Join us  

तोंडाचा ताबा सुटतो? चॉकलेट-आइस्क्रीम खाऊनही वजन कमी होते, व्हॉल्यूमेट्रिक डाएटचा नवा फंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2023 4:40 PM

What is Volumetrics Diet? A Detailed Beginner's Guide : जिमसाठी वेळ नाही, तोंडावर ताबा नाही? आवडते पदार्थ खा आणि वजन घटवा, फक्त कधी-काय खावे याची वेळकाळ तपासा..

वजन कमी करणं (Weight Loss) जरी सोपे नसले तरी, अशक्य बिलकुल नाही. वजन कमी करण्याचे बरेच पद्धती आपण पाहिल्या असतील. काही जण व्यायाम, डाएट फॉलो करून वजन कमी करतात. तर काही जणांना डाएट फॉलो करण्याची जराही इच्छा होत नाही. बऱ्याचदा त्यांचं खाण्यावरून कण्ट्रोल सुटते. अशा स्थितीत कितीही व्यायाम केला तरी वजन कमी होत नाही. तर अनेकांना कामाच्या व्यापामुळे व्यायाम करायला जमत नाही.

जर आपल्यालाही डाएट-व्यायाम फॉलो करायला जमत नसेल, तर व्हॉल्यूमेट्रिक आहार (Volumetrics Diet) फॉलो करून पाहा. या डाएटमध्ये कमी कॅलरीयुक्त पदार्थांचा समावेश असतो. शिवाय या डाएटमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. जर आपल्याला वेट लॉस करायचं असेल तर, व्हॉल्यूमेट्रिक डाएट एकदा फॉलो करून पाहाच(What is Volumetrics Diet? A Detailed Beginner's Guide).

व्हॉल्यूमेट्रिक डाएट म्हणजे काय?

क्लीव्हलँड क्लिनिक या वेबसाईटनुसार, 'व्हॉल्यूमेट्रिक डाएटमध्ये अशा पदार्थांचा समावेश आहे, ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी तर घटतेच, शिवाय शरीर हायड्रेट राहते. लो कॅलरीज व हाय फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने पोट दिर्घकाळ भरलेले राहते. ज्यांना काम आणि धावपळीच्या जीवनातून स्वतःसाठी वेळ मिळत नाही, त्यांनी हा डाएट नक्कीच फॉलो करावा.'

इडली, डोसा, उपमा खाऊन होईल वजन कमी, पाहा साऊथ डिशेसचे चविष्ट वेट लॉस डाएट प्लॅन, वजन कमी करा खाऊन पिऊन

व्हॉल्यूमेट्रिक डाएट कसे काम करते?

व्हॉल्यूमेट्रिक डाएटला चार भागांमध्ये विभागण्यात आले आहे.

स्टेज १ - फळे, स्टार्च नसलेल्या भाज्या, जसे ब्रोकोली, टोमॅटो, मशरूम इत्यादी पदार्थ खा.

स्टेज २ - ब्राऊन राईस, पास्ता, लीन प्रोटीन, शेंगा आणि लो फॅट्सयुक्त डेअरी प्रॉडक्ट खा.

स्टेज ३ - ब्राऊन ब्रेड, डेसर्ट, बेक्ड स्नॅक्स, चीज यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा.

स्टेज ४ - लो कॅलरीज असलेले स्नॅक्स, कँडी, कुकीज, ड्रायफ्रुट्स, इत्यादी पदार्थ आपण खाऊ शकता.

व्हॉल्यूमेट्रिक डाएटचे फायदे

व्हॉल्यूमेट्रिक डाएट ही संशोधनावर आधारित आहार योजना आहे. यात फळे आणि भाज्यांचा वापर अधिक होतो. ज्यामुळे शरीराला आवश्यक असलेले पोषक घटक मिळतात. व्यायामासोबत हा डाएट प्लॅन फॉलो केल्याने वजन कमी होईल.

- नियमित हा डाएट प्लॅन फॉलो केल्याने पचनक्रिया सुधारते.

- या पदार्थांमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. ज्यामुळे लवकर भूक लागत नाही, शिवाय वेट लॉस करण्यात मदत मिळते.

न्यू इअर पार्टीमध्ये दिसायचंय सुंदर-सुडौल? मग आजपासूनच फॉलो करा ४ वेट लॉस रुल्स, काही दिवसात दिसेल फरक

- हा डाएट फॉलो करताना आपल्याला उपाशी राहायचे नाही. कमी प्रमाणात आपण आवडते पदार्थ खाऊ शकता. खाताना नेहमी पोर्शन कण्ट्रोलमध्ये ठेवा.

- हा डाएट प्लॅन फ्लेक्सिबल असून, आपण यात चेंजेस करू शकता. शिवाय डाएट फॉलो करताना आपण आईस्क्रीम, चॉकलेट देखील खाऊ शकता.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स