Join us  

पोट सुटतंच चाललं? वजन कमी होत नाही? रोज ५ व्यायाम घरीच करा; स्लिम-फिट दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 2:09 PM

Weight Loss Tips : ५ व्यायाम प्रकार इतके सोपे असतात की तुम्ही घरच्याघरीसुद्धा करू शकता.

बसून बसून वजन वाढलंय , पोट बाहेर आलंय अशा समस्या अनेकांना जाणवतात.(Weight Loss Tips)  जीमला जायला वेळ मिळत नाही, अशावेळी काहीजणी वजन कमी करण्यासाठी खाणं कमी करतात. योग्य माहितीच्या अभावामुळे जेवण कमी केल्यानं पोषक तत्वांची कमतरता जाणवते. महिलांमध्ये सध्या पिलाटेस व्यायामाचा क्रेझ सध्या वाढत आहे. यात अशा व्यायाम प्रकारांचा समावेश असतो. ज्यामुळे संपूर्ण शरीराची हालचाल होते आणि फिजिकल स्ट्रेंथ, फ्लेक्सिबिलीटी वाढते. याव्यतिरिक्त पिलाटेस् व्यायामांमुळे मसल्स मजबूत होतात. (Tips to help you lose weight by fitness expert yasmin karachivala)

५ व्यायामप्रकार इतके सोपे असतात की तुम्ही घरच्याघरीसुद्धा करू शकता. फिटनेस एक्सपर्ट यास्मीन कराची वाला यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.  दीपिका पादूकोण, आलिया, कॅटरिना कैफ आणि वणी कपूर यांसारख्या सेलिब्रिटीजना फिटनेस ट्रेनिंग देणाऱ्या यास्मिन सोशल मीडियावर बऱ्याच एक्टिव्ह असतात. फिटनेसचे अनेक व्हिडिओ त्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. व्यायामाचा फोटो शेअर करताना त्यांनी लिहिलं की, बिगिनर्ससाठी हा बेस्ट व्यायाम आहे. पिलाटेस व्यायाम कधीही, कुठेही केले जाऊ शकतात हा व्यायाम तुम्ही घरच्याघरीसुद्धा करू शकता.

ब्रिज एक्सरसाईज

आपल्या पाठीवर झोपा, गुडघे वाकवून पाय जमिनीवर सरळ करा, तळवे उघडून हात जमिनीवर ठेवा. खालचा भाग हळू हळू वर करा, खांदे आणि डोके जमिनीवर ठेवा, 2 सेकंद तसेच राहा आणि नंतर हळू हळू खाली या, दररोज 10 ते 20 वेळा या व्यायामाची पुनरावृत्ती करा.

2) सिंगल लेग सर्कल एक्सरसाईज

आडवं झोपून पाय वर खाली केल्यानं हा व्यायाम पूर्ण होतो. पोटाचे, पायांचे स्नायूसुद्धा टोन्ड होतात. २० वेळा ३ सेट्स एका दिवसाला तुम्ही करू शकता.

३) हंड्रेड व्यायाम (Hundred)

सर्व प्रथम आपल्या पाठीवर झोपा. गुडघे ९० अंशाच्या कोनात न्या. शरीर वरच्या दिशेने ठेवा. आता समोरच्या दिशेने हात पसरवा आणि त्यांना वर आणि खाली हलवा. काही वेळ या स्थितीत थांबा. नंतर पाय समोरच्या दिशेने पसरवा. मग आधीच्या  स्थितीत या.  हा व्यायाम किमान 10 वेळा पुन्हा करा.

४) साईट लेग किक्स एक्सरसाईज

आधी जमिनीवर झोपा. उजव्या हाताच्या मदतीने शरीर वर करा. डावा हात कोपरापासून वाकवून डोक्याच्या मागे ठेवा. आता उजव्या पायाने पुढे आणि मागे लाथ मारा. हा व्यायाम दुसऱ्या बाजूनेही करा.

५) स्वान एक्सरसाईज

 पाठीवर झोपा, हात समोरच्या दिशेने वळवा. त्यानंतर हातांच्या मदतीने शरीर वरच्या बाजूला करा. आता खाली या आणि जमिनीवर कपाळाला स्पर्श करा. हा व्यायाम अनेक वेळा करा.

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्स