Join us  

झरझर वजन कमी करण्यासाठी बघा '75' चा नवा फॉर्म्युला, पाहा वेटलॉससाठी नेमकं करायचं काय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2024 9:11 AM

What Is 75 Weight Loss Formula?: वजन कमी करण्यासाठी सोशल मिडियावर सध्या '75' हा नवाच वेटलॉस फॉर्म्युला गाजतो आहे. बघा या पद्धतीने नेमकं कसं वजन कमी करतात....

ठळक मुद्देआता हा वजन कमी करण्याचा नवा ट्रेण्ड कोणता आणि त्यासाठी नेमकं काय करायचं असतं, ते पाहूया...

वजन कमी करण्याच्या बऱ्याच वेगवेगळ्या पद्धती आहेत. कोणी डाएटिंग करून वजन कमी करतं, तर कोणी व्यायामावर लक्ष केंद्रित करून वजनाचा काटा खाली आणतं. आता डाएट कसं करावं, काय खावं- काय टाळावं, याच्याही अनेक पद्धती आहेत. त्या आपल्याला सोशल मिडियावरून किंवा इतर कोणाकडून नेहमीच ऐकायला मिळतात. सध्या वेटलॉसचा नवा ट्रेण्ड सोशल मिडियावर गाजतो आहे. त्याला '75 वेटलॉस फॉर्म्युला' असं म्हणतात (What Is 75 Weight Loss Formula?). आता हा वजन कमी करण्याचा नवा ट्रेण्ड कोणता आणि त्यासाठी नेमकं काय करायचं असतं, ते पाहूया...

 

healthshots.com यांनी दिलेल्या वृत्तानुसार हा वजन कमी करण्याचा हा फॉर्म्युला Andy Frisella यांनी २०१९ यावर्षी तयार केला. या प्लॅनचं वैशिष्ट्य असं की शरीराच्या फिटनेससोबतच मनाच्या आरोग्याचा विचारही यामध्ये करण्यात आला आहे. पुर्णपणे ७५ दिवस न चुकता तुमचं व्यायामाचं आणि आहाराचं पथ्य पाळणे, हा या फॉर्म्युल्याचा पाया आहे.

"ती तर माझ्यापेक्षा खूपच जास्त....", बघा ऐश्वर्याची लेक आराध्या बच्चनबाबत बोलताना काय म्हणाली नव्या नवेली 

यामध्ये आपल्याला एक डाएट प्लॅन दिला जातो आणि दिवसातून दोन वेळा व्यायाम सांगितला जातो. यापैकी एका वेळचा व्यायाम तुम्हाला घराबाहेर पडून करणे अनिवार्य आहे. घराबाहेर पडून, निसर्गाच्या सानिध्यात मोकळ्या हवेत जाऊन मन फ्रेश व्हावं, मानसिक स्वास्थ्य उत्तम रहावं, यासाठी हा नियम ठरविण्यात आला आहे.

 

या वेटलॉस प्लॅनचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या प्लॅनमध्ये तुम्हाला रोजचा तुमचा थोडा वेळ वाचन करण्यासाठी राखून ठेवायचा आहे.

वजन, शुगर वाढेल म्हणून आंबा खात नसाल तर अमेरिकन डायबेटिक असोसिशनचा हा सल्ला वाचाच....

हा प्लॅन फॉलो करणाऱ्या लोकांचा सोशल मिडियावर एक ग्रुप तयार करण्यात आला असून तुम्हाला तुमचा रोजचा आहार, व्यायाम, वाचन अशा सगळ्या गोष्टी त्या ग्रुपवर शेअर करायच्या असतात. यामुळे आपोआपच आपण शिस्तीत लागतो आणि इतरांचे पाहून प्रोत्साहित होतो, असं त्यामध्ये सांगितलं आहे. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामआहार योजनावेट लॉस टिप्स