Join us

दुपारी की रात्री? भात खाण्याची योग्य वेळ कोणती? पोटभर खाऊनही वजन वाढणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 15:52 IST

What Is Right Time to Eat Rice : सकाळच्या नाश्त्याला तुम्ही भाताचे सेवन केले तर दिवसभर एनर्जी टिकून राहण्यास मदत होईल. 

सकाळी भात खाणं एक हेल्दी सवय आहे. काहीजण दिवसाच्या सुरूवातीला भात खातात तर काहीजण दुपारी भात खातात.  (Health Tips) जर काहींना रात्री भात खाल्ल्याशिवाय झोप लागत नाही. भात खाल्ल्याने बराचवेळ पोट भरलेलं राहतं आणि शरीरात एनर्जी टिकून राहते. याशिवाय सकाळच्या नाश्त्याला तुम्ही भाताचे सेवन केले तर दिवसभर एनर्जी टिकून राहण्यास मदत होईल.  (What is Right Way to Eat Rice)

नाश्त्याला भात खाणं कितपत फायदेशीर

एक्सपर्ट्सच्यामते  नाश्त्याला भात खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे मिळतील. भाताला एनर्जीचे पॉवरहाऊस म्हटले जाते. याव्यतिरिक्त काही लोकांना असं वाटतं की  भात खाल्ला नाही तर व्यवस्थित जेवण केलं नाही. तुम्हीसुद्धा असा विचार करत असाल तर रोज भात खाताना घाबरण्याची गरजच नाही. (Rice Eating Tips What is Right Way to Eat Rice For Weight Loss) भातात मोठया प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात. ज्यामुळे त्याला एनर्जीचे पॉवरहाऊस म्हणतात. भातात पोषक तत्व, फॉलेट भरपूर प्रमाणात असते. सरळ शब्दात सांगायचे झाले तर पौष्टीक आणि पोषक तत्वांनी परिपूर्ण असते. 

हेल्थ एक्सपर्ट्सच्यामते दुपारी भात खाल्ल्याने तुम्हाला कार्ब्स, प्रोटीन्स मिळतात ज्यातून संपूर्ण शरीर एनर्जेटिक वाटतं. पण रात्रीच्या  जेवणात भात खाणं टाळायला हवं. हार्वर्ड हेल्थच्या रिपोर्टनुसार पांढऱ्या भाताला हाय ग्लायसेमिक फूड सांगितले आहे. ज्या लोकांना डायबिटीस टाईप २ आहे त्यांनी याचे सेवन करू नये. भाताने मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका वाढतो. या आजारांमुळे  ब्लड शुगर हाय बीपी, हाय ट्रायग्लिसाईड आणि  कोलेस्टेरॉल कमी होण्यासही मदत होते. या आजारांमुळे हृदयाच्या आजारांचा धोका टाळण्यास मदत होते.

मोगऱ्याला फुलंच नाही, रोप सुकलंय? मातीत हा पदार्थ घाला, भरगच्च मोगरे येतील-सुगंधाने बहरेल घर 

भात खाण्याची योग्य पद्धत कोणती?

एक्सपर्ट्सच्यामते  रोजच्या आहारात कार्बोहायड्रेटसचे अधिकांश सेवन  करायला हवं कारण त्या वेळेत शरीर सर्वात जास्त एक्टिव्ह असते आणि जास्तीत जास्त एनर्जीची आवश्यकता असते. याव्यतिरिक्त जे लोक आपलं वजन नियंत्रणात ठेवू इच्छितात ज्यांना डायबिटीसची समस्या असते त्यांनी सकाळच्या वेळी भात खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि हाय शुगरची लक्षणंही दिसत नाहीत. पण भात संतुलित प्रमाणातच खायला हवा.

भूक मिटवण्यासाठी हा उत्तम नाश्ता आहे. आरोग्यासाठीही राईस लसूण फ्राय फायदेशीर ठरते. लसणात एंटी बयोटिक गुण असतात. ज्यामुळे इम्यून सिस्टिम चांगली राहते आणि हाय ब्लड प्रेशरचा धोका कमी होतो. यात तुम्ही पनीर घालू शकता. ज्यामुळे हृदयाचे आरोग्यही चांगले राहण्यास मदत होते. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर पांढरा भात खाऊ नका. कारण झोपण्याच्या आधी कार्ब्स किंवा  कॅलरी जास्त प्रमाणात घेऊ नका. ज्यामुळे फॅट तयार होणार नाही. ज्यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होईल.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्नकिचन टिप्स