Lokmat Sakhi >Fitness > वजन कमी करायचं तर महिनाभर रात्री 'या' वेळेत जेवा; सुटलेलं पोट होईल सपाट, वजन कमी

वजन कमी करायचं तर महिनाभर रात्री 'या' वेळेत जेवा; सुटलेलं पोट होईल सपाट, वजन कमी

What Time Should You Eat Dinner? For Weight loss and Fitness : एका महिन्यासाठी 'या' वेळेत डिनर करा; वेट लॉस होणारच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2024 04:49 PM2024-06-05T16:49:39+5:302024-06-05T16:50:55+5:30

What Time Should You Eat Dinner? For Weight loss and Fitness : एका महिन्यासाठी 'या' वेळेत डिनर करा; वेट लॉस होणारच..

What Time Should You Eat Dinner? For Weight loss and Fitness | वजन कमी करायचं तर महिनाभर रात्री 'या' वेळेत जेवा; सुटलेलं पोट होईल सपाट, वजन कमी

वजन कमी करायचं तर महिनाभर रात्री 'या' वेळेत जेवा; सुटलेलं पोट होईल सपाट, वजन कमी

निरोगी राहण्यासाठी अनेक चांगल्या गोष्टी अंगीकरणं गरजेचं आहे (Weight Loss). जर आपण आपल्या जीवनशैलीत आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये काही बदल केले तर, आजार ब-याच अंशी टाळता येऊ शकतात (Fitness). निरोगी आरोग्यासाठी फक्त व्यायाम गरजेचं नसून, खाण्याकडेही विशेष लक्ष द्यायला हवे (Dinner Time). सध्या बिघडलेल्या जीवनशैलीमुळे आपण काय खातोय आणि कधी खातोय यावर विशेष लक्ष द्यायला हवे.

यासंदर्भात, आहारतज्ज्ञ नंदिनी यांनी रात्रीच्या वेळेस लवकर का जेवावे? महिनाभर लवकर आणि हलके डिनर केल्याने आरोग्याला किती फायदे मिळतात? याबद्दलची त्यांनी माहिती दिली आहे(What Time Should You Eat Dinner? For Weight loss and Fitness).

एका महिन्यासाठी हलके आणि लवकर रात्रीचे जेवण केले तर काय होईल?

- तज्ज्ञांच्या मते, रात्रीचे जेवण ७ किंवा ८ वाजेपर्यंत करायला हवे. सकाळी नाश्ता भरपेट करायला हवे. त्याच वेळी, रात्रीच्या वेळेस जेवण खूप हलके पदार्थ खाऊन करावे.

शुगर कंट्रोल ते बॅड कोलेस्टेरॉलवर खास उपाय, रोज आहारात हवी कोथिंबीर! फायदे किती? घ्या यादी..

- रात्रीच्या वेळेस जेवण लवकर केल्याने अन्न व्यवस्थित पचते. शिवाय झोपण्याआधी २ ते ३ तास आपल्याला मिळतात. काही जण हेवी डिनर करतात, आणि जेवणानंतर लगेच झोपतात. असे करू नये, झोपण्याच्या २ तास आधी डिनर करणं गरजेचं आहे.

- रात्रीच्या वेळी पोटात आणि आतड्यांमध्ये ऍसिड आणि एन्झाईम्सचा स्राव होतो. अशा स्थितीत रात्रीचे हलके जेवण केल्याने अन्न सहज पचते.

- रात्रीचे हलके आणि लवकर जेवण केल्याने रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात राहते.

- मुख्य म्हणजे वेट लॉससाठी मदत होते. रात्रीचे जेवण आणि सकाळचा नाश्ता यामध्ये १२ ते १४ तासांचे अंतर असावे. यामुळे वेट लॉस करण्यास मदत मिळेल.

- रात्री लवकर आणि हलके जेवण केल्याने शरीरातील हार्मोनल संतुलन देखील राखले जाते.

- यामुळे यकृत सहज डिटॉक्स होऊन निरोगी राहते.

निकाल लागले, टेन्शन कमी झालं आता प्या मन आणि शरीराला थंडावा देणारं ताडगोळ्याचं सरबत; पाहा सोपी कृती..

- रात्री हलके अन्न खाल्ल्याने झोप चांगली आणि लवकर लागते. शिवाय मानसिक आरोग्यही सुधारते.

- हलकं अन्न खाल्ल्याने चयापचय क्रिया बुस्ट होते. ज्यामुळे दिवसभर आपल्याला काम करण्याची उर्जा मिळते.

Web Title: What Time Should You Eat Dinner? For Weight loss and Fitness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.