फिटनेस टिकविण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी सकाळ- संध्याकाळ नियमितपणे चालण्याचा व्यायाम करणारे अनेक जण आपण आपल्या आजुबाजुला बघत असतो. काही जणं भल्या पहाटे उठून जातात तर बरेच वयस्कर लोक सकाळ- संध्याकाळ असं दोन्ही वेळेस वॉकिंग (Walking) करतात. नियमित चालायला जाण्याची सवय आरोग्यासाठी निश्चितच चांगली आहे. त्यामुळे खूप लाभ होतात, यात वादच नाही. पण नुसतंच चालण्यापेक्षा कधी कधी किंवा रोजच थोडा वेळ रेट्रो वॉकिंग (What is retro walking?) करा, असा सल्ला सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी आणि आहारतज्ज्ञ पूजा माखिजा (Pooja Makhija and Anshuka Parwani) यांनी दिला आहे.
या दोघींनी त्यांचा एकत्रित व्हिडिओ नुकताच सोशल मिडियावर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी रेट्रो वॉकिंग हा नेमका काय प्रकार आहे, रेट्रो वॉकिंग करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आणि त्याचे काय फायदे (Benefits of Retro Walking) होतात, याविषयीची सविस्तर माहिती सांगितली आहे.
मराठी अभिनेत्रींचे संक्रांत स्पेशल लूक! बघा हलव्याचे दागिने आणि काळी साडी नेसून केलेला सुंदर साज
सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास रेट्रो वॉकिंग म्हणजे उलट दिशेने चालत जाणे. म्हणजेच नेहमीच्या वॉकिंगमध्ये आपण पुढे- पुढे चालत जातो, यात पाऊलं मागे- मागे घेत उलट दिशेने चालत जायचं. यालाच रिव्हर्स वॉकिंग असंही म्हणतात.
रेट्रो वॉकिंग किंवा रिव्हर्स वॉकिंगचे फायदे
१. कॅलरी कमी करण्यासाठी रेट्रो वॉकिंग हा एक उत्तम व्यायाम मानला जातो. नेहमीप्रमाणे जर आपण १००० पाऊलं चाललो, तर त्यामुळे जेवढ्या कॅलरी बर्न होतील, तेवढ्याच कॅलरी ४० पाऊलं रेट्रो वॉकिंग केल्याने बर्न होतात, असं एका अभ्यासात सांगितलं आहे.
मुलांच्या बौद्धिक विकासाला चालना देणाऱ्या ५ साध्या- सोप्या गोष्टी, करून बघा- मुले होतील तल्लख
२. रेट्रो वॉकिंग करताना गुडघ्यांवर, पायाच्या घोट्यांवर याेग्य प्रमाणात दबाव पडतो. त्यामुळे गुडघ्यांचं दुखणंही यामुळे कमी होण्यास मदत होते.
३. पायांचे स्नायू मजबूत होण्यासाठी रेट्रो वॉकिंग फायदेशीर ठरतं.
४. बॉडी बॅलेन्सिंग वाढविण्यासाठी हा एक उपयुक्त व्यायाम मानला जातो.