Join us  

दिवसभरात कधी वजन केले तर वजन अचूक कळते? वजन काट्याची खास ट्रिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2023 3:49 PM

When Is The Best Time To Weigh Yourself? : बरेचदा आपण वजन मोजून ते मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करतो. स्वतःचे वजन करण्याची दिवसातील सर्वोत्तम वेळ कोणती आहे हे आपल्याला माहीत आहे का?

सध्याच्या काळात वाढते वजन ही एक मोठी जागतिक समस्या होऊन बसली आहे. आजकाल प्रत्येक व्यक्ती आपले वजन कमी करण्याचा मागे लागलेले असते. आपले वजन दिवसेंदिवस वाढत जात आहे याच चिंतेत अनेकजण असतात. वजन कमी करण्यासाठी अनेकजण सतत प्रयत्नात असतात. काहीजण कडक डाएट फॉलो करतात तर काहीजण जिम, योगा यांसारखे उपाय करून पाहतात. स्वतःवर काही बंधन घालून खाण्यापिण्याच्या योग्य सवयींचं पालन केलं, तसेच वेळच्या वेळी एक्सरसाइज केला तर वजन आपोआप कमी होण्यास मदत होते.

 वजन कमी करण्याच्या या प्रवासात आपण अनेकदा वजन काट्यावर उभं राहून आपलं वजन किती कमी झालं हे पाहत असतो. वजन कमी करण्यासाठी आपण स्वतः समोर काही टार्गेट्स ठेवून देतो. अमुक एका महिन्यात माझे इतके किलो वजन कमी झालेच पाहिजे असा पण करून आपण आपल्या वेट लॉस जर्नीला सुरुवात करतो. या वेट लॉस जर्नीत अनेकदा असे प्रसंग येतात, की आपल्याला वजनाची नोंद करण्यासाठी वजन काट्यावर उभे राहावे लागते. अशावेळी आपण दिवसाच्या कोणत्या वेळी वजन काट्यावर उभे राहून वजन कमी करतो आहे याला देखील तितकेच महत्व असते. काहीजण सकाळी उठल्या उठल्या वजन काट्यावर उभे राहून वजन करतात तर काहीजण संध्याकाळ किंवा रात्री वजन करतात. मग नक्की वजन मोजून पाहण्यासाठी दिवसातील कोणती वेळ योग्य आहे ? असा प्रश्न आपल्याला पडला असेल तर याबद्दल एक्स्पर्ट नक्की काय माहिती देतात ते पाहूयात(When Is the Best Time to Weigh Yourself and Why?).

वजन मोजायचे आहे मग दिवसातील नक्की कोणत्या वेळी वजन मोजून पाहणे योग्य आहे ? 

प्रत्येकाला आपल्या वजनाबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता असते. आपले वजन किती कमी झाले आहे आणि किती वाढले आहे याचे निरीक्षण करणे गरजेचे असते. वजनाचा आपल्या आरोग्याशी थेट संबंध असतो आणि निरोगी राहण्यासाठी वजनावर नियंत्रण ठेवले पाहिजे. आपण वजन मोजण्यासाठी शक्यतो वजन मोजून दाखवणाऱ्या मशीनचा वापर करतो. आत्तापर्यंत आपण अनेकवेळा आपले वजन मोजले असेल, परंतु वजन मोजण्यासाठी दिवसातील एक ठरविक वेळच योग्य आहे, याच वेळी आपल्याला आपल्या वजनाचा योग्य आकडा मिळू शकतो. विशेषतः वजन कमी करणाऱ्या लोकांनी याची काळजी घेणे खूपच गरजेचे आहे.

कोण म्हणतं वजन कमीच होत नाही? ४ साधे-सोपे उपाय-वजन कमी होणारच.... 

आपले वजन दिवसातून अनेक वेळा चढ-उतारातून जात असते. आपल्या शारीरिक वजनाचा योग्य तो आकडा मिळवण्यासाठी वजन ट्रॅक करण्यासाठी, दुपारी किंवा संध्याकाळी स्वतःचे वजन करणे शक्यतो टाळावे. असे केल्याने, आपल्याला योग्य वजन कळू शकणार नाही आणि आपले निरीक्षण योग्यरित्या केले जाऊ शकत नाही. यामुळे आपल्याला योग्य वजनाचा आकडा न मिळण्याने वजन कमी करण्याच्या प्रवासात अडचणी येऊ शकतात.   

वजन कमी करण्याचा ५० - ३५ - १५ फॉर्म्युला, ऋजुता दिवेकर सांगतात लठ्ठपणा कमी करण्याची खास ट्रिक...

मेडिकल न्यूज टुडेच्या अहवालानुसार, रिकाम्या पोटी वजन मोजण्यासाठी पहाटे ही सर्वोत्तम आणि अचूक वेळ आहे. आपल्या शरीराचे योग्य वजन सकाळी कळते, कारण त्यावेळी पोट रिकामे असते आणि शरीरात अन्नाचे वजन नसते. यामुळेच हा काळ वजन मोजण्यासाठी योग्य मानला जातो. 

आपण आपल्या सोयीनुसार दुपारी किंवा संध्याकाळी देखील वजन मोजू शकतो. परंतु सकाळी पहाटेच्या वेळीच वजन केल्याने आपल्याला योग्य कल्पना येऊ शकते. मात्र, जेवल्यानंतर वजन करण्याऐवजी रिकाम्या पोटी वजन मोजणे केव्हाही उत्तम. 

सकाळी उठल्या उठल्या करा ३ गोष्टी, वजन होईल झरझर कमी-तब्येत एकदम फिट...

वजन मोजताना दोन महत्त्वाच्या गोष्टी कायम लक्षात ठेवाव्यात. सर्वात पहिले वजन मोजण्याचे यंत्र उत्तम दर्जाचे असावे. तसेच वजन करताना एकदम हलका  ड्रेस परिधान केलेला असावा, तसेच प्रत्येकवेळी वजन करताना नेहमी तोच ड्रेस परिधान करावा यामुळे, वजनात बदल होण्याची शक्यता नगण्य असेल.

टॅग्स :फिटनेस टिप्स