Lokmat Sakhi >Fitness > फक्त १ चमचा पावडर कोमट पाण्यात घालून रोज प्या! घ्या वजन कमी करणाऱ्या पावडरची कृती

फक्त १ चमचा पावडर कोमट पाण्यात घालून रोज प्या! घ्या वजन कमी करणाऱ्या पावडरची कृती

Weight loss: Try these effective fat burning drink recipes at home वजन कमी काही लवकर होत नाही, विकतचे काही धोकादायक! त्यामुळे ही घ्या एक खास पावडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2023 03:38 PM2023-07-25T15:38:18+5:302023-07-25T16:18:38+5:30

Weight loss: Try these effective fat burning drink recipes at home वजन कमी काही लवकर होत नाही, विकतचे काही धोकादायक! त्यामुळे ही घ्या एक खास पावडर

Weight loss: Try these effective fat burning drink recipes at home | फक्त १ चमचा पावडर कोमट पाण्यात घालून रोज प्या! घ्या वजन कमी करणाऱ्या पावडरची कृती

फक्त १ चमचा पावडर कोमट पाण्यात घालून रोज प्या! घ्या वजन कमी करणाऱ्या पावडरची कृती

बिघडलेल्या जीवनशैलीमुळे आरोग्याचे तीन - तेरा वाजलेत. कळत - नकळत आपल्याकडून होणाऱ्या चुका या अनेक गंभीर आजारांसाठी कारणीभूत ठरतात. ज्यात लठ्ठपणाचा देखील समावेश आहे. प्रत्येकाला फिट व्हायचं आहे. पण स्वतःच्या शरीरासाठी वेळ काढणं अनेकांना जमत नाही.

वजन नियंत्रणात राहावे, यासाठी काही जण जिम, डाएट या सगळ्या गोष्टी फॉलो करतात. पण जिम आणि डाएट फॉलो करूनही जर आपले वजन आणि सुटलेलं पोट कमी होत नसेल तर, वेट लॉस ड्रिंक घ्यायला सुरुवात करा. वेट लॉस ड्रिंकची रेसिपी आहारतज्ज्ञ मनप्रित कालरा यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यासह त्यांनी वेट लॉस ड्रिंकचे फायदेही शेअर केले आहे(Weight loss: Try these effective fat burning drink recipes at home ).

वेट लॉस ड्रिंक करण्यासाठी लागणारं साहित्य

2 टीस्पून मेथी दाणे पावडर

2 टीस्पून बडीशेप पावडर

2 टीस्पून सुठींची पावडर

नाश्त्यात करा ५ सोपे बदल, पोटावरची चरबी कमी होईल लवकर, वजनही येईल आवक्यात

2 टीस्पून दालचिनीची पावडर

अर्धा चमचा रॉक मीठ

लिंबाचा रस

कृती

एका काचेच्या बरणीत 2 टीस्पून मेथी दाणे पावडर, 2 टीस्पून बडीशेप पावडर, २ टीस्पून सुठींची पावडर, 2 टीस्पून दालचिनी पावडर, अर्धा चमचा रॉक मीठ घालून पावडर मिक्स करा. अशा प्रकारे आपली वेट लॉस पावडर रेडी.

वेट लॉस ड्रिंक घेण्याची योग्य पद्धत

एका ग्लासमध्ये कोमट पाणी घ्या, या पाण्यात एक चमचा वेट लॉस पावडर मिक्स करा, मिक्स केल्यानंतर त्यात एक चमचा लिंबाचा रस मिसळा. अशा प्रकारे वेट लॉस ड्रिंक रेडी. आपण ही ड्रिंक दुपारचे जेवण करण्यापूर्वी पिऊ शकता. 

दालचिनी, मेथी आणि बडीशेपचे फायदे

दालचिनी

दालचिनीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरीसोबतच अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. दालचिनी खाल्ल्याने चयापचयची गती वाढते. ज्यामुळे वजन लवकर कमी होण्यास मदत होते.

काटेकोर डाएट- भरपूर व्यायाम करुनही वजन कमीच होत नाही? कारण ५ चुका, त्या टाळल्या नाहीतर..

मेथीच्या बिया

मेथीमध्ये फायबर, लोह, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन डीचे प्रमाण अधिक असते. मेथी दाणे खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. ज्यामुळे पोटाची चरबी कमी होते.

बडीशेप

बडीशेपमध्ये फायबर आणि मिनरल्स जास्त असतात. जे शरीराची जीवनसत्त्वे आणि खनिजे शोषून घेण्याची क्षमता वाढवते, ज्यामुळे शरीरातील फॅट्स कमी होतात.

Web Title: Weight loss: Try these effective fat burning drink recipes at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.