मानवी जीवनाच्या जगण्याशी संबंधित प्रत्येक गोष्टींचे काही नियम आहेत, आणि ते नियम काटेकोरपणे पाळणं आपल्यासाठी हिताचं ठरतं. काही नियम मोडले तर, गंभीर आजारांचा धोका वाढत जातो. आजकाल प्रत्येक जण नियमाच्या विरुद्ध जाऊन सगळ्या गोष्टी करत आहेत (Fitness Tips). जेवणाची वेळ चुकवण्यापासून झोप वेळेवर न घेतल्याने तब्येत बिघडते. सध्या लोकं लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत (Dinner Tips).
धावपळीचे जीवन त्यात वेळेवर न जेवण केल्यानेही वजन वाढते. काही लोकं रात्री १० किंवा ११ नंतर जेवण करतात. जे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर, रात्रीचं वेळेवर जेवण करणं गरजेचं आहे (Weight Loss Tips). रात्रीचं वेळेवर जेवण केल्याने वजन तर कमी होईलच, शिवाय आरोग्याच्या निगडीत इतरही समस्या दूर होतील(What's The Best Time To Eat Dinner If You Want To Lose Weight).
या वेळेनंतर जेवण करणे चुकीचे
रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ म्हणजे सायंकाळी ७ ते ८. या वेळात जर जेवण केलात तर, अन्न पचण्यास पचनक्रियेला वेळ मिळते. ज्यामुळे पोटाचे विकार आपल्याला छळत नाही, शिवाय झोपही वेळेवर लागते. जे लोकं रात्री १० ते ११ वाजेपर्यंत झोपतात, त्यांनी कोणत्याही परिस्थितीत रात्रीचे जेवण रात्री ७ ते ८ वाजेच्या दरम्यान करावे.
रात्री उशिरा जेवणाचे फायदे
- काही लोकांचे काम रात्रीचे १० वाजेच्या आत आवरून पूर्ण होत नाही. ज्यामुळे पुढचे गणित बिघडते. याकारणामुळे आपण उशिरा जेवतो, आणि उशिरा झोपतो. त्यामुळे स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ काढून जेवण वेळेवर करा.
'५' गोष्टी करण्यापूर्वी पाणी प्याल तर राहाल कायम फिट; पण पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? कधी प्यावे?
- जरी आपण १० नंतर झोपत असाल तरी, जेवण वेळेवर करा. कामाच्या व्यायापामुळे जर जमत नसेल तर, ८ ते ९ वाजेच्या दरम्यान जेवण करा. यामुळे जेवण व्यवस्थित पचेल. शिवाय जेवणात हलके पदार्थ खा, आणि पोर्शन कण्ट्रोलमध्ये राखून खा.
- झोपण्याच्या २ ते ३ तास आधी जेवण केल्याने व्यवस्थित पचते. ज्यामुळे पोट फुगणे, बद्धकोष्ठता, गॅसेसचा त्रास यासह इतर समस्या दूर होतात.
- मधुमेहग्रस्त रुग्णांनी वेळेवर जेवण करणे गरजेचं आहे. शिवाय ज्यांना ब्लड शुगर आणि हृदयाच्या निगडीत समस्या आहे, त्यांनी वेळेवर जेवण करावे.
लग्नाची तारीख ठरली? फिटनेससाठी खाणं टाळता? ६ जबरदस्त टिप्स-लग्नात दिसाल फिट-सुडौल
- जर आपण झोपण्याच्या तीन तास आधी जेवण केले तर, आपले शरीर इन्शुलीनचा योग्य प्रकारे वापर करेल. ज्यामुळे पोटातील अन्नाचे ग्लुकोजमध्ये योग्यरित्या रूपांतर होईल. शिवाय रक्तातील साखरही नियंत्रणात राहील.