आपल्या शरीराच्या कमरे खालील भागाला तसेच स्नायूंना मजबूत करण्यासाठी खास लंज वर्कआऊट किंवा एक्सरसाइज केले जातात.लंज वर्कआऊट केल्यामुळे आपले शरीर लवचिक बनते त्याचबरोबर आपला स्ट्रेसदेखील कमी होतो. आपल्यापैकी काहीजण फिट राहण्याच्या नादात फकत अप्पर बॉडीवरच (Upper Body) लक्ष केंद्रित करतात. परंतु असे न करता फिट राहण्यासाठी आपल्याला संपूर्ण बॉडीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. एखाद्या झाडाची जर मूळ मजबूत असतील तर त्याचा मोठा वृक्ष होऊ शकतो. तसेच अप्पर बॉडीसोबतच लोअर बॉडी देखील मजबूत असणे गरजेचे आहे.
लोअर बॉडी वर्कआऊट केल्यामुळे आपले पाय, हीप्स, तळवे, मांड्या अशा सर्व अवयवांचा एक्सरसाइज केला जातो. सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने आपल्या इंस्टाग्राम पेजवरून लंज वर्कआऊट कसे करावेत याबद्दलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे(How To Do Walking Lunges).
लंज एक्सरसाइज म्हणजे नेमकं काय ?
लोअर बॉडीमधील सर्वात महत्वाचे मसल्स जसे की, ग्लूट्स (glutes), क्वाड्रिसेप्स (quadriceps), हॅमस्ट्रिंग्स (hamstrings) मसल्स टोन्ड करण्यासाठी लंज एक्सरसाइज करणे फायदेशीर ठरते. लंज एक्सरसाइज या पायाच्या सगळ्यांत कठीण एक्सरसाइजपैकी एक आहे. कारण ही एक्सरसाइज करताना पायांतील मसल्स अधिक ताणले जातात. पायांच्या मसल्ससोबतच काफ (calf) आणि कोर (core) भागांवर देखील परिमाणकारक ठरते. लंज एक्सरसाइजचे अनेक प्रकार आहेत. जर आपण लंज एक्सरसाइज करण्यासाठी नवखे असाल तर आपण सिंपल लंज एक्सरसाइज करण्याने सुरुवात करावी. जर आपण नियमित जिम करणारे असाल किंवा लंज एक्सरसाइजशी परिचित असाल तर आपण ऍडव्हान्स लेव्हलच्या लंज एक्सरसाइज करू शकता.
बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हीने आपल्या इंस्टाग्राम पेजवरून लंज एक्सरसाइज म्हणजे काय, वॉकिंग लंजेस कसे करावे आणि वॉकिंग लंजेसचे फायदे काय आहेत याबद्दलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
वॉकिंग लंजेस कसे करावे ?
१. सर्वप्रथम ताठ उभे राहा. दोन्ही पायांत थोडं अंतर ठेवा (खांद्यांइतक अंतर ठेवा.) दोन्ही हात कंबरेवर ठेवा.
२. आता उजवा पाय पुढे टाका. त्याचवेळी डावा पाय गुडघ्यातून दुमडा, डावा पाय दुमडून जमिनीच्या दिशेने खाली झुकवा.
३. अशापद्धतीने पाय आलटून - पालटून आपल्याला पुढे चालत जायचे आहे.
४. प्रत्येक पायाचे किमान १० ते १५ रिपीटेशन्स करा.
५. हा व्यायाम आणखीन अवघड करायचा असल्यालस दोन्ही हातात छोटेसे डंबेल्स घेऊन देखील तुम्ही चालू शकता.
६. असे रिव्हर्स वॉकिंग लंजेस देखील तुम्ही करू शकता.
वॉकिंग लंजेस करण्याचे फायदे...
१. पायांत ताकद येईल.
२. मांड्या ताकदवान होतील.
३. मेटॅबॉलिझम सुधारते.
४. रक्ताभिसरण चांगले होते.