Lokmat Sakhi >Fitness > सूर्यनमस्कार घालतााना श्वास नेमका कधी घ्यावा, कधी सोडावा? पाहा व्हिडिओ.

सूर्यनमस्कार घालतााना श्वास नेमका कधी घ्यावा, कधी सोडावा? पाहा व्हिडिओ.

All The Steps Of Surya Namaskar With Proper Breathing : Sun-Salutation : सूर्यनमस्कार अनेकजण घालतात परंतु प्रत्येक आसनानुसर श्वासांची स्थिती कशी असावी याकडेही लक्ष द्यायला हवे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2023 06:49 PM2023-01-12T18:49:13+5:302023-01-12T18:57:06+5:30

All The Steps Of Surya Namaskar With Proper Breathing : Sun-Salutation : सूर्यनमस्कार अनेकजण घालतात परंतु प्रत्येक आसनानुसर श्वासांची स्थिती कशी असावी याकडेही लक्ष द्यायला हवे.

When to inhale and when to exhale while performing sun-salutation? Watch the video. | सूर्यनमस्कार घालतााना श्वास नेमका कधी घ्यावा, कधी सोडावा? पाहा व्हिडिओ.

सूर्यनमस्कार घालतााना श्वास नेमका कधी घ्यावा, कधी सोडावा? पाहा व्हिडिओ.

सूर्यनमस्काराचे महत्व आणि फायदे काय आहेत हे आपण प्रत्येकानेच आपल्या घरातील वृद्ध व्यक्तींकडून ऐकले असतील. आजकाल आपल्याला फिट राहण्यासाठी जिममध्ये मशीन एक्सरसाइज सोबत सूर्यनमस्कार घालण्याचे सल्ले दिले जातात. सुर्यनमस्कार घालणे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी एक उत्तम व्यायाम मानला जातो. रोज सकाळी झोपेतून उठल्यावर अनशापोटी सूर्यासमोर मोकळया पटांगणात सूर्यनमस्कार करायला हवा. 

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व्यायामासाठी आपल्याला वेळ मिळत नाही, अशी तक्रार केली जाते. अशा वेळी किमान सूर्यनमस्कार घातले तरी त्याचा फायदा आपल्या आरोग्यासाठी होतो. सूर्यनमस्कार घालण्यासाठी सराव फार महत्त्वाचा असतो. किती सूर्यनमस्कार घातले यापेक्षा त्यातील प्रत्येक आसन किती अचूकपणे केली आहेत हे पाहणे महत्त्वाचे असते. घाईघाईने सूर्यनमस्कार आटोपून मोकळे होण्याऐवजी त्यातील नेमकेपणा अंगी बाणवणे, प्रत्येक आसनासोबत श्‍वास घेण्याची व सोडण्याची प्रक्रिया योग्य पद्धतीने होते आहे हे पाहणे आवश्यक असते. आपल्यापैकी बरेचजण सूर्यनमस्कार घालतात परंतु प्रत्येक आसनानुसर श्वासांची स्थिती कशी असावी याकडे कुणीच लक्ष देत नाही. सूर्यनमस्कारा दरम्यान श्वासांची स्थिती कशी असावी याबद्दल समजून घेऊयात (All The Steps Of Surya Namaskar With Proper Breathing).

सूर्यनमस्कारा दरम्यान श्वासांची स्थिती कशी असावी याबद्दलचा एक व्हिडीओ learnyogawithpriya या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.  

सूर्यनमस्कार घालण्याची योग्य पद्धत :- 

१. सर्वप्रथम स्तब्ध उभे राहून, पायाच्या टाचांमध्ये ४५ अंशांचा कोन करून उभे राहावे. हात नमस्कार स्थितीमध्ये छातीजवळ ठेवून मान सरळ ताठ ठेवावी. 
२. नमस्कार स्थितीमध्ये असलेले हात तसेच पुढे घेऊन आकाशाकडे पाहत थोडेसे मागे वळावे.(श्वास घ्या.)
३. या स्थितीमध्ये कानाशी चिकटलेले हात तसेच ठेवून कंबरेपासून समोर वाकावे. हात जमिनीवर टेकावे. गुडघे न वाकवता हे करावे. (श्वास सोडा.)
४. आता डावा पाय पुढे घेत दोन्ही हातांच्यामध्ये ठेवून उजवा पाय लांब मागे ताणावा. छाती उंच करून वर आकाशाकडे पाहावे.(श्वास घ्या.)
५. या प्रकारामध्ये दोन्ही पाय मागे घेऊन हात पुढे घेऊन कंबरवर उचलावी. आपल्या शरीराचा भार हातपायांवर ठेवावा. (श्वास सोडा.)
६. आता गुडघे जमिनीवर टेकावेत व हनुवटीही जमिनीवर टेकवून हात पुढे करावेत. (श्वास रोखून धरावा.)
७. या प्रकारामध्ये पाय जमिनीवर ठेवून म्हणजे झोपून हात कोपऱ्यातून दुमडावे व जमिनीवर ठेवावे व मानेपासून वर पाहावे.(श्वास घ्या.)
८. आता पाय जमिनीवर सरळ ठेवा आणि नितंबांना वर उचला. श्वास सोडताना खांदे सरळ ठेवा आणि डोके आतल्या बाजूला ठेवा.(श्वास सोडा.)


९. डावा पाय सरळ मागच्या बाजूला न्या. सरळ पायाचा गुडघा जमिनीशी समांतर असला पाहिजे. आता दुसरा पाय गुडघ्यात वाकवा आणि तळहात जमिनीवर सरळ ठेवा. आपले डोके वरच्या बाजूला ठेवा.(श्वास घ्या.)
१०. त्यानंतर कंबरेपासून खाली वाकावे. गुडघे न वाकवता हात जमिनीवर टेकावेत.(श्वास सोडा.)
११. पहिल्या स्थितीत उभे राहून, आपले हात आपल्या डोक्यावर करा आणि ते सरळ ठेवा. आता प्रणाम अवस्थेत हात मागे घ्या आणि कंबर मागच्या बाजूला वाकवा. या दरम्यान तुमची स्थिती अर्ध चंद्राच्या आकारासारखी दिसते.(श्वास घ्या.)
१२. आता सरळ ताठ उभे राहून, हात जोडलेल्या अवस्थेमध्ये छातीजवळ ठेवावे. (श्वास सोडा.)

Web Title: When to inhale and when to exhale while performing sun-salutation? Watch the video.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.