Join us  

ढेरी दिवसेंदिवस वाढत चाल्लीये? १ चमचा आळशीच्या बियांचा खास उपाय, स्लिम-फिट दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 11:11 AM

Weight Loss Tips :   एकदा वजन वाढलं की कितीही प्रयत्न केले तरी कमी होत नाही.

एकदा वजन वाढलं की ते कमी करणं खूपच कठीण होतं. आजकालच्या धावपळीच्या जीवनात व्यायाम करायला फारसा वेळ मिळत नाही. अशात लोक लठ्ठपणाचे शिकार होतात. तासनतास बसून काम केल्यानं वजन वाढत जातं. (Weight Loss Tips)  एकदा वजन वाढलं की कितीही प्रयत्न केले तरी कमी होत नाही. काही हेल्दी पदार्थांचा आहारात समावेश केला तर वजन वाढण्याच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता. वजन कमी करण्यासाठी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करायचा ते समजून घेऊया. (Weight loss tips seeds in the diet for fast weight loss flax seeds)

आळशीच्या बीया

आळशीच्या बीयांमध्ये अनेक आरोग्यवर्धक गुणधर्म आहेत. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी तुम्ही आळशीच्या बीयांचा आहारात समावेश करू शकता.  ओमेगा ३ फॅट तुमच्या शरीरातील चरबी जाळण्याचे काम करते. याशिवाय जवसामध्ये भरपूर लोह, प्रोटीन आणि फायबर असते. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. अशावेळी जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर तुम्ही फ्लेक्ससीडचे सेवन करू शकता.  स्मूदीमध्ये, पेयांमध्ये, भाज्यांमध्ये आळशी खाऊ शकता.

सुर्यफुलाच्या बिया

वजन कमी करण्यासाठी सूर्यफुलाच्या बिया खूप फायदेशीर आहेत. तुम्ही  सॅलेड किंवा सूपमध्ये घालून खाऊ शकता. .याचे सेवन केल्याने तुमच्या शरीरातील उच्च कॅलरीज बर्न होतात. यामुळे तुमचे वाढते वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.

चिया सिड्स

चिया  सिड्स वजन कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी आहेत. कारण ते तुमची भूक कमी करण्यास मदत करते. म्हणूनच याचे सेवन केल्याने जास्त वेळ भूक लागत नाही. चिया बियांमध्ये प्रथिने देखील भरपूर असतात ज्यामुळे पचन मंद होते. (Weight Loss Tips) जर पचन मंद असेल तर पुन्हा पुन्हा भूक लागत नाही आणि जास्त खाण्याची शक्यता कमी होते. याशिवाय, चिया सिड्स खाल्ल्यानंतर साखरयुक्त पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही. वजन कमी करण्यासाठी साखरयुक्त पदार्थांपासून दूर राहणे देखील महत्त्वाचे आहे.

वजन कमी करण्याच्या आहारात चिया सिड्स समाविष्ट करण्यासाठी, तुम्ही ते वेगवेगळ्या प्रकारे खाऊ आणि पिऊ शकता. या बियांची चव सौम्य आहे, त्यामुळे त्यांना कोणत्याही डिश किंवा रेसिपीचा भाग बनवण्यापूर्वी जास्त विचार करण्याची गरज नाही.

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य