Lokmat Sakhi >Fitness > Weight Loss Tips: नुसता वजनाचा आकडा बघू नका! तज्ज्ञ सांगतात, फिटनेस ओळखण्याचे 4 इंडिकेटर, वजनाइतकेच महत्त्वाचे

Weight Loss Tips: नुसता वजनाचा आकडा बघू नका! तज्ज्ञ सांगतात, फिटनेस ओळखण्याचे 4 इंडिकेटर, वजनाइतकेच महत्त्वाचे

Weight Loss Indicators: जेवढ्या लवकर वेटलॉस करता, तेवढ्याच वेगात पुन्हा वेटगेन होतं, असा अनेकांचा अनुभव. अशा सगळ्यांसाठीच तज्ज्ञांनी दिलेला हा सल्ला (expert's opinion on weight loss) महत्त्वाचा ठरणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2022 06:31 PM2022-04-26T18:31:23+5:302022-04-26T18:34:07+5:30

Weight Loss Indicators: जेवढ्या लवकर वेटलॉस करता, तेवढ्याच वेगात पुन्हा वेटगेन होतं, असा अनेकांचा अनुभव. अशा सगळ्यांसाठीच तज्ज्ञांनी दिलेला हा सल्ला (expert's opinion on weight loss) महत्त्वाचा ठरणार आहे.

Weight Loss Tips: Don't Just Look At Your Weight! Experts say that 4 indicators of fitness are just as important as weight | Weight Loss Tips: नुसता वजनाचा आकडा बघू नका! तज्ज्ञ सांगतात, फिटनेस ओळखण्याचे 4 इंडिकेटर, वजनाइतकेच महत्त्वाचे

Weight Loss Tips: नुसता वजनाचा आकडा बघू नका! तज्ज्ञ सांगतात, फिटनेस ओळखण्याचे 4 इंडिकेटर, वजनाइतकेच महत्त्वाचे

Highlightsवेटलॉस करताना केवळ वजनाच्या काट्यावर दिसणाऱ्या आकड्याकडेच लक्ष केंद्रित करू नका.त्याच्यासोबतच खरेतर त्याच्या आधी या ४ गोष्टी तपासून पहा.

वाढणारं वजन कमी करायचं हा अनेकांपुढचा प्रश्न. त्यासाठी मग वेगवेगळे डाएट प्लॅन (diet plan), वेगवेगळे व्यायाम असं सगळं आपण करतो. थोडे दिवस यासगळ्या गोष्टी करण्यासाठी भयंकर उत्साह असतो. पण त्यानंतर मात्र हळूहळू आपण ढिले पडत जातो आणि मग डाएट, व्यायाम बंद करतो. याचा व्हायचा तोच परिणाम होतो आणि मग पुन्हा झपाट्याने वजन वाढू लागतं. काही जणांच्या बाबतीत तर जेवढं वजन कमी केलंय, त्याच्या दुपट वजन वाढलेलं दिसतं..

 

अशा सगळ्यांसाठीच सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) यांनी दिलेला सल्ला महत्त्वाचा ठरणार आहे. त्यांनी नुकतीच एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर (instagram share) केली असून यामध्ये त्यांनी सस्टेनेबल आणि परमनंट वेटलाॅस करण्यासाठी कोणत्या गोष्टींवर फोकस करायला हवं, याविषयी माहिती दिली आहे. त्या म्हणतात की वेटलॉस करताना केवळ वजनाच्या काट्यावर दिसणाऱ्या आकड्याकडेच लक्ष केंद्रित करू नका. त्यावरून तुमचं वजन किती कमी होतंय, हे ठरवू नका. तर त्याच्यासोबतच खरेतर त्याच्या आधी या ४ गोष्टी तपासून पहा. या ४ बाबतीत तुम्हाला सकारात्मकता जाणवत असेल तर नक्कीच तुम्ही लवकरच परमनंट आणि सस्टेनेबल वेटलॉस करणार हे लक्षात घ्या..

 

खरंच वेटलॉस होतोय का हे सांगणाऱ्या ४ गोष्टी (indicators for weight loss)
१. फिटनेस टेस्ट (fitness test)

अगदी स्वत:चे स्वत:ला या गोष्टी तपासता येतील. यासाठी कोणत्या डॉक्टरची गरज नाही. अशी स्वत:ची टेस्ट घेताना स्वत:ला प्रश्न विचारा की वेटलॉस करायचा हे आपण का ठरवलं, लवकर थकवा येतो, फ्लेक्सिबिलिटी कमी झाली, दिवसभर एनर्जी पुरत नाही, पायऱ्या चढताना धाप लागते, बीपी- शुगर वाढलंय की शरीरावरच्या अमुक भागाचं वजन खूप वाढलंय.. अशा नेमक्या कोणत्या कारणामुळे तुम्ही वेटलॉस करता याचं उत्तर मिळालं की नेमकं त्याच्यात काय सुधारणा झाली आहे हे तपासा.
उदा- काही व्यक्तींना त्यांची लवचिकता वाढवायची असते. मग अशा व्यक्तींनी हे तपासावं की डाएट प्लॅन सुरु झाल्यापासून आपली फ्लेक्झिबिलीटी वाढली आहे की नाही, याचं उत्तर सकारात्मक असेल तर तुम्ही योग्य ट्रॅकवर आहात. वजनाच्या काट्यावर जे दिसतंय त्याकडे सध्या दुर्लक्ष करा.

 

२. वेस्ट टु हिप रेशो (waist- hip ratio)
वेटलॉसला सुरुवात करण्यापुर्वी ही मापं एकदा घेऊन ठेवा. आठवड्यातून एकदा हा रेशो तपासत चला. यात सकारात्मक दृष्टीने फरक जाणवत असेल तर तुमचा वेटलॉस होत आहे, हे नक्की.

३. स्वत:मध्ये झालेला बदल
वेटलॉस करायला लागल्यापासून तुम्हाला अधिक फ्रेश वाटत असेल, दृष्टीकोन सकारात्मक झाला असेल, रात्री शांत झोप लागत असेल, नैराश्य कमी झालं असेल, त्वचा- केस यांचं आरोग्य सुधारल्यासारखं वाटत असेल, तर हा सगळा तुमच्यात होणारा चांगला बदल लक्षात घ्या. या सगळ्या गोष्टी होत असतील तर वेटलॉसची सुरुवात झाली आहे, असं समजा. 

 

४. आकडेवारी तपासा
ब्लड प्रेशर, कोलेस्टरॉल, मधुमेह यांची आकडेवारी कशी आहे, त्यात काही बदल झाला आहे का, हे तपासून पहा. त्यात जर फरक पडला असेल तर नक्कीच तुमचा प्रवास वेटलॉसकडे होत आहे आणि तो ही अगदी योग्य पद्धतीने.  


 

Web Title: Weight Loss Tips: Don't Just Look At Your Weight! Experts say that 4 indicators of fitness are just as important as weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.