Lokmat Sakhi >Fitness > नवरात्रीच्या उपवासापूर्वी करा ५ गोष्टी, उपवास करूनही नऊ दिवसात व्हाल फिट अँड फाईन...

नवरात्रीच्या उपवासापूर्वी करा ५ गोष्टी, उपवास करूनही नऊ दिवसात व्हाल फिट अँड फाईन...

What should we do before Navratri : Navratri Fasting Tips : सलग नऊ दिवस उपवास केल्याने थकवा किंवा गळून गेल्यासारखे वाटते अशावेळी आधीच काही गोष्टींची काळजी घेतली तर हे नऊ दिवस अगदी मजेत जातील...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2023 01:42 PM2023-10-14T13:42:58+5:302023-10-14T13:47:51+5:30

What should we do before Navratri : Navratri Fasting Tips : सलग नऊ दिवस उपवास केल्याने थकवा किंवा गळून गेल्यासारखे वाटते अशावेळी आधीच काही गोष्टींची काळजी घेतली तर हे नऊ दिवस अगदी मजेत जातील...

What should we do before Navratri,5 things to be done before Navratri | नवरात्रीच्या उपवासापूर्वी करा ५ गोष्टी, उपवास करूनही नऊ दिवसात व्हाल फिट अँड फाईन...

नवरात्रीच्या उपवासापूर्वी करा ५ गोष्टी, उपवास करूनही नऊ दिवसात व्हाल फिट अँड फाईन...

नवरात्रीच्या सणाला आता अवघा एकाच दिवस उरला आहे. काही तासांच्या अवधीतच सगळीकडे देवीचे आगमन होणार आहे. ९ दिवस चालणाऱ्या या उत्सवात अनेक लोक उपवास करतात. या नवरात्रीच्या उपवासाचे प्रकार हे वेगवेगळे (Tips to stay healthy while fasting for Navratri) असतात. कुणी सुरुवातीचे दोन दिवस उपवास करत तर कुणी शेवटचे दोन दिवस उपवास करतात. काहीजण तर संपूर्ण ९ दिवस उपवास (Navratri Fasting Rules) करतात. काहीजण खाऊन पिऊन तर काही अगदी कडक निर्जळी उपवास करतात. या उपवासाचे प्रकार जरी वेगवेगळे असले तरीही ते करण्यामागची सगळ्यांची श्रद्धा ही एकसारखीच असते. या नऊ दिवसांत ज्यांचे उपवास (Navratri 2023 on this shardiya navratri follow these 5 tips for healthy fasting shared cleveland clinic) असतात ते उपवासाचे पदार्थ खाण्याला जास्त प्राधान्य देतात. असे असले तरीही हे सलग नऊ दिवस उपवास करण्याची किंवा उपवासाचे पदार्थ रोज खाण्याची आपल्या शरीराला सवय नसते. यासाठी आपल्याला येणाऱ्या नऊ दिवसांच्या उपवासासाठी शरीराला तयार करावे लागते(What should we do before Navratri?).

क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, उपवास करण्याचे अनेक मार्ग आहेत. काहीवेळा, उपवास (Shardiya Navratri fasting tips) म्हणजे कर्बोदक किंवा चरबीसारख्या विशिष्ट प्रकारचे अन्न वर्ज्य करणे किंवा फक्त एकूण कॅलरीज कमी करणं. त्याच वेळी, काही लोक काहीही न खाता किंवा दिवसातून एकदाच खाल्ल्याशिवाय एक किंवा अधिक दिवस  उपवास करतात. जर तुम्ही दोन्ही वेळच्या उपवासाची योजना आखत असाल, तर तुमचे आरोग्य आणि ऊर्जा पातळी राखण्यासाठी या टिप्सचा वापर करू शकता( 5 things to be done before Navratri).

उपवास करण्यापूर्वी नेमकी कोणती काळजी घ्यावी (Tips to stay healthy while fasting for Navratri) ? 

१. सुरूवातीलाच कमी खा :- तज्ज्ञ शिफारस करतात की उपवास करण्यापूर्वी काही दिवस किंवा आठवडे हळूहळू अन्न आणि पेय कमी करा. अन्यथा, अचानक उपवास सुरू करणे तुमच्या शरीरासाठी धक्कादायक ठरू शकते. जेवण कमी करण्यासाठी, जेवणाच्या दरम्यानच्या स्नॅकसह दिवसातून तीनवेळा पूर्ण जेवण खाऊ नका हळूहळू खाणं कमी करा.

नवरात्रात उपवास करताना थकवा आला, गळाल्यासारखं झालं तर खा ५ पदार्थ, मिळेल इन्स्टंट एनर्जी...

२. साखर खाऊ नका :- आहारात साखरेचे प्रमाण कमी ठेवा. उपवास करण्यापूर्वी कुकीज आणि गोड चहा वर भर देणं करणे कधीही चांगली कल्पना नाही.  जेव्हा तुमच्या रक्तातील साखर एक किंवा दोन तासांनी कमी होते, तेव्हा तुम्हाला खूप भूक लागते आणि अशक्तपणा येऊ शकतो. दीर्घकाळ पुरेशी ऊर्जा शरीरात टिकून राहण्यासाठी कर्बोदके आणि प्रथिने खा.

कोण म्हणतं साबुदाणा नको, खाऊन तर पाहा साबुदाण्याची बर्फी - उपवासासाठी स्पेशल एनर्जीचा डोस...

३. भरपूर पाणी प्या :- काही धार्मिक उपवासांना पाण्यासोबतच सर्व अन्न आणि पेय घेतली जात नाही. जर तुमची उपवासाची मार्गदर्शक तत्त्वे पाणी पिण्याची परवानगी देत असतील, तर हायड्रेटेड राहिल्याने डिहायड्रेशन टाळण्यास, ऊर्जा पातळी राखण्यास आणि डोकेदुखी, चिडचिड यासारखे दुष्परिणाम कमी करण्यास मदत होईल. अशा स्थितीत उपवास करण्यापूर्वी आणि उपवासा दरम्यान पुरेसे पाणी प्यावे.

नवरात्रात उपवास करताना थकवा आला, गळाल्यासारखं झालं तर खा ५ पदार्थ, मिळेल इन्स्टंट एनर्जी...

४. हलका व्यायाम करा :- तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तुम्ही खात किंवा पीत नसताना जड किंवा थकवणारा व्यायाम केल्याने तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. या प्रकरणात, जोपर्यंत आपल्याला पुरेसे पोषक मिळत नाही तोपर्यंत हलका व्यायाम करणे चांगली कल्पना असू शकते. उपवास करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.    

५. जेवण स्वतः बनवा :- नवरात्रीच्या उपवासात तुम्ही जे काही खाल ते स्वतः बनवून खा. स्वतः बनवलेलं जेवण हे आरोग्यदायी असतं. उपवास करताना आधीच ओढाताण होते त्यामुळे त्यात जर तुम्ही बाहेरचं अन्न खाल्लं तर ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे जेवण स्वतः बनवून खा.

Web Title: What should we do before Navratri,5 things to be done before Navratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.