Lokmat Sakhi >Fitness > सकाळी चालता तरी पोट जसच्या तसंच? डॉक्टर सांगतात वॉकनंतर ५ गोष्टी करा-लवकर स्लिम व्हाल

सकाळी चालता तरी पोट जसच्या तसंच? डॉक्टर सांगतात वॉकनंतर ५ गोष्टी करा-लवकर स्लिम व्हाल

What Should We Do After Morning Walk (Barik Honyasathi Upay in Marathi) : मॉर्निंग वॉक आणि व्यायामावरून घरी आल्यानंतर तुम्ही  कॅलरीज बर्न कितपत केले ते पाहावे लागेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 04:21 PM2023-12-24T16:21:41+5:302023-12-24T16:28:45+5:30

What Should We Do After Morning Walk (Barik Honyasathi Upay in Marathi) : मॉर्निंग वॉक आणि व्यायामावरून घरी आल्यानंतर तुम्ही  कॅलरीज बर्न कितपत केले ते पाहावे लागेल.

What Should We Do After Morning Walk: Things You Must Not Do While Going For a Morning Walk Doctor says | सकाळी चालता तरी पोट जसच्या तसंच? डॉक्टर सांगतात वॉकनंतर ५ गोष्टी करा-लवकर स्लिम व्हाल

सकाळी चालता तरी पोट जसच्या तसंच? डॉक्टर सांगतात वॉकनंतर ५ गोष्टी करा-लवकर स्लिम व्हाल

बिझी लाईफस्टाईल आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे लोक वेळेआधीच गंभीर आजारांच्या विखळ्यात अडकत आहेत. (Tips For Weight Loss)  सध्याच्या स्थिती लोकांची  ना उठण्याची वेळ फिक्स असते ना झोपण्याची. (Walking Mistakes) अशा स्थितीत स्वत:ला फिट ठेवणं म्हणजे खूप मोठा टास्क असतो. (Things You Must Not Do While Going For a Morning Walk)

व्यायाम करायलाही पुरेसा वेळ मिळत नसेल तर सकाळी कमीत कमी ३० मिनिटं वॉक करायला हवं. वॉक करताना काही चुका केल्यामुळे त्याचा फायदा होण्याऐवजी नुकसान जास्त होते.  डॉक्टर श्रेय शर्मा यांनी वॉक आणि एक्सरसाईजनंतरच रूटीन कसं याबाबत ओन्ली माय हेल्थला अधिक माहिती दिली आहे. (What Not To Do After Morning Walk) 

मॉर्निंग वॉकनंतर काय करायला हवं (What to do after morning walk to lose weight)

१) मॉर्निंग वॉकनंकर शरीर गरम होते.अशात घरी आल्यानंतर शरीर थंड करा. म्हणजेच एसी किंवा कुलरच्या समोर बसू नका. यामुळे तुमची तब्येत खराब होऊ शकते. तुम्ही कमी स्पीडमध्ये पंखा लावू शकता. ज्यामुळे हार्ट बीट नॉर्मल राहण्यास मदत होईल.

रोज बदाम-पनीर खाणं परवडत नाही? २० रूपयांत प्रोटीन देणारे ५ पदार्थ खा-मसल्स होतील मजबूत

२) मॉर्निंग वॉक आणि व्यायामावरून घरी आल्यानंतर तुम्ही  कॅलरीज बर्न कितपत केले ते पाहावे लागेल. जास्त मेहनतीचा योगा केला आहे की लाईट वॉक, व्यायाम याकडे लक्ष ठेवा.  जर तुम्ही जास्त वर्कआऊट केला असेल तर जवळपास २ ग्लास  पाणी प्या. हलका वर्कआऊट केला असेल १ ग्लास पाणी प्या. 

३) साध्या पाण्याऐवजी तुम्ही नारळपाणी पिऊ शकता. (Coconut water) यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होईल आणि त्वचाही ग्लोईंग दिसेल. व्हिटामीन सी आणि एंटी ऑक्सिडेंट्ससयुक्त नारळ पाणी शरीर डिटॉक्स करण्यास मदत करेल.

४) वॉक करून आल्यानंतर हलकं कोमट पाणी पिऊ शकता. थंड पाणी प्यायल्यास मांसपेशी जखडून राहू शकतात. कोमट पाणी प्यायल्याने मसल्स रिलॅक्स राहतील. 

५) पाणी प्यायल्यानंतर २० ते २५ मिनिटांनी फळं खा. असं केल्याने मॉर्निंग वॉक आणि व्यायामाप्रमाणेच कॅलरी  बर्न होण्यास मदत होईल. वॉकबरोबरच तुम्ही हेवी वर्कआऊटही करू शकता. याव्यतिरिक्त प्रोटीन्स शेक घेऊ शकता. यातून शरीराला एनर्जी आणि तुम्हाला आवश्यक असणारी पोषक तत्व मिळतील.

पोट सुटलंय, पूर्ण फिगर बेढब झालीये? जेवणाआधी 'ही' पानं चावून खा-मेणासारखी वितळेल चरबी

जर तुम्ही सकाळी वॉक आणि व्यायाम दोन्ही केले तर सकारात्मक परिणाम दिसून येईल. दिवसभरात भरपूर पाणी प्या आणि शरीर कायम हायड्रेट ठेवा. याशिवाय काकडी, नारळपाणी, बीट, पपई, गाजर अशा पदार्थांचा आहारात समावेश करा. दिवसभरात जेवणाच्या आणि नाश्त्याच्या  वेळा चुकवू नका. 

Web Title: What Should We Do After Morning Walk: Things You Must Not Do While Going For a Morning Walk Doctor says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.