लठ्ठपणाच्या समस्येनं बरेच लोक त्रस्त आहेत. खासकरून पोटाची चरबी वाढली, हिप्स, कंबरेवर फॅट्स जमा झाले आहेत अशी तक्रार अनेकींची असते. यामुळे मेटाबॉलिज्म मंद स्लो होतो. जेव्हा मेटाबॉलिज्म व्यवस्थित काम करतो तेव्हा आपण जे काही खातो त्याचे एनर्जीमध्ये रुपांतर होते. शरीरात एक्स्ट्रा फॅट्स जमा होत नाहीत आणि वजनही कमी होतं. लोक बेली फॅट कमी करण्यासाठी शॉर्टकट्सचा विचार करतात पण वजन घटवण्यासाठी कोणताही शॉर्ट कट नाही. (Weight Loss Tips)
योग्य व्यायाम आणि डाएट घेतल्यास वजन पटापट कमी होतं. यानंतरही तुमचं वजन वाढतच जात असेल एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. बेली फॅट कमी करण्यासाठी काही सुपरफूड्स प्रभावी ठरतात. यामुळे मेटाबॉलिझ्म वाढतो आणि बेली फॅट कमी करण्यास मदत होते. आहारतज्ज्ञ मनप्रीत यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Surprising Benefits of Spearmint Tea for weight loss)
बेली फॅट वाढण्याची अनेक कारणं असू शकतात. झोप पूर्ण न होणं, अन्हेल्दी पदार्थांचा आहारात समावेश, जास्त ताण घेणं, वेळेवर न जेवणं ही पोटावरची चरबी वाढण्याची मुख्य कारणं आहेत. याव्यतिरिक्त जेव्हा तुम्ही शारीरिकदृष्या एक्टिव्ह नसता तेव्हा एकाच जागी बसून तासनतास काम करावं लागतं अशावेळी बेली फॅट वाढतं इंसुलिन, एस्ट्रोजन, कोर्टिसोल आणि प्रोजेस्टरोन सारख्या हार्मोन्सचं असंतुलन पोटाची चरबी वाढवते.
स्पिअरमिंट वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
एक्सपर्टच्यामते मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी स्पिअरमिंट टी गुणकारी ठरते. यासोबतच पोट, कंबर आणि नितंबांभोवती जमा झालेली चरबी कमी होण्यासही मदत होते. त्यात रोझमॅरिनिक अॅसिड असते ज्यामुळे जळजळीचा त्रास कमी होतो. स्पीयरमिंटला माउंटन मिंट देखील म्हणतात.
दंड खूपच जाड, गुबगुबीत दिसतात? स्लिव्हजलेस घालणं टाळता; ४ उपाय, टोन्ड दिसतील आर्म्स
त्याची पाने थोडी मोठी असून त्यात औषधी गुणधर्म आढळतात. हे पचनासाठी खूप चांगले मानले जाते. हे इस्ट्रोजेन पातळी देखील कमी करते तसेच थायरॉईड कार्य सुधारते. हा चहा बनवण्यासाठी १ टी स्पून स्पिअरमिंटच्या पानांना १ कप पाण्यात उकळून घ्या नंतर गाळून संध्याकाळी या चहाचे सेवन करा.