Lokmat Sakhi >Fitness > ऐन तारुण्यात गुडघे-कंबर दुखते! स्वस्तात मस्त प्रोटीन देणारा १ पदार्थ, रस्त्यावर मिळेल १० रुपयांत वाटा

ऐन तारुण्यात गुडघे-कंबर दुखते! स्वस्तात मस्त प्रोटीन देणारा १ पदार्थ, रस्त्यावर मिळेल १० रुपयांत वाटा

What is The Benefit of Eating Peanuts Every Day : जर तुम्हाला कमी खर्चात भरपूर पोषण  हवं असेल तर तुम्ही बदामाऐवजी शेंगदाण्यांचे सेवन करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 12:00 PM2023-09-21T12:00:12+5:302023-09-21T16:32:26+5:30

What is The Benefit of Eating Peanuts Every Day : जर तुम्हाला कमी खर्चात भरपूर पोषण  हवं असेल तर तुम्ही बदामाऐवजी शेंगदाण्यांचे सेवन करू शकता.

What is The Benefit of Eating Peanuts Every Day : How to Eat Peanuts for Protein | ऐन तारुण्यात गुडघे-कंबर दुखते! स्वस्तात मस्त प्रोटीन देणारा १ पदार्थ, रस्त्यावर मिळेल १० रुपयांत वाटा

ऐन तारुण्यात गुडघे-कंबर दुखते! स्वस्तात मस्त प्रोटीन देणारा १ पदार्थ, रस्त्यावर मिळेल १० रुपयांत वाटा

सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये  गुडघेदुखी, कंबरदुखी जाणवणं खूपच कॉमन झालंय. तरूण  मुलामुलींना या समस्या उद्भवतात. (How to Eat Peanuts for Protein) कारण शरीरात प्रोटीन्स आणि कॅल्शियमची कमतरता असते. शरीर निरोगी ठेववण्याासाठी या दोन्ही घटकांची विशेष आवश्यकता असते. (Are peanuts a good source of protein)

जर तुम्हाला कमी खर्चात भरपूर पोषण  हवं असेल तर तुम्ही बदामाऐवजी शेंगदाण्यांचे सेवन करू शकता.  शेंगदाणा हा असा पदार्थ आहे जो स्वस्तात मिळतो. याशिवाय यात प्रोटीन्स भरपूर असतात. आहाराततज्ज्ञांनी  शेंगदाण्याची तुलना बदामाशी का केली जाते. याबाबत अधिक माहिती दिली आहे. (What is the benefit of eating peanuts every day)

प्रोटीन्ससाठी शेंगदाणे का आवश्यक?

शेंगदाणा हा शेंगाच्या प्रकारात मोडतो. यात बदामाप्रमाणेच पोषक तत्व असतात. चव आणि पोषणाच्याबाबतीत शेंगदाणे सगळ्यात उत्तम आहेत.  शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन्स मोठ्या प्रमाणात असतात. हा प्रोटीन्सचा एक स्वस्त आणि उत्तम स्त्रोत आहे.  शरीरासाठी आवश्यक असणारे नऊ आवश्यक अमीनो एसिड्स यात असतात.  शेंगदाण्यांमध्ये  मोनोअनसॅच्युरेडेट फॅट, फॉलिक एसिड असते. यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते आणि  हृदयरोगाची जोखिम टाळता येते.

पोट, कंबरेच्या टायर्समुळे शरीर जाडजूड दिसतंय? घरी हे १ योगासनं करा-चरबी भराभर होईल कमी

फायबर्सयुक्त शेंगदाणे खाल्ल्लाने पचनक्रिया मजबूत राहते. याशिवाय वजन नियंत्रणात राहतं, ब्लड शुगर लेव्हल मेंटेन राहते. शेंगदाण्यांमध्ये व्हिटामीन, नियासिन, फॉलेट आणि व्हिटामीन ई याशिवाय मॅग्नेशियम, फॉस्फरेस आणि पोटॅशियम यांसारखी मिनरल्स असतात. 

बदामात अनेक पोषक तत्व असतात. ज्याच्या सेवनाने  बरेच फायदे मिळतात. बदाम व्हिटामीन ई चा एक चांगला स्त्रोत आहे. हे एक पॉवरफूल एंटी ऑक्सिडेंट आहे.  ज्यामुळे पेशींमधील ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस कमी होतो आणि इम्यून पॉवर वाढते.

बदामात मोनोअनसॅच्युकरेडेट फॅट असतात जे एलडीएल कोलेस्टेरॉल कमी करतात. बदाम कॅल्शियमचा एक उत्कृष्ट स्त्रोत आहे. ज्यामुळे हाडं आणि दात मजबूत राहतात. बदाम आणि शेंगदाणे हे दोन्ही पदार्थ पोषक तत्वांचा भंडार आहेत.  

तब्येतीसाठी वरदान आहेत ५ साधेसोपे फूड कॉम्बिनेशन्स, रोज खा, पोट कमी होईल- राहा नेहमी निरोगी

शेंगदाणे पोहे, भाज्या बनवताना सर्रास वापरले जातात. परंतू अधिकाधिक  फायदे मिळवण्यासाठी शेंगदाणे उकळून खावेत. याचे सॅलेड बनवून किंवा असचे खाऊ शकतात. अनेकांना भाजलेले खारे शेंगदाणे आवडतात. या शेंगदाण्यांमध्ये मीठ जास्त असल्याने त्वचा आणि आरोग्यावर  याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून जास्त प्रमाणात खाऊ नका.

Web Title: What is The Benefit of Eating Peanuts Every Day : How to Eat Peanuts for Protein

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.