Join us  

Weight Loss Tips : पोट, मांड्यांचा घेर वाढल्यानं शरीर बेढब दिसतंय? जेवताना हे काम करा, व्हाल स्लिम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2022 12:05 PM

Weight Loss Tips : जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर साध्या गोष्टी ठेवा. स्वतःवर कोणतेही बंधने लादू नका. त्यापेक्षा तुम्ही काय आणि किती प्रमाणात खात आहात.

वजन वाढणे(Over Weight) ही आजच्या काळातील सर्वात मोठी समस्या आहे. वाढत्या वजनामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू लागतात. त्याच वेळी, 2020 आणि 2021 या वर्षांमध्ये आपल्याला तंदुरुस्त आणि निरोगी असण्याचा अर्थ देखील समजला आहे. तर असे बरेच लोक असतील ज्यांनी आपल्या नवीन वर्षाच्या संकल्पांमध्ये वजन कमी करण्याचं ठरवलं असेल आणि काहींनी जिमला जाणे देखील सुरू केले असेल. (Weight Loss Tips) पण वजन कमी करण्यात व्यायामाची भूमिका फक्त 20 टक्के असते. तर उर्वरित 80 टक्के रोल आहाराचा आहे. (How to lose weight fast) अशा स्थितीत व्यायाम करण्याबरोबरच खाणं पिणं व्यवस्थित असणं गरजेचं असतं. 

जेवणात काय असायला हवं?

जगभरातील पोषणतज्ञ अनेकदा लोकांना अन्नाविषयी जाणून घेण्याचा सल्ला देतात. आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय नाही हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे,  जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर ही पायरी तुमच्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे की तुम्ही तुमच्या ताटात काय ठेवावे जेणेकरून वजन कमी करणे सोपे होईल.

प्रोटीन्स, कार्ब्स किती असायला हवेत?

पोषणतज्ञ वजन कमी करण्यासाठी आणि स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहाराची शिफारस करतात. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या प्लेटच्या एक चतुर्थांश भागामध्ये प्रथिने, एकामध्ये कॉम्प्लेक्स कार्ब्स आणि उर्वरित अर्ध्या भागामध्ये भाज्या समाविष्ट केल्या पाहिजेत. याशिवाय हेल्दी फॅट्स असणे देखील महत्त्वाचे आहे.

वजन कमी करण्यासाठी गुड फॅट्स

सहसा लोक वजन कमी करताना आहारातून चरबी वगळतात. पण ते अजिबात योग्य नाही.  तुम्हाला तुमच्या आहारात चांगल्या फॅटचा समावेश करावा लागेल. याद्वारे तुमचे वजन कमी करणे सोपे होऊ शकते. यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईल, तूप, नट, बिया इत्यादींचा समावेश करू शकता. 

टॉनिकपेक्षा प्रभावी आहेत २० रूपयांच्या आत मिळणारे ६ पदार्थ; अशक्तपणा, रक्ताची कमतरता होईल दूर

वजन कमी करण्याचं सिक्रेट

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर साध्या गोष्टी ठेवा. स्वतःवर कोणतेही बंधने लादू नका. त्यापेक्षा तुम्ही काय आणि किती प्रमाणात खात आहात. मैदायुक्त, तळलेले पदार्थ खाणं सोडून फायबर्स, प्रोटीन्स असलेले पदार्थ खा. वजन कमी करताना हा मूलमंत्र तुम्हाला उपयोगी पडेल. 

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य