वजन कमी करणं सध्याच्या स्थितीत खूपच कठीण झालंय. काहीजण वजन कमी करण्यासाठी डाएट करतात तर काहीजण जीमला जाऊन व्यायाम. (How to loss weight) जर तुम्ही व्यायामाला काही दिवस ब्रेक दिला तर काही दिवसातच शरीर पुन्हा फुलत जातं. वजन वाढलं नाही तरी शरीर सर्व बाजूंनी सुटत जातं. (Belly fat loss Tips)
अशावेळी चरबी वाढण्यासाठी आपल्या दैनंदिन आयुष्यातील काही सवयी जबाबदार असतात. वजन नैसर्गिकरित्या घटवण्याच्या काही सोप्या टिप्स पाहूया जेणेकरून तुम्हाला कमीत कमी वेळात चांगला परीणाम दिसून येईल. (How to lose weight Naturally)
पोटाची चरबी कशी कमी करायची? (How to Lose Weight Fast in 5 simple Steps)
1) वेट लॉसचे काही सोपे उपाय तुम्हाला बेली फॅट सहज कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतील. पोटावरची चरबी कमी करण्यासाठी साखरयुक्त पदार्थ किंवा ड्रिंक्स पूर्णपणे बंद करण्याची काहीही गरज नाही. पोटाची चरबी कमी करणं सहज शक्य आहे त्यासाठी काही पदार्थांच्या सेवनावर नियंत्रण ठेवायला हवं. द जर्नल ऑफ क्लिनिकल इंवेस्टिगेशन यांच्यामते जास्त गोड पदार्थ खाल्ल्यानं पोटावरची चरबी वाढते.
2) वजन कमी करण्यासाठी प्रोटीन्सयुक्त पदार्थांचे जास्तीत जास्त सेवन करा. या पदार्थातील पोषक तत्व पचण्यास शरीराला जास्तवेळ लागतो. ज्यामुळे भूक नियंत्रणात राहते. जेव्हा तुम्ही कमी खाता तेव्हा वजन कमी करण्यासाठीही तुम्हाला कमी मेहनत करावी लागेल. यातील पोषक तत्व पचवण्यासाठी शरीराला खूप वेळा लागतो. ज्यामुळे भूक नियंत्रणात राहते आणि तुम्हाला जास्त मेहनत करावी लागत नाही.
3) साखरेसह कार्ब्ससुद्धा कमी खायला हवेत. आहाराच्या हिशोबानं प्रत्येक दिवशी ५० ग्राम कार्ब्स घ्यायला हवेत. यामुळे शरीरातील एनर्जी सहज जाळणं सोपं होतं आणि चरबीसुद्धा वेगानं कमी होते.
4) बेली फॅट कमी करण्यासाठी मेटाबॉलिझ्म आणि डायजेशन योग्य असायला हवं. या दोन्हींसाठी फायबर्सचे सेवन महत्वपूर्ण असते. म्हणूनच आपल्या आहारात ब्रोकोली, सफरचंद, गाजर, शेंगाचा समावेश असायला हवा.
5) व्यायामाचे नाव ऐकले की लोक पाठ फिरवतात. पण रोजच्या थोड्याफार शारीरिक हालचालींमुळेही वजन कमी होऊ शकते. जसं की चालणे, पोहणे, सायकल चालवणे, योगा किंवा दोरी उड्या.