Yogalates : गेल्या काही वर्षांपासून लोकांमध्ये फिटनेसबाबत चांगली क्रेझ वाढली आहे. लोक निरोगी आणि फिट राहण्यासाठी वेगवेगळ्या एक्सरसाईज करतात. योगा, जुंबा, पिलाटेज आणि वेट ट्रेनिंगनंतर आता योगालेट्सचा ट्रेंडही चांगला वाढला आह. योगालेट्स हा शब्द योगा आणि पिलाटेज मिळून बनला आहे. यात योगातील आध्यात्मिक बाजू आणि पिलाटेतील कोर मसल्स मजबूत करणारी एक्सरसाईज केली जाते. ज्यानं तुमचा मेंदू आणि शरीर दोन्हींचं आरोग्य चांगलं राहतं. हे एक परफेक्ट एक्सरसाईज कॉम्बिनेशन आहे.
काय आहे योगालेट्स?
योगालेट्स योग आणि पिलाटेजचं एक फ्यूजन कॉम्बिनेशन आहे. पिलाटेच्या कोर स्ट्रेंथमध्ये योगातील रिलॅक्स आणि माइंडफुलनेस जोडलं जातं. योगालेट्स अशा लोकांसाठी खूप फायदेशीर आहे, ज्यांना त्यांचं शरीर लवचिक करायचं आहे. यामुळे बॉडी बॅलंन्सिग, फ्लेक्सिबिलिटी, स्ट्रेथ, स्टेबिलिटीमध्ये मदत मिळते. सोबतच यानं मानसिक स्पष्टता आणि आंतरिक शांतातही मिळते.
योगालेट्सचे फायदे
लवचिक शरीर -
योग आणि पिलाटेज दोन्हीही शरीर लवचिक करण्यास मदत करतात. योगाच्या माध्यमातून खांदे, कंबर, पाठ आणि पायांची स्ट्रेचिंग होते, ज्यामुळे शरीराचा आखडलेपणा कमी होतो. सोबतच मसल्स फ्लेक्सिबल होतात.
कोर मसल्स मजबूत होतात
यात पिलाटेचा समावेश केला जातो. ज्यामुळे पोश्चर चांगलं होण्यास मदत मिळते. तुमचं बसणं, चालणं , उभं राहण्याच्या पद्धतीत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जातो. जर यातील कोणत्याही अवयवामध्ये वेदना असेल तर योगालेट्सनं मदत मिळू शकते.
टोन्ड बॉडी
योगा आणि पिलाटेज तुमच्या शरीरातून एक्स्ट्रा चरबी कमी करण्यास मदत करतात. ज्यामुळे बॉडी हळूहळू शेपमध्ये येते. यात अशा काही वर्कआउटचा समावेश केला जातो, जे लठ्ठपणा कमी करण्यास आणि बॉडी टोन्ड ठेवण्यास मदत करतात. ज्यामुळे मसल्स स्ट्रॉंग होतात.
तणाव दूर होतो
रोज काही मिनिटं योगालेट्स केल्यानं तुमच्या शरीराचा सगळा थकवा आणि दिवसभराचा तणाव दूर होतो. यामुळे माइंड रिलॅक्स होतो आणि चांगली झोप लागते. तसेच ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं, ज्यामुळे अनेक आजारांचा धोका टळतो.