Join us

फक्त १५ मिनिटं करायचा बेस्ट व्यायाम, पाहा कमी वेळात शरीराला मिळतात भरपूर फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 17:11 IST

Fitness Tips : तुम्हाला असाही प्रश्न पडेल की, 15 मिनिटांची बेस्ट एक्सरसाईज कोणती? जी करून तुम्ही फिट राहू शकता. तर तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Fitness Tips : बरेच लोक असे असतात जे बिझी शेड्युलमुळे रोज जिमला जाऊन एक्सरसाईज करण्याला वेळ देऊ शकत नाहीत. अशात बरेच लोक थोडा वेळ घरीच एक्सरसाईज करून फिट राहतात. जर तुम्हाला जिमला जाण्यासाठी वेळ मिळत नसेल किंवा जिमला जाण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही सुद्धा घरीच 15 मिनिटं एक्सरसाईज करून फिट राहू शकता. मग तुम्हाला असाही प्रश्न पडेल की, 15 मिनिटांची बेस्ट एक्सरसाईज कोणती? जी करून तुम्ही फिट राहू शकता. तर तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

15 मिनिटांची बेस्ट एक्सरसाईज

अनेक हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की, सूर्य नमस्कार करणं सगळ्यात बेस्ट आणि कमी वेळ लागणारी एक्सरसाईज आहे. सूर्य नमस्काराची खासियत म्हणजे हे करून शारीरिक आरोग्य तर चांगलं राहिलच सोबतच तुमचं मानसिक आरोग्य सुद्धा सुधारेल. या एक्सरसाईजच्या माध्यमातून संपूर्ण शरीराचा व्यायाम होईल. काही महिने रोज 15 मिनिटं ही एक्सरसाईज केली तर तुम्हाला काही दिवसात फरक दिसून येईल.

जास्त फायदेशीर एक्सरसाईज

सूर्य नमस्कारानं केवळ तुमची शक्ती वाढते असं नाही शरीर लवचिकही होतं. गट हेल्थ सोबतच हृदयाचं आरोग्यही सुधारतं. सूर्य नमस्कार वजन कमी करण्यासाठी आणि मसल्स मजबूत करण्यासाठीही बेस्ट एक्सरसाईज ठरते. इतकंच नाही तर या एक्सरसाईजनं पाठीचा कणाही मजबूत होतो. मानसिक आरोग्याबाबत सांगायचं तर या एक्सरसाईजनं तुमचा तणाव कमी होतो आणि मूड चांगला राहतो.

जर तुम्हाला सूर्य नमस्कार करायचा नसेल तर 15 मिनिटं तुम्ही दुसरी एक्सरसाईजही करू शकता. तुम्ही रोज 15 मिनिटं  स्क्वॅट्स आणि प्लॅंक एक्सरसाईजही करू शकता. त्याशिवाय प्लॅंक टो टच आणि माउंटेन क्लायंबरसारख्या एक्सरसाईजही करू शकता. जर या एक्सरसाईज तुम्ही रोज केल्या तर तुमचं वजनही कमी होईल आणि बॉडी टोन्ड राहील.

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्स