Lokmat Sakhi >Fitness > शिल्पा शेट्टीची कमाल! प्रवासाला निघाली तर बसमध्येच केला दणकून व्यायाम! मंडे मोटिव्हेशन - बघा व्हिडिओ

शिल्पा शेट्टीची कमाल! प्रवासाला निघाली तर बसमध्येच केला दणकून व्यायाम! मंडे मोटिव्हेशन - बघा व्हिडिओ

Workout By Shilpa Shetty In Bus: काय म्हणतात पॅशन! बिझी शेड्यूलमध्येही मॅडमनी वेळ काढला आणि चक्क रिकाम्या बसमध्येच व्यायाम करायला सुरुवात केली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2022 12:48 PM2022-05-02T12:48:09+5:302022-05-02T12:48:52+5:30

Workout By Shilpa Shetty In Bus: काय म्हणतात पॅशन! बिझी शेड्यूलमध्येही मॅडमनी वेळ काढला आणि चक्क रिकाम्या बसमध्येच व्यायाम करायला सुरुवात केली.

What a passion! Shilpa Shetty is doing her regular workout while travelling in bus, Watch her viral video | शिल्पा शेट्टीची कमाल! प्रवासाला निघाली तर बसमध्येच केला दणकून व्यायाम! मंडे मोटिव्हेशन - बघा व्हिडिओ

शिल्पा शेट्टीची कमाल! प्रवासाला निघाली तर बसमध्येच केला दणकून व्यायाम! मंडे मोटिव्हेशन - बघा व्हिडिओ

Highlightsइथून पुढे जर व्यायामासाठी वेळ नाही, असं सांगणार असाल तर शिल्पाचा हा व्हिडिओ एकदा आवर्जून बघाच.

शिल्पा शेट्टी तिच्या व्यायामाच्या बाबतीत किती शिस्तप्रिय आहे, हे तर आपण जाणतोच.. तिच्या या शिस्तीमुळेच तर वयाची पंचेचाळिशी गाठलेली शिल्पा (Shilpa Shetty) या वयातही अगदी स्लिम ट्रिम आणि जबरदस्त फिट आहे. कितीही बिझी शेड्यूल असलं तरी ती थोडा का होईना, पण व्यायाम हमखास करतेच, हे तिने काही दिवसांपुर्वी तिच्या एका पोस्टमध्ये सांगितलं होतं.. आता हेच तिने प्रत्यक्ष करून दाखवलं आहे. सध्या शिल्पाची ही पोस्ट जबरदस्त व्हायरल होत आहे. (Shilpa Shetty's exercise in bus)

 

व्यायाम करण्यासाठी वेळच मिळत नाही, ही अनेकांची सबब. निम्म्यापेक्षा जास्त लोकांचं व्यायाम न करण्यामागचं कारण हेच असतं. अशा लोकांसाठी शिल्पाचा हा व्हिडिओ (viral video) नक्कीच मोटीव्हेशन (fitness motivation) ठरणारा  आहे. त्यामुळे इथून पुढे जर व्यायामासाठी वेळ नाही, असं सांगणार असाल तर शिल्पाचा हा व्हिडिओ एकदा आवर्जून बघाच. कारण आपल्या रुटीन वर्कमध्येही वेळात वेळ काढून व्यायाम करणं कसं शक्य आहे, हे शिल्पाने या व्हिडिओतून दाखवलं आहे. 

 

या व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की शिल्पा कुठेतरी प्रवासात आहे. प्रवासादरम्यान ती विमानतळाच्या एका टर्मिनलवरून दुसऱ्या टर्मिनलमध्ये जाण्यासाठी ज्या बस असतात, त्या बसमध्ये बसलेली आहे. बस तशी रिकामीच आहे. त्यामुळे या रिकाम्या बसचा आणि मिळालेल्या वेळेचा उत्तम उपयोग शिल्पाने व्यायाम करण्यासाठी केला आहे. काही सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये जवळपास ३ वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम तिने दाखवले आहेत.

 

सुरुवातीला बसच्या दरवाजाच्या हँडलला पकडून तिने पुशअप्स आणि पुलअप्स केले. त्यानंतर बसला वरच्या बाजुला जे हॅण्डल्स असतात, त्याला पकडून तिने कंबरेचा एक व्यायाम केला. त्यानंतर चक्क ती एका सीटवर चढली, वरच्या हॅण्डलला पकडले आणि डबलबारवर ज्या पद्धतीने व्यायाम करता येतो, त्या पद्धतीचा व्यायाम केला. एवढंच नाही, तर व्यायाम झाल्यानंतर पर्समधून टिश्यू पेपर काढला आणि व्यायाम करताना जिथे जिथे हात लावला, पाय लावला होता, ती सगळी जागा स्वच्छ पुसूनही घेतली.. खरोखरच व्यायाम आणि फिटनेस याविषयी एवढं जबरदस्त पॅशन असणाऱ्या शिल्पा शेट्टीला सलाम.. 

 

Web Title: What a passion! Shilpa Shetty is doing her regular workout while travelling in bus, Watch her viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.