भारत हा चहाप्रेमींचा देश आहे असे म्हणायला हरकत नाही. बऱ्याचजणांच्या दिवसाची सुरुवात ही सकाळच्या कपभर चहानेच होते. सकाळी चहा प्यायलो नाही तर दिवसाची सुरुवात झाल्यासारखीच वाटत नाही असे बोलणारे कित्येकजण आपण पाहिले असतील. सकाळ असो किंवा संध्याकाळ, उन्हाळा असो किंवा पावसाळा, वेळेला चहा हा लागतोच. आपल्याकडे अनेक चहाप्रेमी सापडतील, जे आपल्या दिवसाची सुरुवात चहाने करतात आणि दिवसभरात किमान ३ ते ४ कप चहा पितात. अनेकदा ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांना चहाचे व्यसन लागते(Can we drink tea just before workout?).
सकाळी चहा पिणे चांगले की वाईट हे आतापर्यंत आपण वाचलेच असेल. परंतु सकाळी वर्कआऊट करण्याआधी चहा प्यावा की पिऊ नये असा प्रश्न बरेच जणांना (Can I drink tea before a workout) पडतो. आपल्यापैकी बरेचजण सकाळची ही चहा पिण्याची सवय सोडण्याचा प्रयत्न करतात, परंतु कितीही प्रयत्न करून त्यांची ही सवय सुटत नाही. अशातच आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी काहीजण सकाळी न चुकता वर्कआऊट करतात. परंतु वर्कआऊट करण्यापूर्वी कपभर (When to drink tea before workout) तरी चहा पितातच. त्यामुळे सकाळी सकाळी हा कपभर चहा पिऊन वर्कआऊट करणे कितपत योग्य आहे ? सकाळी चहा पिण्याचा आपल्या शरीरावर किंवा वर्कआऊटवर काही परिणाम होतो का ? दिल्ली येथील रामहंस चॅरिटेबल हॉस्पिटलचे आयुर्वेदिक डॉक्टर श्रेय शर्मा यांनी वर्कआऊटच्या आधी चहा प्यावी की पिऊ नये याबद्दलचा सल्ला दिला आहे(Is it good to drink tea before a workout?)
१. वर्कआऊट करण्यापूर्वी चहा प्यावा की पिऊ नये ?
जे लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहाने करतात त्यांच्या मनात सकाळच्या वर्कआऊटपूर्वी हा प्रश्न नक्कीच येत असणार की, चहा प्यायल्यानंतर वर्कआऊट करणं योग्य आहे की नाही ? याबाबत डॉ. श्रेय शर्मा यांनी सांगितले की, चहा प्यायल्यानंतर किमान १ तासानंतर (How long after drinking tea can I exercise?) वर्कआऊट करण्यास काहीच हरकत नाही. परंतु जर आपल्याला अधिक फिट राहायचे असेल तर वर्कआऊट करण्यापूर्वी, चहा पिण्याऐवजी काही पौष्टिक पदार्थ खाण्याला कायम प्राधान्य द्यावे. वर्कआऊटच्या आधी आपण सफरचंद, केळी, डाळिंब आणि चिकू अशी फळे खाऊ शकता, असे डॉक्टरांनी सुचवले आहे. याशिवाय वर्कआऊटच्या अर्धा किंवा १ तास आधी भरपूर पाणी प्यावे. साध्या पाण्याऐवजी आपण नारळाचे पाणीही पिऊ शकता. सकाळी नारळ पाणी प्यायल्याने त्याचे आपल्या आरोग्याला अनेक चांगले फायदे मिळतात.
कितीही डाएट करा, व्यायाम करुन घाम गाळा वजन कमीच होत नाही ? ‘असं’ वागणं तातडीने थांबवा...
२. वर्कआऊट करण्यापूर्वी चहा प्यावासा वाटलाच तर पर्याय काय ?
१. ग्रीन टी (Green Tea) :- वर्कआऊटच्या १ तास आधी आपण ग्रीन टी पिऊ शकता. ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असतात ज्यामुळे आपली चयापचय क्रिया सुधारते. जर आपण वजन कमी करण्यासाठी वर्कआऊट करत असाल तर 'ग्रीन टी' हा एक चांगला पर्याय आहे. ग्रीन टी पिण्याचे आरोग्यासाठी अनेक चांगले फायदे दिसून येतात.
२. ब्लॅक टी (Black Tea) :- जर आपण चहाचे खूपच शौकीन असाल आणि सकाळची चहा पिण्याची सवय अजिबात सोडू शकत नसाल तर ब्लॅक टी हा एक उत्तम पर्याय ठरु शकतो. दुधासोबत चहा पिण्याऐवजी आपण वर्कआऊटपूर्वी ब्लॅक टी पिऊ शकता. ब्लॅक टी बनवताना त्यात साखर व दूध घालू नये. या ब्लॅक टीमध्ये आपण लिंबू देखील पिळून घेऊ शकता. साखर व दूध नसलेला ब्लॅक टी आपल्याला हायड्रेटेड ठेवेल आणि वर्कआऊट दरम्यान आपल्याला उत्साही वाटेल.
मॉर्निंग वॉकला काही खाऊन जावे की उपाशीपोटीच जाणे योग्य ? तज्ज्ञ सांगतात, नक्की योग्य काय...
३. कॅमोमाइल टी (Chamomile Tea) :- कॅमोमाइलच्या फुलांपासून बनवलेला कॅमोमाइल टी वर्कआऊट आधी पिण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. आपल्याला बाजारात वाळलेली कॅमोमाइलची फुले सहज मिळतील, ज्याचा वापर करून आपण हा चहा घरी बनवू शकता. कॅमोमाइल चहामध्ये अँटी-ऑक्सिडेंट असतात, ज्याचा शरीरावर चांगला परिणाम होतो. वर्कआऊट करण्यापूर्वी आपण कॅमोमाइल चहा पिऊ शकता.
वजन कमी करण्यासाठी ४ मंत्र विसरुच नका ! तापसी पन्नूच्या न्यूट्रिशनिस्ट मुनमुन गनेरीवालचा सल्ला...