तळपाय जमिनीवर टेकवावे. दोन्ही हात क्रॉस करून तळहात दोन्ही खांद्यांवर ठेवावेत. एकदा डावीकडे तर एकदा उजवीकडे कंबरेतून वाकावे. हा व्यायामही १२ ते १८ वेळा ३ सेटमध्ये करावा.
३. तिसऱ्या व्यायामात पोटावर झोपावे. दोन्ही हात समोरच्या दिशेने सरळ रेषेत ठेवावे. कपाळ जमिनीवर टेकलेले असावे. यानंतर उजवा पाय आणि डावा हात सोबत उचलावा. त्यानंतर डावा पाय आणि उजवा हात सोबत उचलावा. एकानंतर एक दोन्ही हातांनी हाच व्यायाम करावा.
गुळाचा चहा नेहमीचाच... आता गुळाचं पाणी पिऊन बघा, इम्युनिटी वाढविण्यासह ५ जबरदस्त फायदे
४. हे तिन्ही व्यायाम करून झाले की एका पायाचा गुडघा आणि दुसऱ्या पायाचा तळपाय यावर शरीराचा बॅलेन्स ठेवावा. यानंतर कंबरेतून मागच्या बाजूने वाकत स्ट्रेचिंग करावे. असाच व्यायाम दुसऱ्या पायानेही करावा.