Lokmat Sakhi >Fitness > ३ किलो वजन झरझर कमी करणारी हेल्दी युक्ती ‘या’ पद्धतीने करा व्यायाम-चरबी उतरेल झरझर

३ किलो वजन झरझर कमी करणारी हेल्दी युक्ती ‘या’ पद्धतीने करा व्यायाम-चरबी उतरेल झरझर

Weight Loss Tips: वाढतं वजन कसं कमी करावं, असा प्रश्न पडला असेल तर त्यासाठी हे काही व्यायाम नियमितपणे करून पाहा..(exercise for fast weight loss)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2024 04:36 PM2024-10-31T16:36:40+5:302024-10-31T18:54:01+5:30

Weight Loss Tips: वाढतं वजन कसं कमी करावं, असा प्रश्न पडला असेल तर त्यासाठी हे काही व्यायाम नियमितपणे करून पाहा..(exercise for fast weight loss)

weight loss tips, high intensity workout that helps to lose weight quickly | ३ किलो वजन झरझर कमी करणारी हेल्दी युक्ती ‘या’ पद्धतीने करा व्यायाम-चरबी उतरेल झरझर

३ किलो वजन झरझर कमी करणारी हेल्दी युक्ती ‘या’ पद्धतीने करा व्यायाम-चरबी उतरेल झरझर

Highlightsआतापासूनच हे काही व्यायाम नियमितपणे सुरू करा. यामुळे तुम्हाला कमी दिवसांत भराभर वजन कमी करण्यास नक्कीच मदत होईल.

वाढतं वजन ही सध्या अनेकांपुढची समस्या आहे. कारण प्रत्येकाच्याच कामाचं स्वरुप बदललेलं आहे. अधिकाधिक वेळ आपण बैठं काम करतो. त्यामुळे शरीराचा म्हणावा तसा व्यायाम होत नाही. त्याशिवाय खाण्यापिण्याच्या सवयीही बदललेल्या आहेत. याचा परिणाम चयापचय क्रियेवर, पचन संस्थेवर होतो. त्यामुळे मग अंगावर चरबी साचण्याचे प्रमाण वाढत जाते. योग्य वेळीच जर त्यावर नियंत्रण ठेवले नाही, तर मग मात्र वाढलेले वजन कमी करणे खूप कठीण होते (exercise for fast weight loss). त्यामुळेच आतापासूनच हे काही व्यायाम नियमितपणे सुरू करा. यामुळे तुम्हाला कमी दिवसांत भराभर वजन कमी करण्यास नक्कीच मदत होईल.(high intensity workout that helps to lose weight quickly)

 

वजन कमी करण्यासाठी व्यायाम

१. बर्पीज हा व्यायाम वेटलॉससाठी अतिशय उत्तम आहे. तो करायला थोडा अवघड असून ज्यांच्या शरीराला व्यायामाची सवय आहे, त्यांनाच तो चटकन जमण्यासारखा आहे.

लक्ष्मीपूजन: पुरणपोळी चवदार होण्यासाठी ५ टिप्स; इतकी स्वादिष्ट होईल की एखादी पोळी जास्तच खाल...

हा व्यायाम नियमितपणे केल्यामुळे शरीराचे जवळपास प्रत्येक स्नायू ताणले जातात. स्क्वॅट्स, पुशअप्स यासोबत जर बर्पी केला तर जवळपास प्रत्येक एका मिनिटाला तुम्ही १० कॅलरी बर्न करू शकता, असं फिटनेस एक्सपर्ट सांगतात. पण एकदमच एवढ्या जास्त प्रमाणात हा व्यायाम करू नये. हळूहळू करत वेळ वाढवत न्यावा. 

 

२. जम्प स्क्वॅट हा व्यायाम केल्यानेही वजन भराभर कमी होते. सुरुवातीला एकदम जम्प स्क्वॅट करू नयेत. प्लेन स्क्वॅट्स करून सुरुवात करावी आणि हळूहळू वेळ वाढवत नेऊन जम्प स्क्वॅट करावे. एका वेळी २० जम्प स्क्वॅट करावे. असं प्रत्येकी ३ वेळा करा. 

 

३. दोरीवरच्या उड्या हा व्यायामाचा एक सोपा प्रकार. लहानपणी अनेकजण भरपूर वेळ दोरीवरच्या उड्या मारतात. पण वयानुसार हा व्यायामप्रकार मागे पडत जातो.

सर्दीमुळे किंवा तेलकट- तुपकट फराळ खाल्ल्याने घसा दुखतो? १ सोपा उपाय- एका रात्रीतून मिळेल आराम

पण वजन भराभर कमी करायचं असेल तर दररोज काही मिनिटांसाठी नियमितपणे दोरीवरच्या उड्या मारा. हळूहळू वेळ वाढवत न्या. पण वेळ वाढवताना पाय दुखावले जाणार नाही, याची काळजी घ्या. 

 

Web Title: weight loss tips, high intensity workout that helps to lose weight quickly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.