Join us  

१ आठवडा साखर सोडल्यास शरीरात कोणते बदल होतात? तज्ज्ञांनी सांगितले फायदेच फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2023 1:18 PM

What are the benefits of not eating sugar for a week : आहारात काय खायचं, काय टाळायचं याबाबत लोक खूप सजग झाले आहेत.

फिट आणि हेल्दी राहण्यासाठी लोकांची काहीही करण्याची तयारी असते. कोरोना माहामारीनंतर लोकांमध्ये फिटनेसचं महत्व वाढलं आहे. (Health Tips)  रोजच्या आहारात काय खायचं, काय टाळायचं याबाबत लोक खूप सजग झाले आहेत. १ आठवडा साखर खाणं सोडल्यास किंवा साखरेचं प्रमाण कमी केल्यास तुम्ही फिट आणि हेल्दी राहू शकता. (What happen if you stop eat sugar or less eat sugar for one week see benefits)

डायटिशियन मानसी यांनी इंस्टाग्रामपोस्टवरून याबाबत अधिक माहिती दिली आहे. १ आठवडा साखर खाणं सोडल्यानं शरीराच्या इतर समस्याही कमी होण्यास मदत होईल. आत्मविश्वास वाढतो आणि व्यक्तीमत्वही सुधारते. १ आठवडा साखर खाणं सोडल्यास कोणते बदल दिसतात ते पाहूया. (What are the benefits of not eating sugar for a week)

१) जर तुम्हाला टोन फेस आणि जॉ लाईन हवी असेल तर साखर खाणं कमी करा. जास्त साखरयुक्त पदार्थ खाल्ल्यानं चेहऱ्यावरची सूज वाढते यामुळे चेहरा फुगल्यासारखा दिसतो.

२) साखर खाल्ल्यानं ब्लड शुगर लेव्हल वाढते. यामुळे एनर्जी कमी झाल्यासारखे वाटू  शकते.  जेव्हा तुम्ही पूर्णपणे साखर खाणं सोडता तेव्हा ब्लड शुगर स्टेबल राहण्यास मदत होते आणि एनर्जी, फोकस, काम करण्याची क्षमता सुधारते.

३) साखर अतिप्रमाणात खाल्ल्यानं इंफ्लामेशन वाढते. यामुळे डार्क स्पॉ्टस येऊ शकतात. म्हणूनच शुगर फ्री डाएट घेण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे स्किन डागविरहीत आणि ग्लोईंग दिसते.

 

४) जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर जास्त साखर घातलेली चहा, कॉफी, कोल्डड्रिंक्स, पेस्ट्री, केक्स असे पदार्थ अजिबात खाऊ नका.

५) जास्तीत जास्त आजार हे पोटापासून सुरू होतात. पचनसंस्था खराब होण्यामागे साखर जास्त  खाणं कारणीभूत ठरू शकतं. साखर खाल्ल्यानं पोट फुगणं, गॅस, पोटदुखीच्या वेदना उद्भवतात. जास्त प्रमाणात साखरेचे सेवन केल्यास रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होते. यामुळे कोणतंही संक्रमण होऊन तुम्ही आजारी पडू शकता. साखर कमी केल्यास रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते आणि इम्यूनिटी वाढते.

साखरेला पर्याय म्हणून काय खाता येतं?

कमी प्रमाणात साखर खाल्ल्यास आरोग्याला कोणताही धोका उद्भवत नाही पण जर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त साखर खाल्ली तर डायबिटीस, ओव्हर वेट, स्किनचे आजार अशा समस्या उद्भवतात. साखर खाण्याचे क्रेव्हिग्स जाणवल्यास तुम्ही फळं खाऊ शकतात. यात नैसर्गिक साखर असते यामुळे कोणतंही नुकसान होत नाही उलट शरीराला फायबर्स, व्हिटामीन्स अशी पोषक तत्व मिळतात. साखरेऐवजी गुळाचा चहा किंवा ग्रीन टी घ्या. 

खजूर, मनुके, डार्क चॉकलेट अशा पदार्थांचा आहारात समावेश करा.  जर तुमच्या कुटुंबात कोणालाही डायबिटीस, लठ्ठपणा असेल तर तरूणपणापासूनच तुम्ही पथ्य पाळायला हवीत. शरीर नेहमी एक्टिव्ह ठेवायला हवं. जेणेकरून तुम्हाला भविष्यात हे त्रास उद्भवणार नाहीत.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्य