Join us  

महिन्याभरात झरझर घटेल वजन; तज्ज्ञांनी सांगितला वेट लॉसचा अस्सल उपाय, दिसाल स्लिम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 4:11 PM

Weight Loss Tips : जीममध्ये घाम गाळण्यापासून डाएटपर्यंत सर्वकाही करण्याची आपली तयारी असते. तरिही जास्तीत जास्त लोकांना याचा उपयोग झालेला दिसत नाही.

शरीर निरोगी ठेवण्यासाठी वजन कमी करणं आवश्यक असतं. जसजसं तुमचं वजन वाढत जातं तसतसं तुम्हाला गंभीर आजार होण्याची शक्यता जास्त असते. (How To Lose Weight Fast) हायपरटेंशनपासून डायबिटीस आणि अनेक प्रकारचे आजार जास्त वजनामुळे  होऊ शकतात. याच कारणामुळे तज्ज्ञ सर्वांनाच वजन कमी करण्याचा सल्ला देतात. तज्ज्ञ सांगतात की वजन कमी करण्यासाठी आपण प्रत्येक प्रकारे उपाय करतो. (Weight Loss Tips)

जीममध्ये घाम गाळण्यापासून डाएटपर्यंत सर्वकाही करण्याची आपली तयारी असते. तरीही जास्तीत जास्त लोकांना याचा उपयोग झालेला दिसत नाही.  म्हणूनच वाढत्या वजनाला रोखण्यासाठी काही घरगुती उपाय करायला हवेत.  तज्ज्ञ सांगतात की वजन कमी करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतो. आहार बदलण्यापासून जीमपर्यंत.

वजन कमी कसे करायचे

न्युट्रिशनिस्ट प्रियांका सांगतात की वेट लॉसचा मूलमंत्र एकच आहे. तुम्ही दिवसभरात जितक्या कॅलरीज बर्न करता त्याच्या तुलनेत कमी कॅलरीजचे सेवन करा.  कमी कॅलरीजयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. असे पदार्थ पचायलाही चांगले असतात. ज्यामुळे लवकर भूक  लागत नाही. जर तुम्ही बर्न करण्यापेक्षा अधिक कॅलरीज घेत असाल तर निश्चितच वजन वाढू शकतं.

कॅलरी इन्टेक कमी करण्याच्या २ पद्धती आहेत. तुम्ही किती खाता याचा मागोवा घेणं आणि नियमित व्यायाम करणं. कॅलरीज इन्टेक कमी करण्यासाठी तुम्ही साखर-मीठयुक्त पदार्थांचे सेवन करू शकता. या आहाराचं पालन  करून तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता. 

आहारात बदल करून वजन कमी करता येत नाही.  कॅलरी जाळण्यासाठी तुम्हाला व्यायाम करणे आवश्यक आहे. योगा-व्यायामाला हा नित्यक्रमाचा एक भाग बनवून तुम्हाला वजन कमी करण्यात फायदे मिळू शकतात.  कॅलरीजचे सेवन कमी करणे आणि नियमित व्यायामाची सवय लावून घेतल्याने महिन्याभरात वजन कमी करण्याचे फायदे मिळू शकतात.

वजन कमी करण्यासाठी व्यायाम सुरू करण्याआधी ब्लॅक कॉफी घ्या.  त्याबरोबर तुम्ही सफरचंद खाऊ शकता. दोरी उड्या, जंपिंग जॅक, माऊटेन क्लाईंब, शोल्डर टॅप हे व्यायाम घरीच करून तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता. घरच्याघरी स्वॅक्टस, क्रंचेस हे पोटाचे व्यायाम करून वजन नियंत्रणात ठेवू शकता.

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य