Lokmat Sakhi >Fitness > वजन कमी करण्यासाठी आठवड्यातून किती दिवस, कोणता व्यायाम करावा? बघा तज्ज्ञांनी दिलेला सल्ला

वजन कमी करण्यासाठी आठवड्यातून किती दिवस, कोणता व्यायाम करावा? बघा तज्ज्ञांनी दिलेला सल्ला

Which Exercise Is Perfect For Fast Weight Loss: वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर तज्ज्ञांनी दिलेला हा एक खास सल्ला एकदा बघाच... (how many days we should do exercise for weight loss)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2024 09:12 AM2024-06-08T09:12:45+5:302024-06-08T09:15:01+5:30

Which Exercise Is Perfect For Fast Weight Loss: वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर तज्ज्ञांनी दिलेला हा एक खास सल्ला एकदा बघाच... (how many days we should do exercise for weight loss)

which exercise is perfect for fast weight loss, how many days we should do exercise for weight loss | वजन कमी करण्यासाठी आठवड्यातून किती दिवस, कोणता व्यायाम करावा? बघा तज्ज्ञांनी दिलेला सल्ला

वजन कमी करण्यासाठी आठवड्यातून किती दिवस, कोणता व्यायाम करावा? बघा तज्ज्ञांनी दिलेला सल्ला

Highlightsव्यायाम करून तुम्ही ते वजन कमी करताय ते वजन तुम्ही चुकीच्या खाण्यापिण्यामुळे खूप जलद वाढवू शकता. 

बैठ्या कामाच्या पद्धतीमुळे, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे, व्यायामाच्या अभावामुळे किंवा आळशीपणामुळे हल्ली बऱ्याच जणांना लठ्ठपणाचा त्रास होतो आहे. वजन झपाट्याने वाढतं. वाढत्या वजनामुळे सध्या अनेकजणी त्रस्त आहेत. तुम्हीही सतत वाढत्या वजनामुळे त्रस्त असाल आणि वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर एकदा तज्ज्ञांनी दिलेला हा सल्ला वाचा (which exercise is perfect for fast weight loss). वजन कमी करण्याचा तुमचा प्रवास त्यामुळे नक्कीच सोपा होऊ शकतो. शिवाय वजनही झपाट्याने कमी होऊ शकतं. (how many days we should do exercise for weight loss)

 

वजन कमी करण्यासाठी आठवड्यातून किती दिवस व्यायाम करावा?

वजन कमी करण्यासाठी आठवड्यातून किती दिवस तुम्ही व्यायाम केलाच पाहिजे, याविषयी फिटनेस ट्रेनर सोही कार्पेंटर यांनी दिलेली माहिती आजतकने प्रकाशित केली आहे. सोही यांनी सांगितलं की अमेरिकन हेल्थ डिपार्टमेंटनुसार प्रत्येकाने आठवड्यातून २ तास ३० मिनिटांचा व्यायाम केलाच पाहिजे.

प्रवासात ३ पदार्थ कायम सोबत ठेवा- लहान मुलांसाठीही उत्तम, अजिबात थकवा येणार नाही

म्हणजेच आठवड्यातून ५ दिवस प्रत्येक अर्धा तास व्यायाम करणं वेटलॉससाठी गरजेचं आहे. त्यातही असा उल्लेख केला आहे की तुम्ही जर मध्यम इंटेन्सिटी असणारा व्यायाम करत असाल तर आठवड्यातून १५० मिनिटं तुम्हाला व्यायाम करणं गरजेचं आहे. पण जर तुम्ही हाय इंटेन्सिटी असणारा व्यायाम करत असाल तर तुम्ही तो आठवड्यातून ७५ मिनिटं करणं गरजेचं आहे.

 

झटपट वेटलॉससाठी कोणता व्यायाम करावा?

झटपट वेटलॉस होण्यासाठी कार्डिओ एक्सरसाईज, एरोबिक्स या प्रकारातला व्यायाम करावा. यामध्ये स्विमिंग, सायकलिंग, रनिंग असा व्यायाम करू शकता.

जगातली सगळ्यात 'Jealous woman', नवऱ्याची दररोज घेते लाय डिटेक्टर टेस्ट, बघा आणखी काय करते... 

फिटनेस एक्सपर्ट असंही सांगतात की वजन कमी करायचं असेल तर सकाळी नियमितपणे व्यायाम केला आणि उर्वरित दिवस आळसात घालवला असं करू नका. दिवसभर शारिरीक हालचाली जास्तीतजास्त होतील, याचा प्रयत्न करा. तसेच खाण्यापिण्यावरही लक्ष ठेवा. कारण व्यायाम करून तुम्ही ते वजन कमी करताय ते वजन तुम्ही चुकीच्या खाण्यापिण्यामुळे खूप जलद वाढवू शकता. 
 

Web Title: which exercise is perfect for fast weight loss, how many days we should do exercise for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.