Lokmat Sakhi >Fitness > काही माणसांचं वजन कधीच का वाढत नाही? अभ्यासक सांगतात, न वाढणाऱ्या वजनाचं रहस्य

काही माणसांचं वजन कधीच का वाढत नाही? अभ्यासक सांगतात, न वाढणाऱ्या वजनाचं रहस्य

Secret behind slim trim figure: आपल्या आसपास आपण अनेक जणी पाहतो, ज्या ५- १० वर्षांपुर्वी तब्येतीने जशा शिडशिडीत असायच्या, तशाच अगदी आतासुद्धा असतात... काय बरं त्यांच्या या स्लिमट्रिम असण्याचं कारण? शास्त्रज्ञांनी तेच तर सांगितलंय त्यांच्या या विशेष अभ्यासात.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2022 02:50 PM2022-07-19T14:50:42+5:302022-07-19T14:51:35+5:30

Secret behind slim trim figure: आपल्या आसपास आपण अनेक जणी पाहतो, ज्या ५- १० वर्षांपुर्वी तब्येतीने जशा शिडशिडीत असायच्या, तशाच अगदी आतासुद्धा असतात... काय बरं त्यांच्या या स्लिमट्रिम असण्याचं कारण? शास्त्रज्ञांनी तेच तर सांगितलंय त्यांच्या या विशेष अभ्यासात.. 

What is the secret of naturally thin person's health? Why some people are so slim for years and years? | काही माणसांचं वजन कधीच का वाढत नाही? अभ्यासक सांगतात, न वाढणाऱ्या वजनाचं रहस्य

काही माणसांचं वजन कधीच का वाढत नाही? अभ्यासक सांगतात, न वाढणाऱ्या वजनाचं रहस्य

Highlightsजवळपास २ आठवडे करण्यात आलेल्या या अभ्यासातून असं दिसून आलं की जे लोक बारीक होते, त्यांच्या शारिरीक हालचाली इतर सामान्य लोकांपेक्षा जवळपास २३ टक्क्यांनी कमी होत्या.

आपल्या सभोवती काही जणी अशा असतात, ज्याचं वजन दरवर्षी थोडं- थोडं वाढतच असतं. आणि काही वर्षांतच मग त्या एकदम गाेल- गलगरीत होऊन जातात. त्याऊलट काही जणी अशाही असतात की त्या १० वर्षांपुर्वी जेवढ्या शिडशिडीत दिसायच्या तेवढ्याच त्या आजही दिसतात. या दुसऱ्या प्रकारच्या मैत्रिणींचं वजन वाढलेलं (weight gain) कधी आपल्याला दिसतच नाही. अशा मैत्रिणींकडे पाहिलं की आपल्याला वाटतं या खूपच व्यायाम करत असणार, खूप ॲक्टीव्ह असणार. त्यामुळेच तर अशा स्लिमट्रिम (secret of naturally thin person's health) दिसतात. पण त्यांचं वजन कमी असण्याचं खरं कारण तर वेगळंच असतं. तेच तर काही अभ्यासकांनी शोधून काढलं आहे.

 

एका हिंदी साईटने दिलेल्या वृत्तानुसार एबरडीन विश्वविद्यालयात याविषयी नुकताच एक अभ्यास करण्यात आला. यामध्ये जे लोक बारीक आहेत, ज्यांची एनर्जी कमी आहे, अशा १५० लोकांचा तुलनात्मक अभ्यास इतर १७३ सामान्य शरीरयष्टीच्या लोकांसोबत करण्यात आला. जवळपास २ आठवडे करण्यात आलेल्या या अभ्यासातून असं दिसून आलं की जे लोक बारीक होते, त्यांच्या शारिरीक हालचाली इतर सामान्य लोकांपेक्षा जवळपास २३ टक्क्यांनी कमी होत्या. शिवाय ते अधिक काळ बसून रहायचे. त्यांचं खाणं मात्र सामान्य लोकांपेक्षा १२ टक्क्यांनी कमी होतं. शिवाय त्यांचं मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय क्रिया अधिक वेगवान होती आणि त्यामुळेच त्यांच्या हालचाली कमी असूनही त्यांच्या कॅलरी बर्न होण्याचं प्रमाण सर्वसामान्य लोकांपेक्षा जास्त होतं. 

 

हा अभ्यासाचे प्रमुख प्रोफेसर जॉन स्पीकमैन याविषयी बोलताना म्हणाले की बारीक लोक काहीही खाऊ शकतात, त्यांनी काहीही खाल्लं तरी त्यांना चालतं, असं बारीक व्यक्तींबाबत नेहमीच बोललं जातं. पण या अभ्यासातून असं समोर आलं आहे, की मुळातच या लोकांचं खाणं खूपच मर्यादित असतं.

करा फक्त 3 स्टेप्स वर्क आऊट! मलायका अरोराचा सल्ला, व्यायाम होईल इफेक्टिव्ह 

ते इतरांच्या तुलनेत खूपच कमी खातात. त्यामुळे त्यांच्या शरीरात जाणाऱ्या कॅलरीचं प्रमाण कमी असल्याने त्यांचं वजन कमी असतं. या लोकांच्या शरीरात फॅट्स खूप कमी असतात. त्यामुळे त्यांचा मेटाबॉलिझम रेट वाढतो. त्यामुळे कोणता व्यायाम न करताही बसल्या बसल्या त्यांच्या कॅलरी बर्न होऊ शकतात.

 

मेटाबॉलिझम रेट जास्त असण्याचा थेट संबंध थायरॉईड लेव्हल वाढण्याशी असतो. त्यामुळे त्यांना भुकेची जाणीव होत नाही आणि ते कमी खातात. आता अभ्यासक याविषयी संशोधन करत आहेत की या लोकांमध्ये वजन कमी असण्याचं कारण इटिंग डिसऑर्डर आहे की त्यांच्यात काही आजार असल्याने त्यांचं वजन वाढत नाहीये.

वजन कमी करण्याच्या चुकीच्या पद्धती, 5 चुका कराल तर लवकरच म्हातारे दिसू लागाल..

बारीक लोकांमध्ये शास्त्रज्ञांना आढळून आलेली आणखी एक चांगली बाब म्हणजे या लोकांचा कॅलरी इनटेक कमी असल्याने आणि शरीरात फॅट्स जास्त नसल्याने या व्यक्तींच्या शरीरात बॅड कोलेस्टरॉलचं प्रमाणही अतिशय कमी असतं. त्यामुळे सध्या तरी आहार कमी- वजन कमी या निष्कर्षापर्यंत शास्त्रज्ञ आलेले आहेत. 
 

Web Title: What is the secret of naturally thin person's health? Why some people are so slim for years and years?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.