Lokmat Sakhi >Fitness > योग, एरोबिक्स, सायकलिंग की झुंबा, आपल्यासाठी उत्तम व्यायाम कोणता, हे कसं ठरवाल?

योग, एरोबिक्स, सायकलिंग की झुंबा, आपल्यासाठी उत्तम व्यायाम कोणता, हे कसं ठरवाल?

ताकद, स्टॅमिना, लवचिकपणा आणि बॅलन्स याचार गुणांवर ठरवायचं की आपल्याकडे यातलं नेमकं काय आहे आणि ते वापरुन आपण कोणता व्यायाम करायचा, उत्तर तुमचं तु्म्हालाच सापडेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 07:02 PM2021-03-06T19:02:10+5:302021-03-06T19:04:43+5:30

ताकद, स्टॅमिना, लवचिकपणा आणि बॅलन्स याचार गुणांवर ठरवायचं की आपल्याकडे यातलं नेमकं काय आहे आणि ते वापरुन आपण कोणता व्यायाम करायचा, उत्तर तुमचं तु्म्हालाच सापडेल.

what is the perfect exercise for you, yoga, Zumba or cycling, how to find it, read this.. | योग, एरोबिक्स, सायकलिंग की झुंबा, आपल्यासाठी उत्तम व्यायाम कोणता, हे कसं ठरवाल?

योग, एरोबिक्स, सायकलिंग की झुंबा, आपल्यासाठी उत्तम व्यायाम कोणता, हे कसं ठरवाल?

Highlightsव्यायाम ही अशी गोष्ट आहे, की एकदा त्यातून सुट्टी घेतली की पुन्हा ती सुरु करणं फारच कठीण होऊन बसतं.

गौरी पटवर्धन

असं वाटतं ना की, आता आळस झटकायचा, आता फिट व्हायचं. फिटनेस कमवायचा कसा? सुरुवात कुठून करायची? डाएट काय? व्यायाम? एरोबिक्स ? योगा? सायकलिंग? वेट ट्रेनिंग? हे सगळं सोडून झुंबा? फिट होण्यासाठी नेमकं करायचं काय? 
तर या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी सगळ्यात आधी हे ठरवायला हवं की आपल्याला फिट व्हायचंय म्हणजे नेमकं काय व्हायचंय हे ठरवायचं. त्यासाठी आपली आत्ताची अवस्था ताकद, स्टॅमिना, लवचिकपणा आणि बॅलन्स या निकषांवर जोखायची. या प्रकारात स्वतःशी खरं बोलायचं. म्हणजे आपल्याकडे जे आहे ते स्वतःशी कबूल करायचं. उगीच जे व्हायचं आहे ते ठोकताळे मनाशी धरायचे नाहीत.
आपण स्वतःचं प्रामाणिकपणे निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येतं, की यातल्या चारही गोष्टी असणाऱ्या बायका ऑलमोस्ट नसतातच, तसंच यातलं काहीच नसणाऱ्या बायकाही ऑलमोस्ट नसतातच. म्हणजेच आपल्याकडे या चारपैकी किमान एक गुण असतो. तो शोधायचा. आणि त्याचा उपयोग करून घेऊन बाकी बाबी कशा मिळवायच्या याचा गेम प्लॅन आखायचा.
समजा तुमच्याकडे ताकद आहे. म्हणजे मुळातच तुमचे स्नायू ताकदवान आहेत. तुम्ही जड वस्तू सहज उचलू शकता. याचाच परिणाम म्हणून कदाचित तुमची शरीरयष्टी बल्की असेल. बांधा बसका / आडवा असेल. अशा वेळी तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरी उंच शिडशिडीत दिसू शकत नाही. पण तुम्ही असे व्यायाम नक्की करू शकता ज्यामुळे वजन कमी होईल आणि स्नायूंचा आकार वाढणार नाही.
कदाचित तुमच्या अंगात ताकद कमी असेल, पण लवचिकपणा चांगला असेल. कदाचित तुम्हाला पंधरा किलो वजन उचलता येणार नाही, पण तुमचं डोकं तुम्हाला सहज गुढग्याला लावता येत असेल. अशा वेळी तुम्हाला असा व्यायाम शोधला पाहिजे ज्यामुळे लवचिकपणा तसाच राहून ताकद कमावता येईल.
म्हणजेच फिटनेस मिळवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला दोन गोष्टी ओळखल्या पाहिजेत. पहिली म्हणजे आपल्याकडे फिटनेसचे कुठले गुण आहेत आणि दुसरं म्हणजे आपल्या शरीरयष्टीचा प्रकार काय आहे. या दोन गोष्टी आधी ओळखल्यामुळे आपल्याला फिटनेसचे रिऍलिस्टिक गोल्स ठरवता येतात. आणि मग ते गाठताही येतात.

या दोन गोष्टी न ओळखता जर आपण फिटनेस कमावण्याच्या मागे लागलो तर आपण क्रॅश डाएटसारख्या दुष्टचक्रात अडकतो. आपण चुकीचे व्यायाम करायला सुरुवात करतो. त्याने आपली नुसतीच दमणूक होते. कुठेतरी दुखापत होते. मग आपण मधेच व्यायामाला सुट्टी घेतो.
 आणि व्यायाम ही अशी गोष्ट आहे, की एकदा त्यातून सुट्टी घेतली की पुन्हा ती सुरु करणं फारच कठीण होऊन बसतं. आणि आपल्या मनात आपलं वजन उर्फ फिटनेस याचा संबंध आपल्या आत्मविश्वासाशी जोडलेला असल्याने फिटनेसचं गाडं रुळावर येत नाही तोवर एकूणात काहीच आपल्या मनासारखं होत नाही असं वाटत राहतं. त्यामुळे व्यायामाचा योग्य प्रकार निवडणंही महत्वाचं आहे. 
व्यायाम अनेक प्रकारचे असतात. काही ताकद वाढवणारे असतात, तर काही स्टॅमिना वाढवणारे असतात. काही वजन कमी करणारे असतात तर काही वजन वाढवणारे असतात. पण व्यायामप्रकार सिलेक्ट करतांना एक थंब रुल लक्षात ठेवायचा. दीर्घ काळ चालणाऱ्या हलक्या व्यायामाने वजन कमी होतं, तर कमी रिपीटिशन्स करण्याच्या आणि कमी वेळ चालणाऱ्या व्यायामाने वजन वाढतं. व्यायाम ठरवतांना त्याव्यतिरिक्तही अनेक घटक लक्षात घ्यावे लागतात. पण किमान या दोन गोष्टी लक्षात घेवून ठरवायचं की आपल्याला फिट व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं?

Web Title: what is the perfect exercise for you, yoga, Zumba or cycling, how to find it, read this..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.