Lokmat Sakhi >Fitness > पायऱ्या चढणे- उतरणे की चालणे? हृदयासाठी दोन्हीपैकी काय जास्त चांगलं? वाचा तज्ज्ञांचं मत

पायऱ्या चढणे- उतरणे की चालणे? हृदयासाठी दोन्हीपैकी काय जास्त चांगलं? वाचा तज्ज्ञांचं मत

Health Tips About Heart Health: नियमितपणे चालायला जाणे की पायऱ्यांची चढ- उतार करणे यापैकी कोणता व्यायाम हृदयाच्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक चांगला असतो ते पाहूया..(which exercise is more beneficial for heart?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2025 13:54 IST2025-02-15T13:45:40+5:302025-02-15T13:54:02+5:30

Health Tips About Heart Health: नियमितपणे चालायला जाणे की पायऱ्यांची चढ- उतार करणे यापैकी कोणता व्यायाम हृदयाच्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक चांगला असतो ते पाहूया..(which exercise is more beneficial for heart?)

which exercise is more beneficial for heart, how to improve heart health? | पायऱ्या चढणे- उतरणे की चालणे? हृदयासाठी दोन्हीपैकी काय जास्त चांगलं? वाचा तज्ज्ञांचं मत

पायऱ्या चढणे- उतरणे की चालणे? हृदयासाठी दोन्हीपैकी काय जास्त चांगलं? वाचा तज्ज्ञांचं मत

Highlightsहृदय निरोगी राहण्यासाठी कोणता व्यायाम करणं जास्त चांगलं याविषयी माहिती...

हल्ली कमी वयातच हृदयविकार होण्याचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे. कमी वयातल्या तरुणांना हार्टअटॅक येण्याचे किस्से आपण नेहमीच ऐकत असतो. त्यामुळे हृदयाच्या आरोग्याची काळजी अधिक बारकाईने घेण्याची गरज आहे. बरेच जण व्यायाम तर करतात पण ते करत असलेला व्यायाम हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी पुरेसा असेलच असे नाही (how to improve heart health?). काही लोक नियमितपणे चालायलाही जातात. चालण्यामुळे फिटनेस टिकून राहण्यास मदत होते हे अगदी खरं (which exercise is more beneficial for heart?). पण हा व्यायाम खरंच हृदयाच्या आरोग्यासाठी योग्य आहे का, हृदयाच्या दृष्टीनेच विचार करायचा झाल्यास चालण्याचा व्यायाम योग्य की पायऱ्या चढण्या- उतरण्याचा व्यायाम अधिक चांगला याविषयी तज्ज्ञांनी दिलेली ही खास माहिती..(Health Tips About Heart Health) 

 

हृदय निरोगी राहण्यासाठी कोणता व्यायाम जास्त चांगला

हृदय निरोगी राहण्यासाठी कोणता व्यायाम करणं जास्त चांगलं याविषयी डॉ. कुमार केंचाप्पा यांनी दिलेली माहिती झी न्यूज इंडिया यांनी प्रकाशित केली आहे. यामध्ये डॉक्टर असं सांगत आहेत की हृदयासाठी पायऱ्या चढणे आणि उतरणे हा व्यायाम अधिक चांगला आहे.

हृदयाला कायम हेल्दी ठेवणारे ५ पदार्थ, बॅड कोलेस्ट्रॉल होईल कमी आणि हृदय राहील मजबूत

यामुळे शरीरातील रक्ताभिसरण वाढते, बॅड कोलेस्ट्रॉल कमी होऊन रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. चालण्याच्या व्यायामापेक्षाही पायऱ्यांची चढ- उतार केल्याने कॅलरी जास्त प्रमाणात बर्न होतात. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासाठीही हा व्यायाम चांगला आहे. रोज काही मिनिटांसाठी हा व्यायाम केल्याने हृदयाला खूप फायदा होऊ शकतो. शिवाय हा व्यायाम असा आहे ज्यासाठी तुम्हाला अजिबातच पैसे खर्च करण्याची गरज नाही आणि तुम्ही तो तुमच्या वेळेनुसार कधीही करू शकता.

 

पायऱ्या चढण्या- उतरण्याचा व्यायाम कोणी करू नये?

१. डॉक्टर सांगतात की ज्यांना जॉईंट पेन आणि अर्थरायटीसचा त्रास आहे अशा लोकांनी हा व्यायाम करू नये.

२. ज्यांचे हृदय आधीच कमकुवत असून ज्यांची ट्रिटमेंट सुरू असेल त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हा व्यायाम करावा.

अभ्यास करताय पण वाचलेलं लक्षात राहात नाही, मन एकाग्र होत नाही? ४ टिप्स, अभ्यासात मन रमेल

३. ज्यांना बॅलेन्सिंगचा त्रास असतो अशा लोकांनीही पायऱ्या चढण्याचा- उतरण्याचा व्यायाम करू नये.

४. काही शस्त्रक्रिया नुकतीच झाली असेल किंवा त्यातून रिकव्हर होण्याचा काळ सुरू असेल तर त्या काळातही हा व्यायाम करू नये. 

 

Web Title: which exercise is more beneficial for heart, how to improve heart health?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.