Lokmat Sakhi >Fitness > जेवल्यानंतर चालावं की रिकाम्यापोटी चालावं? वजन कमी करण्यासाठी बघा काय जास्त चांगलं... 

जेवल्यानंतर चालावं की रिकाम्यापोटी चालावं? वजन कमी करण्यासाठी बघा काय जास्त चांगलं... 

Which Type Of Walking Is Perfect For Weight Loss: काही जण जेवल्यानंतर शतपावली करतात, तर काही लोक रोज सकाळी उठून रिकाम्यापोटी चालण्याचा व्यायाम करतात. बघा तब्येतीसाठी, वजन कमी करण्यासाठी नेमकं काय चांगलं.. (post meal walk or empty stomach walk which is best for health)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2024 12:46 PM2024-08-24T12:46:03+5:302024-08-24T12:46:51+5:30

Which Type Of Walking Is Perfect For Weight Loss: काही जण जेवल्यानंतर शतपावली करतात, तर काही लोक रोज सकाळी उठून रिकाम्यापोटी चालण्याचा व्यायाम करतात. बघा तब्येतीसाठी, वजन कमी करण्यासाठी नेमकं काय चांगलं.. (post meal walk or empty stomach walk which is best for health)

which type of walking is perfect for weight loss, post meal walk or empty stomach walk which is best for health | जेवल्यानंतर चालावं की रिकाम्यापोटी चालावं? वजन कमी करण्यासाठी बघा काय जास्त चांगलं... 

जेवल्यानंतर चालावं की रिकाम्यापोटी चालावं? वजन कमी करण्यासाठी बघा काय जास्त चांगलं... 

Highlightsचालण्याच्या व्यायामाविषयी JAMA न्युरोलॉजी आणि इंटरनल मेडीसिन यांच्यावतीने नुकताच एक अभ्यास करण्यात आला.

सगळ्यात सोपा आणि मस्त व्यायाम म्हणजे चालणे.. ज्यांना मोकळ्या हवेत, निसर्गाच्या सान्निध्यात जायला आवडते, त्यांच्यासाठी हा व्यायाम अतिशय योग्य आहे. दररोज शुद्ध, मोकळ्या हवेत आपण नियमितपणे चालायला गेलो तर त्याचे आरोग्याला फायदे होतात, पण मनही प्रसन्न होते, फ्रेश राहाते. आता बरेच जण वजन कमी करण्यासाठीही चालायला जातात (which type of walking is perfect for weight loss?). वजन कमी करायचं असेल किंवा फिटनेसासाठी तुम्ही चालायला जात असाल तर नेमकं कधी जावं, जेवल्यानंतर शतपावली करणं अधिक चांगलं की रिकाम्यापोटी चालण्याचा व्यायाम करणं अधिक उत्तम, याविषयी बघा एक अभ्यास काय सांगतो आहे... (post meal walk or empty stomach walk which is best for health?)

 

चालण्याच्या व्यायामाविषयी JAMA न्युरोलॉजी आणि इंटरनल मेडीसिन यांच्यावतीने नुकताच एक अभ्यास करण्यात आला. यामध्ये असं लिहिलेलं आहे की तुम्ही जर वजन कमी करण्याच्या उद्देशाने दररोज चालायला जात असाल तर तुम्ही रिकाम्यापोटीच चालले पाहिजे.

कांदा- मिरचीचं चटकदार लोणचं, चव इतकी भारी की भाजी- वरणाची गरजच नाही! बघा सोपी रेसिपी

रिकाम्यापोटी चालायला जाण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. दररोज सकाळी रिकाम्यापोटी चालायला गेल्यामुळे चयापचय क्रिया अधिक उत्तम होते, यामुळे शरीरातील जास्तीचे फॅट्स कमी होण्यास मदत होते. तसेच कोवळ्या सुर्यप्रकाशात गेल्यामुळे व्हिटॅमिन डी मिळते, जे हाडांच्या मजबुतीसाठी उत्तम आहे. शिवाय रिकाम्यापोटी चालल्यामुळे रक्ताभिसरण अधिक चांगले होते आणि त्यातून जी एनर्जी मिळते, ती दिवसभर पुरते. 

 

जेवल्यानंतर चालल्याने काय होते?

जेवल्यानंतर तुम्ही थोडं चालत असाल म्हणजे शतपावली करत असाल तर त्यामुळे तब्येतीला आणखी वेगळे फायदे मिळतात. शतपावली केल्यामुळे ॲसिडीटी, अपचन, पोट फुगणे, गॅसेस असे त्रास खूप कमी होतात.

रोज टाच दुखते- पायावरही सूज? तुमचं लिव्हर आजारी असण्याची शक्यता, पाहा फॅटी लिव्हरची लक्षणं 

शतपावली करणे हृदयाच्या आरोग्यासाठीही उत्तम असते. शिवाय त्यामुळे मधुमेह नियंत्रित राहण्यासही मदत होते. त्यामुळे तुमची नेमकी आरोग्य समस्या कोणती आणि त्यानुसार कधी चालायला पाहिजे ते बघा... 

 

Web Title: which type of walking is perfect for weight loss, post meal walk or empty stomach walk which is best for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.