Lokmat Sakhi >Fitness > दिवाळीत जास्त तेलकट खाण्यात आलं, तर वजन वाढू नये म्हणून या ५ गोष्टी करा, मेंटेन राहाल

दिवाळीत जास्त तेलकट खाण्यात आलं, तर वजन वाढू नये म्हणून या ५ गोष्टी करा, मेंटेन राहाल

What to do after eating oily food : तेलकट अन्न किंवा तळलेले अन्न खाल्ल्यानंतर कोमट पाणी प्यायल्यास पचनक्रिया जलद होते आणि तेलकट अन्न पचण्यास सोपे जाते. त्यामुळे टाकाऊ वस्तू बाहेर काढण्यासही मदत होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 01:49 PM2022-10-24T13:49:18+5:302022-10-24T13:56:57+5:30

What to do after eating oily food : तेलकट अन्न किंवा तळलेले अन्न खाल्ल्यानंतर कोमट पाणी प्यायल्यास पचनक्रिया जलद होते आणि तेलकट अन्न पचण्यास सोपे जाते. त्यामुळे टाकाऊ वस्तू बाहेर काढण्यासही मदत होईल.

What to do after eating oily food : Things to do and avoid after having too much oily food | दिवाळीत जास्त तेलकट खाण्यात आलं, तर वजन वाढू नये म्हणून या ५ गोष्टी करा, मेंटेन राहाल

दिवाळीत जास्त तेलकट खाण्यात आलं, तर वजन वाढू नये म्हणून या ५ गोष्टी करा, मेंटेन राहाल

तब्येत चांगली राहण्यासाठी तेलकट पदार्थ टाळावे लागतात. पण दिवाळीच्यावेळेस मात्र फराळाचे पदार्थ मनसोक्त खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही. अशा स्थितीत आपण अशा काही टिप्स वापरून तेलकट पदार्थ खाल्ल्याने होणारे नुकसान भरून काढता येईल. (What to do after eating oily food) तळलेले अन्न हे ट्रान्स फॅट आणि सॅच्युरेटेड फॅटने भरलेले असते जे आपले वजन तर वाढवतेच पण आपल्याला अनेक आजारांकडेही ढकलते. असे अन्न खाल्ल्याने अपचन, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, मधुमेह आणि हृदयविकार इत्यादींचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत तेलकट पदार्थ शक्यतो टाळावेत. (Things to do and avoid after having too much oily food)

कोमट पाण्याचे सेवन

तेलकट अन्न खाल्ल्यानंतर कोमट पाणी प्यायल्यास पचनक्रिया जलद होते आणि तेलकट अन्न पचण्यास सोपे जाते. त्यामुळे टाकाऊ वस्तू बाहेर काढण्यासही मदत होईल. (Ate Oily Food, Do This To Prevent The After effects)

डिटॉक्स ड्रिंक

तुम्ही जेवल्यानंतर डिटॉक्स ड्रिंक्स म्हणजेच ग्रीन टी, व्हेजिटेबल ज्यूस, लिंबूपाणी आणि संत्र्याचा रस प्यायल्यास तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि शरीराला कमीत कमी नुकसान होईल.

पुढचे चोविस तास हलका आहार घ्या

जर तुम्ही तेलकट अन्न खाल्ले असेल तर पुढचे चोवीस तास साधे अन्न खाण्याचे ठरवा. जसे मूग खिचडी, कोशिंबीर, चपाती, मसूर किंवा साधी भाजी.

वॉक गरजेचं

तेलकट अन्न खाल्ल्यानंतर किमान अर्धा तास चाला. असे केल्याने केवळ कॅलरीज बर्न होणार नाहीत, पचनक्रियेतील समस्याही कमी होतील.

प्रोबायोटिक

जेवण झाल्यावर एक वाटी दही, ताक किंवा लस्सी प्या. प्रोबायोटिक्समुळे तेलकट अन्नाचे दुष्परिणाम कमी होण्यास मदत होते.

Web Title: What to do after eating oily food : Things to do and avoid after having too much oily food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.