Join us  

व्यायाम आणि डाएटसाठी वेळच नाही? जिममध्ये न जाता फक्त ५ गोष्टी करा; व्यायामाशिवाय वजन घटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2024 4:17 PM

Weight loss without workout: 8 ways to shed kilos if you can't sweat it out this Monsoon : दिवसभरात ५ गोष्टी न चुकता करा; वजन कमी होणारच

प्रत्येकाला तंदुरुस्त राहायचं आहे. पण व्यायाम आणि डाएटसाठी पुरेसा वेळ मिळत नाही (CookinG tips). या दोन्ही गोष्टी सोप्या नाहीत. कधी तोंडाचा ताबा सुटतो, तर कधी व्यायाम करण्यास वेळ मिळत नाही (Food). ज्यामुळे फिटनेस गोल आपला कधीच पूर्ण होत नाही.

जर आपल्याला डाएट आणि व्यायाम करायला वेळ मिळत नसेल तर, जीवनशैलीत काही बदल करून पाहा. काही महिन्यात आपल्या शरीरात बदल दिसतील. शिवाय वजन देखील नियंत्रणात राहील. उत्तम आरोग्य हवं असेल तर, जीवनशैलीत हे बदल नक्कीच करून पाहा(Weight loss without workout: 8 ways to shed kilos if you can't sweat it out this Monsoon).

तेलकट अन्न खाणं टाळा

जर आपल्याला डाएट फॉलो करायला जमत नसेल तर, तेलकट पदार्थ खाणं टाळावे. तेलकट अन्नामध्ये जास्त कॅलरीज असतात, ज्यामुळे वजन झपाट्याने वाढू शकते. शिवाय, त्याचे सेवन आपल्या आरोग्यासाठी देखील चांगले नाही. त्यामुळे तुम्हाला अतिरिक्त कॅलरीयुक्त पदार्थ आणि अति खाणे टाळावे लागेल.

२ बाळंतपणात वाढललेलं २३ किलो वजन कसं कमी केलं, नेहा धुपिया सांगते, आई झाल्यावर..

३० मिनिटे चाला

जर आपल्याला डाएट करणं अश्यक असेल तर, ३० मिनिटे रोज चाला. यामुळे वजन कानी करण्यास मदत होईल. ३० मिनिटे चालल्याने आरोग्याला बराच फायदा होतो. यामुळे मधुमेह, हृदय, ब्लड प्रेशर यासह मेण्टल हेल्थही उत्तम राहते.

६ -८ कोमट पाणी प्या

दररोज दिवसभरात ६ - ८ ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे शरीर डिटॉक्स होईल. याशिवाय शरीरात चरबी जमा होणार नाही आणि फॅट लॉसही होईल. नियमित कोमट पाणी प्यायल्याने चयापचय वाढते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.

जास्त कॅलरी टाळा

जेवणाच्या एक तास आधी अर्धा लिटर पाणी प्या. यामुळे आपली भूक काही प्रमाणात कमी होईल. असे केल्याने पोट भरेल, ज्यामुळे आपण जास्त खाणं टाळाल. पण जेवणानंतर किंवा जेवणादरम्यान लगेच पाणी पिऊ नका.

आजपासून रोज करा फक्त ३ गोष्टी, महिनाभरात थुलथुलीत पोट आणि कंबरेची साइज होईल कमी

ब्लॅक कॉफी प्या

दिवसभरात एक ते दोन ब्लॅक कॉफी प्या. त्यात साखर घालू नये.  वजन कमी करण्यासाठी कॉफी हा एक उत्तम उपाय आहे. कारण त्यात अँटिऑक्सिडंट्स असतात. जे फॅट लॉससाठी मदत करतात. 

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्सव्यायाम