Lokmat Sakhi >Fitness > हळदीचं दूध पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती? दूधात ४ पदार्थ घाला, दुप्पट फायदे मिळवा

हळदीचं दूध पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती? दूधात ४ पदार्थ घाला, दुप्पट फायदे मिळवा

What is The Right Time to Drink Turmeric Milk : रात्री झोपताना हळदीचं दूध प्यायल्यानं तुम्हाला चांगली झोप येईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 06:00 PM2024-11-17T18:00:51+5:302024-11-17T18:06:03+5:30

What is The Right Time to Drink Turmeric Milk : रात्री झोपताना हळदीचं दूध प्यायल्यानं तुम्हाला चांगली झोप येईल.

What is the right time and method of drinking turmeric milk get double the benefits | हळदीचं दूध पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती? दूधात ४ पदार्थ घाला, दुप्पट फायदे मिळवा

हळदीचं दूध पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती? दूधात ४ पदार्थ घाला, दुप्पट फायदे मिळवा

दूधात १ चमचा हळद ( Turmeric Milk) मिसळून प्यायल्यानं शरीराला बरेच फायदे मिळतात. आयुर्वेद सांगते की हळदीचं दूध प्यायल्यानं अनेक जुनाट आजार बरे होतात. गावांपासून ते शहरापर्यंत प्रत्येक घरात हळदीचं दूध प्यायलां जातं. ज्यामुळे वेदना कमी होतात आणि इम्यूनिटी वाढण्यासही मदत होते. हळदीचं दूध पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत समजून घ्यायला हवी. (What is The Right Time to Drink Turmeric Milk)

हळदीचं दूध पिण्याचे अनेक फायदे आहेत म्हणून या दुधाला गोल्डन मिल्क म्हटले जाते. ९९ टक्के लोकांना हे दूध बनवण्याची योग्य पद्धत माहित नसते तर काहींना हे दूध कोणत्या वेळी प्यायचं याबाबत शंका असतात. हळदीच्या दुधात हळदीव्यतिरिक्त तुम्ही इतर पदार्थही घालू शकतात.  ज्यामुळे या दुधाचे फायदे बरेच वाढतात. याव्यतिरिक्त गोल्डन मिल्क पिण्याची योग्य वेळ समस्येवर अवलंबून असते.

हळदीचं दूध कधी प्यायचं?

आयुर्वेदीक एक्सपर्ट्स डॉ. अबरार मुल्तानी यांच्यमते तुम्ही आपल्या सोयीनुसार हळदीचं पाणी पिऊ शकता. हळदीचं दूध रात्री पिणं जास्त फायदेशीर ठरतं. कारण यामुळे शरीराला शांतता आणि आराम दोन्ही मिळते.

हळदीचं दूध सकाळी पिण्याचे फायदे

हळदीचं दूध प्यायल्यानं शरीराला अनेक एंटीऑक्सिडेंट्स मिळतात. ज्यामुळे आजारांपासून लढण्याची सुरक्षा मिळते. ज्यामुळे मेंदूचा फोकस वाढतो आणि मूड चांगला राहतो.  हे हेल्दी ड्रिंक प्यायल्यानं ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहते. याशिवाय एंटी व्हायरल. एंटी बॅक्टेरिअल, एंटी फंगल प्रॉपर्टीज संक्रमणापासून बचाव होतो. पचनक्रिया चांगली राहण्यासही मदत होते.

रात्री झोपताना हळदीचं दूध प्यायल्यानं तुम्हाला चांगली झोप येईल. शरीराला बरेच फायदे मिळतात. कारण झोपेदरम्यान शरीर स्वत:ला रिपेअर करते.  दुसऱ्या दिवशी मेंदू रिलॅक्स आणि प्रोडक्टिव्ही फिल करतो. यामुळे तुमचा फोकस, स्ट्रेंथ वाढते. हळदीच्या दूधात काही सामग्री मिसळून तुम्ही आयुर्वेदीक ड्रिंक बनवू शकता.

ज्यामुळे शरीराला दुप्पट फायदे मिळतात. १ ग्लास दूधात १ चमचा दालचिनी पावडर,  किसलेलं पाव इंच आलं, १ चुटकी काळी मिरी हे सर्व जिन्नस मिसळून दूध उकळवून घ्या. नंतर गॅस बंद करून ८ ते १० मिनिटांनी या दुधाचे सेवन करा. 

हळदीचं दूध पिण्याचे फायदे

इम्यूनिटी वाढते, डायबिटीससाठी फायदेशीर, सांधेदुखीच्या वेदनांपासून आराम मिळतो, थकवा दूर होतो. मेंदूची क्षमता वाढते, कॅन्सरचा धोका कमी होतो, पचनक्रिया चांगली राहते, रात्री चांगली झोप येते याशिवाय हाडंही मजबूत राहतात.

Web Title: What is the right time and method of drinking turmeric milk get double the benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.