Join us  

वेळ मिळेल तसा केव्हाही व्यायाम करताय ? थांबा, एक्स्पर्ट सांगतात योग्य वेळ कोणती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2024 7:25 AM

What is the best time yoga & exercise in morning for weight loss : फिट राहण्यासाठी एक्सरसाइज करताय पण तो करण्याची योग्य वेळ कोणती हे नेमकं माहिती आहे का ?

वजन कमी करण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम यांनी गरज असते. या दोन गोष्टी योग्य पद्धतीने केल्यास वजन कमी करण्यास अतिशय सोपे जाते. वाढलेलं वजन कमी करणे सोपे नाही. वजन कमी करण्यासाठी आजकाल सगळेच वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी करतात. जिमिंग, झुंबा, योगा, वॉकिंग अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करण्यावर अधिक भर दिला जातो. परंतु काहीवेळा एवढी मेहेनत घेऊनही वजन कमी होत नाही. खरंतर, वजन कमी न होण्याची अनेक कारणं असू शकतात. परंतु चुकीच्या वेळी व्यायाम करणे हे देखील एक महत्वाचे कारण आहे(When Is The Best Time Of Day To Exercise)

सध्याच्या बिझी लाईफस्टाइलमुळे आपल्याला व्यायाम करण्यासाठी असा पुरेसा वेळ नसतोच. अशावेळी काहीजण आपल्या सोयीनुसार जेव्हा वेळ मिळेल तेव्हा व्यायाम करणे पसंत करतात. परंतु दिवसातील अशा कोणत्याही वेळी व्यायाम करणे योग्य आहे की अयोग्य ? व्यायाम नक्की कोणत्या वेळी करावा ? कोणत्या वेळी व्यायाम केल्याने आपल्याला त्याचे योग्य ते रिझल्ट मिळतील असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. दिल्लीचे योग ट्रेनर शशांक गुप्ता सांगतात व्यायाम करण्याची योग्य वेळ, ती नेमकी कोणती ते पाहूयात(What is the best time yoga & exercise in morning for weight loss).

व्यायाम किंवा योगा करण्यासाठी योग्य वेळ नेमकी कोणती ? 

फिट राहण्यासाठी योगा किंवा व्यायाम यासोबतच अनेक ऍक्टिव्हिटी केल्या जातात. असे केल्याने आरोग्यासाठी त्याचे अनेक फायदे होऊ शकतात. बरेच लोक फक्त वजन कमी करण्यासाठी योगा आणि व्यायाम करतात. परंतु ते करण्याची योग्य वेळ कोणती हे बऱ्याचजणांना माहित नसते. व्यायामासाठी फक्त ब्रह्म मुहूर्त आणि त्यानंतरचे दोन तास (Best Time Of Day To Workout) हे खूप महत्वाचे असतात, हीच ती व्यायाम करण्याची योग्य वेळ असते. पहाटे ४ ते ७ या वेळेत योगासने आणि व्यायाम करावा. नाश्त्यापूर्वीची ही वेळ आहे. खरं पाहता हीच वेळ असते जेव्हा आपले शरीर ताजेतवाने असते, त्याचबरोबर शरीरात होणाऱ्या अनेक बदलांसाठी तयार असते.

विद्या बालन करते  'नो रॉ फूड' डाएट, हे डाएट नेमकं आहे तरी काय ? 

कोणत्या योगा-व्यायामामुळे वजन झपाट्याने कमी होईल ?

तज्ज्ञांच्या मते, पटकन वजन कमी करण्यासाठी पुश - अप्सचा व्यायाम खूप उपयुक्त ठरू शकतो. हा व्यायाम करताना जास्त शारीरिक ऊर्जा लागते, ज्यामुळे कॅलरीज लवकर बर्न होतात. आपण जर १०० पुश - अप्स मारले तर सुमारे ३० ते ५० इतक्या कॅलरीज बर्न करू शकता. हे नियमितपणे केल्याने आपला मेटाबॉलिक रेट वाढेल तसेच, शरीरातील चरबी अधिक वेगाने वितळू शकते.   

वजन कमी करण्यासाठी कोणता आहार घ्यावा ?

योगा ट्रेनरच्या मते, वजन कमी करण्यासाठी आपल्या आहाराची आणि रुटीनची विशेष काळजी घ्यावी लागेल. यासाठी सर्वप्रथम व्यायाम, सकस आहार आणि पुरेसे पाणी पिणे गरजेचे असते. यासाठी आपल्या आहारात हिरव्या भाज्या, फळे, कडधान्ये आणि इतर पौष्टिक पदार्थांचा समावेश करू शकता. त्याचबरोबर  प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, तेल आणि गोड पदार्थ खाणे टाळले पाहिजे.

येताजाता गारेगार बर्फ खाण्याची इच्छा होते ? बर्फ खाण्याचा हा आजार म्हणजे शरीरात ‘ही’ कमतरता...

ब्रह्म मुहूर्तावर व्यायाम केल्याचे फायदे कोणते ?

ब्रह्म मुहूर्तावर व्यायाम केल्याने मानसिक शांती मिळते, शारीरिक कार्य सुधारते आणि रक्ताभिसरण योग्य पद्धतीने केले जाते. त्याचबरोबर हृदय, यकृत, किडनी आणि उच्च रक्तदाब नियंत्रित करता येतो. वास्तविक, यावेळी केलेला व्यायाम आपले मन शांत व डिटॉक्स करण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच, यावेळी योगासने करून आपण आपल्या मनात येणाऱ्या विचारांवर नियंत्रण ठेवू शकतो.

टॅग्स :फिटनेस टिप्सयोगासने प्रकार व फायदे