व्यायाम करायचा म्हटलं की बऱ्याच जणांना कंटाळा येतो. पण वजन मात्र कमी करायचं असतं. त्यामुळे मग कसं तरी प्रयत्न करून अनेक जण व्यायाम करायला सुरुवात करतात. पण थंडीच्या दिवसांत मात्र व्यायाम करण्यासाठी अजिबात उठावंच वाटत नाही. व्यायाम करायला घराबाहेर जावं म्हटलं तर जाम कंटाळा येतो. पण त्याचवेळी वजन वाढू नये याची भीतीही मनात असतेच (How To Lose Weight Without Doing Exercise?). मग अशावेळी व्यायाम न करता वजन कमी करण्यासाठी किंवा आहे ते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहा...(3 tips for fast weight loss)
व्यायाम न करता वजन कसं कमी करायचं?
१. योग्य आहार घ्या
व्यायाम न करता वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्या आहारावर नियंत्रण ठेवावं लागेल. त्यामुळेच तुम्ही घरी तयार केलेले सात्विक अन्न घेण्यावर भर द्या.
धक धक गर्ल माधुरी दीक्षितने सांगितलं तिचं फिटनेस सिक्रेट! ५७ वर्षांची असूनही एवढी सुंदर कशी...
तसेच तुमच्या आहारात योग्य प्रमाणात भाज्या, फळं, खनिजे, प्रोटीन्स कडधान्यं असतील याची काळजी घ्या. पोट तुडूंब भरेपर्यंत खाऊ नका. तोंडावर ताबा ठेवून थोडं पोट रिकामं राहिल एवढंच अन्न सामान्यपणे सर्वांनीच घेतलं पाहिजे.
२. शरीर हायड्रेटेड ठेवा
हिवाळ्यात थंडीमुळे आपण पाणी कमी पितो. त्यामुळे शरीर डिहायड्रेट होतं. त्यामुळेच हिवाळ्यात लक्षपूर्वक आठवण ठेवून योग्य प्रमाणात पाणी प्यायला पाहिजे.
लग्नसराईसाठी शिवा जाळीदार नेट ब्लाऊज, १० सुंदर पॅटर्न, साध्याच साडीलाही मिळेल स्टायलिश लूक
पाण्यासोबतच ताक, लिंबू, सरबत, फळांचे ताजे रस हे घेण्यावरही भर द्या असं आहारतज्ज्ञ सांगतात. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यास आपोआपच पोट भरल्यासारखं वाटतं.
३. स्ट्रेस आणि झोप
तुमचं वजन नियंत्रित ठेवण्यासाठी स्ट्रेस आणि झोप या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तुम्ही जर नेहमीच खूप ताण घेत असाल किंवा नेहमीच खूप अपुरी झोप घेत असाल तर याचा परिणाम तुमच्या तब्येतीवर होतो.
जेवढी साय पातेल्यात जमा केली तेवढंच तूप निघणार! भरपूर तूप निघण्यासाठी लक्षात ठेवा २ टिप्स
शरीरातलं हार्मोनल बॅलेन्स आणि इतर गोष्टी बिघडतात आणि त्याचा परिणाम वाढत्या वजनाच्या स्वरूपात दिसून येतो. त्यामुळे ताण नियंत्रणात ठेवा तसेच पुरेशी झोप घ्या..