Join us  

हातपाय सडपातळ पण पोट वाढतच चाललंय? खाऊन पाहा कडीपत्त्याची पानं, काही महिन्यात पोट सपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2023 2:04 PM

Weight loss: Want to burn fat? Chew on curry leaves! : पोटाची चरबी कमी करण्यासाठी नियमित खा कडीपत्त्याची पानं, दिसाल सुडौल-फिट

पोटाची चरबी ही शरीरातील सर्वात हट्टी चरबी मानली जाते. जी सहसा लवकर कमी होत नाही. अनेकांचं शरीर सडपातळ पण पोटाचा आकार हा वाढत जातो. पोटाची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय करून पाहतो. उपयांसह व्यायाम आणि योग्य डाएट देखील तितकंच गरजेचं आहे.

शरीरातील चरबी कमी करण्यासाठी आपण अनेक मसाल्यांचा वापर करून पाहतो. अनेक लोकं मसाल्यांचा वापर करून वेट लॉस ड्रिंक तयार करतात. पण स्वयंपाकघरात अशी काही पाने असतात, ज्यांचा योग्य वापर केल्यास पोटाची चरबी सहज कमी होऊ शकते(Weight loss: Want to burn fat? Chew on curry leaves!).

या पानांचा वापर सहसा फोडणीत केला जातो. हो, तुम्ही बरोबर ओळखलं, कडीपत्त्याचा वापर करून आपण वजन कमी करू शकता. कडीपत्त्याचा वापर फक्त फोडणीसाठी होत नसून, वजन कमी करण्यासाठीही होऊ शकतो. पोटाची चरबी कमी करण्यासाठी कडीपत्त्याचा वापर कसा करावा याची माहिती गट हेल्थ कोच व पोषणतज्ज्ञ मनप्रीत यांनी दिली आहे.

वजन कमी करायचं? मग खा सिमला मिरची! - वजन कमी करण्याचा एकदम सोपा आणि असरदार इलाज

बेली फॅट कमी करण्यासाठी कडीपत्त्याचा वापर

- कडीपत्त्याचा वापर वजन कमी करण्यासाठी होऊ शकतो. कडीपत्त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि ई सोबत अनेक अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात. यामध्ये आयर्न, लोह आणि फायबरचे प्रमाणही जास्त असते.

- कडीपत्ता पचन सुधारण्यास यासह चयापचय वाढवण्यास मदत करते. यासह शरीराला डिटॉक्स करण्याचेही काम करते.

- कढीपत्ता पोटाला थंडावा देते. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते व फॅट बर्न करण्याचं काम करते.

वजन कमी करायचं असेल तर रात्री खा ३ पौष्टीक चटकदार सॅलेड, वजन होईल कमी

- नियमित कडीपत्ता खाल्ल्याने बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. कडीपत्त्यात अँटी-ओबेसिटी, व दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात. मधुमेह असलेल्या लोकांसाठी कडीपत्ता फायदेशीर ठरते.

वजन कमी करण्यासाठी कडीपत्ता कसा खावा?

- आपण रिकाम्या पोटी नियमित ३ ते ४ कडीपत्त्याची पानं चावून खाऊ शकता.

- कडीपत्त्याचा ज्यूसही वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. यासाठी एका भांड्यात पाणी घ्या, त्यात १० ते १५ कडीपत्त्याची पानं घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर, एका ग्लासमध्ये पाणी गाळून घ्या. त्यात अर्धा चमचा मध आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा. अशा प्रकारे कडीपत्त्याचा वेट लॉस ज्यूस तयार.

- आपण कडीपत्त्याचा चहा देखील तयार करू शकता. यासाठी एका भांड्यात पाणी उकळवत ठेवा. त्यात १० ते १५ कडीपत्त्याची पानं, आल्याचा छोटा तुकडा घालून पाण्याला उकळी येऊ द्या. नंतर गॅस बंद करा. ग्लासमध्ये पाणी गाळून घ्या. त्यात लिंबाचा रस घालून मिक्स करा. अशा प्रकारे कडीपत्त्याचा वेट लॉस चहा रेडी.

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स