Join us  

जेवल्यानंतर फक्त १५ मिनिटं एक काम करा; झरझर घटेल वजन- कायम दिसाल मेंटेन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2023 2:23 PM

Weight loss yoga vajrasana : यामुळे पोटाची चरबी तर कमी होतेच, शिवाय रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यासही मदत होते.

वजन कमी करणं ही सध्याच्या स्थितीतील एक मोठी समस्या बनली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या समस्यांचा सामना  करावा लागतो. लठ्ठपणामुळे बॅड कोलेस्टेरॉल, हाय ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, हार्ट फेलिअर, कोरोनरी आर्टरी डिजीज आणि ट्रिपल वेसल डिजीजचा धोका वाढतो. (Weight loss yoga tips)

मेंटेन राहण्यासाठी आणि अन्नाचं पचन व्यवस्थित होण्यासाठी अनेकजण चालायला जातात. पण पावसाळ्यात जर तुम्हाल घराबाहेर पडण्याच कंटाळा येत असेल किंवा व्यायामासाठी बाहेर जाणं शक्य होत नसेल तर वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही योगाची मदत घेऊ शकतो. (Weight loss yoga vajrasana for 15 minute afer your meal food can help in burning belly fat)

वज्रासननामुळे वजन कमी केलं जाऊ शकतं. आता प्रत्येकाला सकाळी योगासनं करण्यासाठी पुरेसा वेळ नसतो कारण त्यावेळी कामं आवरण्याची घाई असते, अशा स्थितीत तुम्ही जेवणानंतर योगा करू शकतात. यामुळे पोटाची चरबी तर कमी होतेच, शिवाय रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यासही मदत होते. वज्रासन पचन आणि स्नायूंना शक्ती देते, म्हणून याला वज्रासन म्हणतात.

वज्रासनासाठी १५ मिनिटांचा वेळ काढा

दुपारच्या जेवणानंतर १५ मिनिटं स्वत:साठी वेळ काढा. जर तुम्ही ऑफिसला असाल तरीही ब्रेक घेऊन वज्रासन करू शकता.  या आसनाने शरीराला बरेच फायदे मिळतील. यामुळे पचनक्रीया चांगली राहील. ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं. जे लोक तासनतास एकाच जागी बसून काम करतात त्यांच्यासाठी वज्रासन फायदेशीर ठरतं. यामुळे पायांच्या मसल्सवर एक्स्ट्रा प्रेशर येतं. ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं. जर तुम्ही रेग्युलर बेसिसवर स्वत:वर काम केले तर बॉडी शेपमध्ये येते. 

वज्रासनाचे फायदे

वज्रासनाने वजन कमी करण्यास आणि शरीर फिट राहण्यास मदत होते. मन शांत राहते आणि मेंदूसुद्धा शांत राहतो. यामुळे दृष्टी सुधारण्यासही मदत होते, अन्न पचण्यास मदत होते, गॅसची समस्या दूर होते, कंबर, गुडघे आणि पाय मजबूत होतात, शरीरात ब्लड सर्क्युलेशन सुधारते आणि आजारांचा धोका टळतो, वज्रासनात बसल्यानं पचनक्रिया चांगली राहते, नियमित हे आसन केल्यानं एनर्जी लेव्हल चांगली राहते, वज्रासनात बसल्यानं पोस्चर स्ट्रेच राहते. 

टॅग्स :हेल्थ टिप्सफिटनेस टिप्सआरोग्य