Lokmat Sakhi >Fitness > Weight Loss Tips : 'या' ४ चुकांमुळे कमी होता होत नाही पोटावरची चरबी; झटपट रिझल्ट मिळवण्यासाठी या घ्या टिप्स

Weight Loss Tips : 'या' ४ चुकांमुळे कमी होता होत नाही पोटावरची चरबी; झटपट रिझल्ट मिळवण्यासाठी या घ्या टिप्स

Weight Loss Tips : घराघरोच्या बायकांची तक्रार असते की कमी खाल्लं, प्रमाणात खाल्लं तरी पोट, मांड्या, आर्म फॅट वाढत जातंय.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 04:02 PM2021-12-23T16:02:00+5:302021-12-23T16:45:37+5:30

Weight Loss Tips : घराघरोच्या बायकांची तक्रार असते की कमी खाल्लं, प्रमाणात खाल्लं तरी पोट, मांड्या, आर्म फॅट वाढत जातंय.

Weight Loss Tips : Weight loss mistakes these mistakes do not get success in weight loss | Weight Loss Tips : 'या' ४ चुकांमुळे कमी होता होत नाही पोटावरची चरबी; झटपट रिझल्ट मिळवण्यासाठी या घ्या टिप्स

Weight Loss Tips : 'या' ४ चुकांमुळे कमी होता होत नाही पोटावरची चरबी; झटपट रिझल्ट मिळवण्यासाठी या घ्या टिप्स

बहुतेक लोक वजन कमी करण्यासाठी लाखो प्रयत्न करतात, पण यश मिळत नाही. तुमच्यासोबतही हे घडत असेल तर हे विचार करायला लावणारा आहे. खरं तर वजन कमी करताना काही गोष्टींची काळजी घेणंही गरजेचं आहे. वजन कमी  करण्याच्या प्रयत्नात असताना अनेक चुका होतात त्यामुळे प्रयत्न वाया जातात. (Weight Loss Tips) आरोग्य तज्ञ म्हणतात की तंदुरुस्त आणि निरोगी शरीर एखाद्याचे व्यक्तिमत्व पूर्णपणे बदलण्यासाठी पुरेसे आहे. जर तुम्हाला वजन कमी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही काही गोष्टींकडे बारकाईनं लक्ष द्यायला हवं. (How to weight lose faster)

घराघरोच्या बायकांची तक्रार असते की कमी खाल्लं, प्रमाणात खाल्लं तरी पोट, मांड्या, आर्म फॅट वाढत जातंय. व्यायाम करूनही उपयोग होत नाही. आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की तंदुरुस्त आणि निरोगी शरीर एखाद्याचे व्यक्तिमत्व पूर्णपणे बदलण्यासाठी पुरेसे आहे. जर तुम्हाला वजन कमी करण्याची इच्छा असेल, तर आम्ही  काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. अन्यथा वजन कमी करण्याची तुमची सर्व मेहनत वाया जाऊ शकते. 

प्रथिने योग्य प्रमाणात खाणे खूप महत्वाचे आहे

आरोग्य तज्ज्ञ शिफारस करतात की ज्या दिवसापासून तुम्ही वजन कमी करण्यासाठी कठोर परिश्रम सुरू कराल, त्या दिवसापासून तुम्ही प्रथिनेयुक्त अन्नाचा आहारात समावेश करावा, कारण प्रथिने पेप्टाइड्स कमी करण्यास मदत करतात. वजन कमी करताना, ते स्नायूंच्या वस्तुमानाचे रक्षण करते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर प्रथिनेयुक्त अन्न नक्कीच खा.

कॅलरीजकडे लक्ष द्या

तुम्ही जे पदार्थ खात आहात त्याची क्वाटिटी आणि त्यात असलेल्या कॅलरीजचे प्रमाणा तपासले पाहिजे. तुम्ही जे खात आहात त्यात किती कॅलरीज आहेत आणि ते अन्न आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे. हे पाहायला हवं. असं केल्याने तुम्ही जास्त कॅलरी खाणे टाळाल, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.

रोजचं रूटीन तयार करा

आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर यासाठी तुमची दिनचर्या महत्त्वाची भूमिका बजावते. जर तुम्ही रात्री उशिरापर्यंत झोपत असाल  तर तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रयत्नात समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा. संपूर्ण दिवसाचे वेळापत्रक ठरवून तुम्ही दैनंदिन दिनचर्या तयार करू शकता.

व्यायाम करताना या गोष्टींची काळजी घ्या

बहुतेक लोक संतुलित व्यायाम करण्याऐवजी वजन कमी करण्यासाठी अधिक व्यायाम करू लागतात. व्यायाम करताना तुमच्या प्रशिक्षकाचा सल्ला नेहमी घेत राहा आणि वेळ निश्चित करा. जर नवीन व्यक्ती व्यायाम सुरू करत असेल तर त्याने विशेष काळजी घेतली पाहिजे की वजन कमी करण्यासाठी केला जाणारा व्यायाम गरजेपेक्षा जास्त किंवा कमीही नसावा.
 

Web Title: Weight Loss Tips : Weight loss mistakes these mistakes do not get success in weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.